24 May Dinvishes
मित्रांनो, आजच्या दिवशी ब्रिटीश कालीन भारतात उत्तर प्रदेश मधील अलिगढ या ठिकाणी मुस्लीम लिग चे सदस्य सर सैय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण अवगत करण्याच्या उद्देशाने सन १८७७ साली अलिगढ मुस्लीम शाळेचे स्थापना केली. कालांतराने त्या शाळेलाच एंग्लो ओरिएन्टल महाविद्यालय मध्ये रुपांतरीत करण्यात आले. वर्तमानात त्या महाविद्यालयाला अलिगढ मुस्लीम विश्व विद्यालय म्हणून ओळखले जाते.
याव्यतिरिक्त आपण आज या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्तीन बद्दल जाऊन घेणार आहोत. तसचं काही ऐतिहासिक घटना, शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
जाणून घ्या २४ मे रोजी येणारे दिनविशेष – 24 May Today Historical Events in Marathi
२४ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 May Historical Event
- इ.स. १६५३ साली जर्मन देशाच्या संसदेने फर्डिनेंड द्वितीय यांना ऑस्ट्रिया देशाचे राजा म्हणून घोषित केलं.
- इ.स. १८३० साली अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रवासी रोडरेल सेवा सुरु करण्यात आली.
- इ.स. १८७५ साली ब्रिटीश कालीन भारतात सर सैय्यद अहमद खान यांनी अलीगढ येथे मुहम्मद एंग्लो ओरिएन्टल शाळेची स्थापणा केली. वर्तमानात त्या शाळेलाच अलिगढ मुस्लीम विश्व विद्यालय म्हणून ओळखले जाते.
- सन १९३१ साली अमेरिकेतील वाल्टमोर ओहियो या रेल्वे मार्गावर पहिली वातानुकुलीत प्रवासी रेल्वे सुरु करण्यात आली.
- सन १९८६ साली इजराईल देशाचा दौरा करणाऱ्या मार्गरेट थैचर या ब्रिटन देशाच्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या.
- सन २००० साली भारतीय अवकाश संशोधन संस्थने (इस्रो) स्वदेश निर्मित भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीद्वारे चालविला जाणारा. आयएनएसएटी-बी हा भारतीय संचार उपग्रह तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आला.
- सन २००१ साली नेपाल येथील पंधरा वर्षीय गीर्यरोहक शेरपा तेंबा शेरी यांनी जगातील सर्वात मोठ पर्वत शिखर माउंट एवरेस्ट सर केलं. सर्वात कमी वयात असा पराक्रम करणारे ते पहिले व्यक्ती होत.
- सन २००४ साली उत्तर कोरीय देशाने आपल्या देशांत मोबाईल फोनवर प्रतिबंध लावला.
२४ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८१९ साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड मधील युनायटेड किंगडम देशाच्या महाराणी व्हिक्टोरिया यांचा जन्मदिन.
- सन १८९६ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील पंजाब राज्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी व शहीद कम्युनिस्ट क्रांतिकारक आणि गदार पार्टीचे सदस्य कर्तारसिंग यांचा जन्मदिन.
- सन १९२४ साली भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार रघुवीर भोपळे उर्फ जादुगार रघुवीर यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली माजी भारतीय कसोटी व रणजी क्रिकेटपटू व कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्मदिन.
- सन १९४२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, शैक्षणिक, लेखक, स्तंभलेखक आणि पर्यावरणीय विज्ञान केंद्राचे संस्थापक, माधव गाडगीळ यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली माजी भारतीय परराष्ट्र सचिव आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त रंजन मथाई यांचा जन्मदिन.
- सन १९५४ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय गीर्यरोहक बचेंद्री पाल यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक,पटकथा लेखक व संपादक शिरीष कुंदर यांचा जन्मदिन.
२४ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 May Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १५४३ साली सूर्यकेंद्रि या विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे प्रसिद्ध युरोपीय खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ निकोलस कॉपर्निकस यांचे निधन.
- इ.स. १८७९ साली प्रख्यात अमेरिकन निर्मूलन, पत्रकार, उपग्रहवादी आणि समाजसुधारक विल्यम लॉयड गॅरिसन यांचे निधन.
- सन १९५० साली भारतीय ब्रिटीश सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी व भारतातील ४३ वे गव्हर्नर जनरल आर्चिबाल्ड पर्सीव्हल वेव्हल यांचे निधन.
- सन १९९० साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसचं, भारतीय लोकसभेचे माजी अध्यक्ष के.एस. हेगडे यांचे निधन.
- सन १९९५ साली इंग्लंडचे माजी पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन.
- सन १९९९ साली उत्कृष्ट भारतीय क्रीडा प्रशिक्षक पदाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्कार व उत्कृष्ट कामगिरी करिता पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारताचे दिग्गज कुस्तीगीर प्रशिक्षक गुरु हनुमान यांचे निधन.
- सन २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय उर्दू कवी, शायर आणि हिंदी चित्रपट गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचे निधन.
- सन २०१४ साली प्रसिद्ध भारतीय लेखिका व भारतीय राज्य राजस्थानमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सदस्या लक्ष्मी कुमारी चुंडावत यांचे निधन.