जाणून घ्या २१ मार्च रोजी येणारे दिनविशेष

21 March Dinvishes

२१ मार्च या दिवसाचे खूप महत्व आहे कारण हा दिवस वेगवेगळ्या प्रकारचा जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जीवनचक्र संतुलित राहण्यासाठी, जंगलाचे मूल्ये, महत्व आणि योगदान याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याकरिता प्रत्येक वर्षी २१ मार्च हा दिवस विशेष करून ओळखला जातो तो “आंतरराष्ट्रीय वन दिन” म्हणून. स.न १९७१ साली युरोपियन कृषी संघटनेच्या २३ व्या महासभेमध्ये ‘जागतिक वनीकरण दिन’ साजरा करण्यास सुरवात झाली.

तसेच,  मानवी मनातील सर्जनशील भावना तसेच लोकांमध्ये असणारी अद्वितीय क्षमतेची ओळख करून घेण्यासाठी दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मानवी समाजात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वर्णभेद वृत्तीमुळे माणसा माणसात क्लेश निर्माण झाला आहे. लोकांमध्ये आपुलकीची आणि एकात्मतेची भावना निर्माण करण्याकरिता युनेस्को द्वारा दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक वर्णभेदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  तसेच, २१ मार्च हा जागतिक कठपुतली(बाहुली) दिवस म्हणून देखील साजरा (21 March Today Historical Events in Marathi) करण्यात येतो.

जाणून घ्या २१ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 21 March Today Historical Events in Marathi

21 March Today Historical Events in Marathi

२१ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 March Historical Event

  • सन १५५६ साली ख्रिश्चन धर्मात सुधारणा करणे गरजेचे आहे असे सांगितल्या प्रकरणी आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
  • इ.स. १६८० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ल्याची बांधणी सुरु केली.
  • सन १८३६ साली कोलकाता येथील राष्ट्रीय लायब्ररी( वाचनालय) नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक पुस्तकालयाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १८५८ साली इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई  राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता.
  • सन १८८७ साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९७५ साली सर्वप्रथम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून कलम ३५२ अंतर्गत मध्यरात्री आणीबाणी जाहीर केली होती. सन १९७७ साली भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
  • सन १९८० साली अमेरिकेने रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित ऑलम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला होता.
  • इ.स. १९९० साली नामिबिया राष्ट्राला दक्षिण आफ्रिका राष्ट्रापासून स्वातंत्र्य करण्यात आले.
  • सन २००६ साली जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स व बिज स्टोन यांनी एकत्रितपणे अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग सेवा ट्विटर ची स्थापना केली.

२१ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८७ साली मेक्सिकन कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, तसचं, भारतीय क्रांतिकारक, मूलगामी कार्यकर्ते, राजकीय सिद्धांताकार, आणि विसाव्या शतकातील प्रख्यात तत्वज्ञानी मानवेंद्र नाथ रॉय यांचा जन्मदिन
  • सन १९१२ साली चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि प्रसिद्ध संगीतकार ख्वाजा खुर्शीद अनवर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१६ साली प्रसिद्ध शहनाई वादक “उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ”  यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली बांगलादेशचे प्रथम प्रधानमंत्री ‘मुजिबुर रहमान’  यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२३ साली सहज योगच्या संस्थापिका, धार्मिक गुरु व भारतीय धार्मिक नेता ‘निर्मला श्रीवास्तव’  यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली भारतीय हॉकी खेळाडू मोहम्मद जाफर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९४४ साली केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांचा जन्मदिन.
  • सन १९७८ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्मदिन.

२१ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 March Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८२७ साली मध्य भारतातील ग्वाल्हेर राज्याचे राजा श्रीमंत दौलतराव शिंदे यांचे निधन.
  • सन १९५२ साली शिक्षणतज्ज्ञ आणि हिंदी लेखक व साहित्यिक केशव प्रसाद मिश्र यांचे निधन.
  • इ.स. १९७३ साली महान मराठी शब्दकोश निर्माता, केशकार, यशवंत रामकृष्ण दाते,  यांचे निधन.
  • सन १९८५ साली इंग्रजी रंगमंच आणि चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, व्यवस्थापक आणि लेखक सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन.
  • इ.स. २००१ साली दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे संस्थापक चुंग जू- युंग यांचे निधन.
  • सन २००३ साली हिंदी साहित्यिक पद्मश्री पुरस्कार विजेत्या व हिंदी मासिक लेखिका गौरी पंत (शिवानी) यांचे निधन.
  • इ.स. २००५ साली मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संवाद लेखक दिनकर डी. पाटील यांचे निधन.
  • सन २०१० साली विनोदी लेखक व अर्थशास्त्रज्ञ पांडुरंग लक्ष्मण उर्फ बाळ गाडगीळ यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top