जाणून घ्या २२ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

22 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून २२ ऑगस्ट या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता आणि त्यांचे कार्य या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २२ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 22 August Today Historical Events in Marathi

22 August History Information in Marathi
22 August History Information in Marathi

२२ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 August Historical Event

  •  सन १६३९ साली ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने तामिळनाडू राज्याची राजधानी मद्रास शहराची स्थापना केली.
  • सन १९०२ साली युनायटेड स्टेट येथील कैडिलैक मोटर कंपनीची स्थापना करण्यात आली.
  • सन १९२१ साली महात्मा गांधी यांनी विदेशी वस्त्राची होळी पेटवली.
  •  सन १९४४ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
  • सन २०१८ साली भारतीय नेमबाज राही सरनोबत यांनी 25 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

२२ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७७ साली पाश्चात्य भारतीय संस्कृतीचे प्रारंभिक भाषांतरकार,इतिहासकार आणि भारतीय कलेचे तत्त्वज्ञ आनंद केंटिश कुमारस्‍वामी  यांचा जन्मदिन.
  • सन १९०४ साली चीन देशांतील राजकारणी व पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइनाचे प्रमुख सुधारणावादी नेते देंग शियाओ पिंग(Deng Xiaoping ) यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट व रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार सोम्भू मित्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व कवी गीरीजाकुमार माथुर यांचा जन्मदिन.
  • सन १९२० साली कृत्रिम ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डेंटन आर्थर कूली(Denton Arthur Cooley) यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली भारतीय आधुनिक हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली भारतीय चित्रपट अभिनेते, राजकारणी व माजी भारतीय पर्यटन मंत्री चिरंजीवी यांचा जन्मदिन.
  • सन १९६४ साली प्रख्यात माजी स्वीडन टेनिसपटू मॅट्स विलँडर(Mats Wilander) यांचा जन्मदिन.

२२ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८१८ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिले गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज(Warren Hastings) यांचे निधन.
  • सन १९७८ साली केनिया राष्ट्राचे माजी पंतप्रधान व पहिले राष्ट्रपती जोमो किनियाता(Jomo Kenyatta) यांचे निधन.
  • सन १९८० साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता किशोर साहू यांचे निधन.
  • सन २०१४ साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक लेखक, साहित्यिक, समीक्षक व शिक्षणतज्ञ यू. आर. अनंतमूर्ती यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top