23 August Dinvishes
मित्रांनो, २३ ऑगस्ट हा दिवस इतिहासात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन आणि निधन व त्यांनी कार्य आदी बाबी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, २३ ऑगस्ट हा दिवस आपल्यकडे स्वस्त उड्डाण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या २३ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 23 August Today Historical Events in Marathi
२३ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 August Historical Event
- सन १९१४ साली जपानने जर्मनी विरुद्ध आपले युद्ध पुकारले.
- सन १९४२ साली मो.ग. रांगणेकर यांच्या ‘कुलवधू’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
- सन १९६६ साली ल्युनार ऑर्बिटर(Lunar Orbiter program) १ ने चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा पहिला फोटो घेतला.
- ‘सन २००५ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- सन २००८ साली झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री मधुकोडा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
- सन २०११ साली लिबियाचे हुकुमशहा मुअम्मर गदाफिची(Muammar al-Gaddafi) सत्ता संपुष्टात आली.
२३ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 August Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७२ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यातसेनानी व राजकारणी तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री टंगुटूरी प्रकाशम यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७५ साली भारतीय स्वतंत्रतासेनानी व चंपारण्य संग्रहाचे प्रमुख सदस्य राजकुमार शुक्ल यांचा जन्मदिन.
- सन १९१८ साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक आणि अनुवादक गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्मदिन.
- सन १९४४ साली प्रसिद्ध भारततीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सायरा बानो यांचा जन्मदिन.
२३ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 August Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८०६ साली कुलोमच्या सिद्धांताकरिता प्रसिद्ध असणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स-ऑगस्टिन डी कूलॉम(Charles‑Augustin de) यांचे निधन.
- सन १९७१ साली प्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर उर्फ रतन साळगावकर यांचे निधन.
- सन १९७५ साली भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. विनायक नारायण पटवर्धन यांचे निधन.
- सन १९९४ साली इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या भारतीय तथा आशियाई जलतरणपटू महिला आरती साहा यांचे निधन.
- सन २००३ साली भारतीय कन्नड भाषिक लेखक ए. एन. मूर्ती राव यांचे निधन.
मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपण २३ ऑगस्ट या दिनाचे संपूर्ण सामान्य ज्ञान (23 August Dinvishes) माहिती करून घेऊ शकता. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा आहे त्यामुळे या लेखाचे आपण वाचन करा व आपल्या मित्रांना देखील पाठवा.