Wednesday, May 7, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २१ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

21 September Dinvishes

मित्रांनो, आज २१ सप्टेंबर, हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सयुक्त राष्ट्राने ठरविल्या प्रमाणे सन १९८२ सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो. प्रत्येक दिवस देश विदेशात वाढत चाललेल्या अतिरेकी कारवाईमुळे जगात खूप हानी होते. अनेक निर्मनुष मारले जातात. या घटनेकडे संयुक्त राष्ट्राने लक्ष देऊन हा दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. तसचं, मित्रांनो आज जागतिक अल्झायमर दिवस देखील आहे.

याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन आणि निधन याबदल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २१ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 21 September Today Historical Events in Marathi

21 September History Information in Marathi
21 September History Information in Marathi

21 सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 September Historical Event

  • सन १९४९ साली मणिपूर येथील रियासतेचे भातात विनिलीकरण करण्याच्या महत्वपूर्ण कागदपत्रे ट्रिटी ऑफ एक्शन हस्ताक्षरीत करण्यात आली.
  • सन १९६१ साली  अमेरिकन रोटरक्राफ्ट कंपनी व्हर्टोल यांनी विकसित केलेलं हेवी-लिफ्ट बोईंग सी. एच ४७ चीणूक हेलिकॉप्टर ने आपली पहिली उड्डाण भरली होती.
  • सन १९६८ साली भारताची परदेशी गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९७१ साली बहरिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात समावेश करण्यात आला.
  • सन १९८१ साली बेलिझे या देशाला ब्रिटन कडून स्वातंत्र्य मिळालं.
  • सन १९८४ साली ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात समावेश करण्यात आला.

२१ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९२६ साली पाकिस्तानी गायिका व अभिनेत्री ‘मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, शास्त्रीय गायक व संगीतकार पं.जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन.
  • सन १९४४ साली भारतीय चित्रपट निर्माता, फॅशन डिझायनर, कवी, कलाकार, सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी आणि सामाजिक कार्यकर्तेमुजफ्फर अली यांचा जन्मदिन.
  • सन १९७९ साली वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू क्रिस गेल यांचा जन्मदिन.
  • सन १९८० साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्मदिन.
  • सन १९८१ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्मदिन.

२१ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 September Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १७४३ साली अंबर राज्याचे हिंदू राजपूत शासक व जयपूर शहराचे संस्थापक महाराजा सवई जयसिंह द्वितीय यांचे निधन.
  • इ.स. १७९७ साली औध चे नवाब शुजा-उद-दौला यांचा मुलगा आसफ-उद-दौला यांचे निधन.
  • सन १९८२ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन.
  • सन १९९२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय पत्रकार, व द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved