Sunday, May 4, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

25 October Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. कारण, आपल्या इतिहास काळात अनेक अश्या महत्पूर्ण घटना घडून गेल्या आहेत, ज्यांचा आपण सर्वांना विसर पडला आहे. आम्ही या लेखाच्या माध्यामतून अश्याच स्वरुपाच्या काही महत्वपूर्ण घटना इथे घेवून आलो आहे. जांच्या मुळे तुम्हाला आजच्या दिनाचे काय महत्व आहे ते समजेल. तसचं, मित्रंनो, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल देखील आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 25 October Today Historical Events in Marathi

25 October History Information in Marathi
25 October History Information in Marathi

२५ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 October Historical Event

  • सन १९९४ साली ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • सन १९५१ साली स्वतंत्र भारतात प्रथम सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
  • सन १९६२ साली युगांडा राष्ट्राचा सयुक्त राष्ट्रांमध्ये समावेश करण्यात आला.
  • सन १९९५ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ सभेला संबोधित केलं.
  • सन १९९९ साली दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.

२५ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८०० साली ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८१ साली सुप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार, शिल्पकार,  आणि रंगमंच रचनाकार पाब्लो पिकासो (Pablo Picasso) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८३ साली भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २५वे सरन्यायाधीश मानेपल्ली नारायणराव वेंकटाचलिया यांचा जन्मदिन.
  •  सन १९३८ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखिका मृदुला गर्ग यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांचा जन्मदिन.
  • सन १९८७ साली उत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज उमेश यादव यांचा जन्मदिन.

२५ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९८० साली हिंदी व उर्दू  भाषेत लिखाण करणारे महान भारतीय कवी व चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी यांचे निधन.
  • सन १९९० साली भारतीय राज्य मेघालय राज्याचे संस्थापक व पहिले मुख्यमंत्री तसचं, मिझोरम राज्याचे पहिले राज्यपाल विलियम सन संगमा यांचे निधन.
  • सन २००३ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन कार्यकर्ते तत्वज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक आणि धर्म सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांचे निधन.
  • सन २००५ साली ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा यांचे निधन.
  • सन २०१२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन हास्य कलाकार जसपाल भट्टी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved