जाणून घ्या २५ मे रोजी येणारे दिनविशेष

25 May Dinvishes

मित्रानो, आपणास माहिती असलेली इतिहास काळातील सर्वात प्रसिद्ध प्रेम कहाणी म्हणजे सलीम अनारकली यांची प्रेम कथा. इतिहासातील ही कहाणी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. मुघल शासक जलालुद्दीन मोहम्मद अकबर यांचे पुत्र सलीम उर्फ बादशाहा जहागीर यांचा विवाह मेहरूनिस्सा उर्फ नूरजहाँ यांच्याबरोबर आजच्या दिवशी झाला होता.

याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या मध्यमातून याच प्रकारच्या काही ऐतिहासिक घटना जाणून घेणार आहोत. तसचं, काही व्यक्तीचे जन्मदिन, निधन व त्यांचे शोध कार्य या बद्दल माजीती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ मे रोजी येणारे दिनविशेष – 25 May Today Historical Events in Marathi

25 May History Information in Marathi
25 May History Information in Marathi

 

२५ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 May  Historical Event

  • इ.स. १६११ साली मुघल शासक जहागीर यांनी महरुन्निसा यांच्याबरोबर विवाह केला. यानंतर त्यांचे नाव नूरजहाँ असे पडले.
  • इ.स. १६६६ साली शिवाजी महाराज आग्र्याला मुघल बादशाहा औरंगजेबला भेटण्यासाठी गेले असतांना त्यांना नजरकैद करण्यात आलं.
  • सन १९५३ साली अमेरिकन सैन्य दलाने आण्विक शास्त्राची चाचणी केली.
  • सन १९७० साली बोईंग संगणक सेवेची स्थापना करण्यात आली.
  • सन १९९२ साली प्रख्यात भारतीय बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना साहित्य क्षेत्रांतील सेर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००३ साली चिली देशाने पहिल्यांदा टेनिसचा विश्वकप जिंकला.
  • सन २०१३ साली जपानच्या 80० वर्षीय युशिरो मिड्रा नामक गिर्यारोहक व्यक्तीने जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.

२५ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८०३ साली अमेरिकन निबंध लेखक, व्याख्याता, तत्ववेत्ता आणि कवी राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८३१ साली प्रख्यात भारतीय उर्दू गझल कवी दाग देहलवी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७८ साली ब्रिटीश कालीन भारतातील थोर राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते रामकृष्ण पिल्लई यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८६ साली सुभाष चंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेना दलाचे प्रमुख सेनानी व महान भारतीय क्रांतिकारक रस बिहारी बोस यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९५ साली ब्रिटीश कालीन भारतीय इतिहासकार व निबंधकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली प्रसिद्ध ब्रिटीश कालीन भारतीय बंगाली कवी, लेखक आणि संगीतकार तसचं, बांगलादेशाचे राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता मिळविणारे काझी नझरूल इस्लाम यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कादंबरीकार, नाटककार आणि अनुवादक धीरुबेन गोरधनभाई पटेल यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे माजी पंतप्रधान बासदेव पांडे यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली सेवानिवृत्त भारतीय कसोटी क्रिकेटपटू रुसी फ्रामरोझ यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा जन्मदिन.
  • सन १९७४ साली विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तसचं, इन्फोसिस पुरस्कार सन्मानित प्रख्यात शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मुळ भारतीय वंशीय यमुना कृष्णन यांचा जन्मदिन.

२५ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९२४ साली प्रख्यात भारतीय बंगाली शिक्षिका, न्यायशास्त्रज्ञ, बॅरिस्टर आणि गणितज्ञ आशुतोष मुखर्जी यांचे निधन.
  • सन १९७४ साली  स्वतंत्र संयुक्त ओडिशा राज्याचे आर्किटेक्ट(रचनाकार)  महाराजा सर कृष्णचंद्र गजपती नारायण देव यांचे निधन.
  • सन १९९९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायन अभियंता आणि माजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक बाळ दत्तात्रेय टिळक यांचे निधन.
  • सन २००५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी सनिल दत्त यांचे निधन.
  • सन २०१२ साली प्रसिद्ध भारतीय निबंधकार व कवी भागवत रावत यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top