• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या २२ मार्च रोजी येणारे दिनविशेष

 22 March Dinvishes

२२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’  म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. गोड्या पाण्याचे महत्व जागृत करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. याची सुरवात सन १९९२ साली ब्राझील मधील रियो डी जनेरियो येथे आयोजित पर्यावरण आणि विकास या विषयावर आधारित संयुक्त राष्ट्र परिषद मध्ये(एन. एन. सी. ई. डी) २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याची शिफारस करण्यात आली. सन १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.

याव्यतिरिक्त या दिवशी इतिहासात घडलेल्या घटना, आधुनिक काळात लावलेले शोध, विशेष व्यक्ती जन्मदिन तथा निधन वार्ता इत्यादी सर्व घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखा द्वारे पाहणार आहोत.

जाणून घ्या २२ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 22 March Today Historical Events in Marathi

22 March History Information in Marathi
22 March History Information in Marathi

२२ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 March Historical Event

  • इ.स. १७३९ साली नादीरशहा याने आपल्या सैनिकांना दिल्लीमध्ये नरसंहार करण्यास परवानगी दिली होती.
  • सन १८८२ साली घातक संक्रमक बिमारी ‘टीबी’ ची ओळख झाली.
  • सन १८८८ साली इंग्लिश फुटबॉल लीग ची स्थापना झाली होती.
  • सन १८९० साली भारतीय कलाबाज, जिम्नॅस्ट, बलून वादक, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चटर्जी हे पैराशूट मधून उतरणारे पहिले व्यक्ती बनले.
  •  सन १९३० साली बर्फावर खेळल्या जाणाऱ्या हॉकी सामन्याचे प्रकाशण सर्वप्रथम आकाशवाणीवर करण्यात आले.
  • सन १९४२ साली सर रिचर्ड स्टेफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात आले होते.
  • सन १९४५ साली कैरो येथे अरब लीगची स्थापना करण्यात आली.
  • सन १९४७ साली स्वातंत्र्य भारताचे शेवटील व्हायसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांचे भारतात आगमन झाले.
  • सन १९५४ साली अमेरिकेतील मिशीगन शहराच्या साउथफिल्ड भागात पहिला शॉपिंग मॉल उघडण्यात आला.
  • सन १९६९ साली भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९७० साली महाराष्ट्रीयन समाजसुधारक, विचारवंत, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक लेखक हमीद उमर दलवाई यांनी पुणे येथे मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
  • सन १९९९ साली भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीत दिग्दर्शिका लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२२ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –  22 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १८६८ साली अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबल पुरस्कार विजेते रॉबर्ट अँड्र्यूज मिलिकान यांचा जन्मदिन. इलेक्ट्रॉनचा शोध लावल्यामुळे त्यांना सन १९२३ साली भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार देण्यात आला होता.
  • सन १८८२ साली उर्दू वर्तमानपत्र ‘जमाना’ चे संस्थापक व समाजसुधारक मुंशी द्यानारायण निगम यांचा जन्मदिन.
  • सन १८८५ साली भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ गुलाम यजदानी, यांचा जन्मदिन.
  • सन १८९४ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी क्रांतिकारक सूर्यसेन यांचा जन्मदिन. सूर्यसेन यांनी चटगाव येथील शस्त्रास्त्र हल्ल्याचे नेतृत्व केले होते.
  • सन १९२४ साली अमेरिकन उद्योगपती, लेखक, तसेच, यु. एस. ए. टुडे, फ्रीडम फोरम आणि न्युजियमचे संस्थापक आलेन हॅरोल्ड “अल” न्यूहारथ यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसुदन कालेलकर यांचा जन्मदिन.
  • सन २००० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेता भारतीय टेबल टेनिसपटू नैना जयस्वाल यांचा जन्मदिन.

२२ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 March Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९७१ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व मासिक संपादक हनुमान प्रसाद पोद्दार यांचे निधन.
  • सन १९७७ साली भारतीय कम्युनिस्ट नेता तसेच, भारतीय स्वातंत्र्यसेनानी ए. के. गोपालन यांचे निधन.
  • सन १९८४ साली मराठी भाषिक लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.
  • सन २००४ साली प्रख्यात भारतीय कायदेपंडित, नागरी हक्क कार्यकर्ते व मानवतावादी नेते विठ्ठल महादेव तारकुंडे यांचे निधन. त्यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषवले होते.
  • सन २००७ साली भारतीय तत्वज्ञानी वक्ते यू. जी. कृष्णमूर्ती यांचे निधन.

वरील संपूर्ण माहिती आपल्या करिता महत्वपूर्ण असून,  या माहितीचे वाचन करून आपण आपले ज्ञान वाढवू शकता. धन्यवाद..

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved