26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती

26 January Republic Day

26 जानेवारी!!! प्रजासत्ताक दिन (Prajasattak Din) आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाचा 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. आपणा सगळयांकरता हा शुभदिन एक आनंद पर्वणी असते. महाविद्यालयं, शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसोबतच संपुर्ण देशभर आजचा हा दिवस साजरा होत असतो.
हा दिवस आपण का साजरा करतो? याची कल्पना सर्वांनाच आहे तरी देखील या दिनाच्या निमित्ताने ही एक आठवण.

26 January Republic Day in Marathi

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती – 26 January Republic Day

बरं का मंडळी! संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्विकृत केले आणि पुढे 1950 साली 26 जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले.

भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरीता तब्बल 2 वर्ष, 11 महीने और 18 दिवसाचा कालावधी लागला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरीता 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळी आपल्याला तर माहीतच भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाले.

परंतु 26 जानेवारी 1950 ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौमिक, आणि गणराज्य बनला.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1930 साली 26 जानेवारी ला लाहोर येथे जे अधिवेशन झाले त्यात आपला तिरंगा ध्वज फडकवुन संपुर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

त्याचे स्मरण म्हणुन हा दिवस राज्यघटना अमलांत आणण्याकरता निश्चित करण्यात आला.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात – Republic day Celebration

26 जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते.

रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते.

हे पथसंचलन “याची देही याची डोळा” या ओळींप्रमाणे डोळयांचे अक्षरशः पारणे फेडते.

या पथसंचलनापुर्वी भारताचे प्रधानमंत्री ‘अमर जवान ज्योती’ या सैनिकांकरता बनविल्या गेलेल्या स्मारकाजवळ जावुन तेथे पुष्पचक्र अर्पण करतात.

भारत देशाकरीता ज्या विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अश्या सैनिकांचे यावेळी स्मरण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.

त्यानंतर प्रधानमंत्री आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटी घेतात. राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन होते. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि राष्ट्रगीत सुरू होते. या प्रसंगी 21 तोफांची सलामी देण्यात येते. विर सैनिकांना अशोक चक्र आणि किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात.

अतुलनिय शौर्य गाजवलेल्या बालविरांची या संचलनात मिरवणुक काढली जाते. 26 जानेवारी चे औचित्य साधत परराष्ट्रातील राष्ट्राध्यक्षांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्या जाते.

बरं का मंडळी! आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंन्द्र प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमधे 1950 ला दिल्लीतील राजपथावर पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं.

आपल्या भारत देशाचे जे महत्वाचे वैशिष्टय आहे ते म्हणजे ’विविधतेतुन एकता’ त्या गोष्टीला या पथसंचलनातुन मानवंदना देण्यात आली होती.

आज आपल्या भारत देशाची गणना शक्तिशाली देशांमध्ये करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्या व आपल्या राष्ट्राच्या विकासाकरता आणि समृध्दीकरता परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी की आम्ही आमच्या देशाला विश्वातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ! जय हिंद ! ! ! !

जरूर वाचा:

नोट: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती – 26 January Republic Day  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top