Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २९ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

29 April Today Historical Events in Marathi

मित्रानो, आजचा दिवस हा ऐतिहासिक घटनेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी एप्रिल १६३९ साली मुघल शासक शाहजहाँ यांनी दिल्ली येथे लाल किल्ल्याचे निर्माण करण्याच्या उद्देशाने किल्ल्याचा पाया रचण्यास सुरवात केली होती.  इतिहासकाळातील मुघल शैलीत स्थापित सर्वात सुंदर वास्तू दिल्ली येथील लाल किल्ल्याचे निर्माण शहाजहा यांनी उस्ताद लाहोरी यांच्याकडून करून घेतले होते. दिल्ली येथील लाल किल्ल्याची नोंद जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आली आहे. आज तो किल्ला आपल्या देशाची शान बनला आहे. देशाचे पंतप्रधान दरवर्षी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झेंडावंदन करून देशांतील जनतेला संबोधून भाषण देतात.

तसचं, आजच्या दिवशी जगातील ऐतिहासिक इमारतींमध्ये समाविष्ट असलेल्या बकिंगहॅम पॅलेससाठीही खूप महत्वाचा आहे. सन १९३३ साली आजच्या दिवशी ब्रिटीश राजशाहीचे निवास्थान असलेले हे पॅलेस सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले.  याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, शोधकार्य आही घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २९ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 29 April Today Historical Events in Marathi

29 April History Information in Marathi
29 April History Information in Marathi

२९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 April Historical Event

  • इ.स. १६३९ साली मुघल सम्राट शाहजहान  यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्याचे निर्माण करण्यास पाया रचला.
  • सन १८१३ साली अमेरिकन वैज्ञानिक जेएफ हम्मेल यांनी रबराचे नमुने सादर केले.
  • इ.स. १९३० साली ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया देशांतर्गत दूरध्वनी (टेलीफोन) सेवा सुरु करण्यात आली.
  • सन १९३३ सकू प्रभात कंपनी निर्मित ‘सिहगड’  हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता.
  • इ.स. १९३९ साली स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षामधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
  • सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान इटलीतील जर्मन  सेनांनी मित्र राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती पत्कारली होती.
  • इ.स. १९९१ साली बांगलादेशाच्या दक्षिणेकडील भागातील जिल्हा चितगाव या ठिकाणी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे सुमारे १,३८,००० लोक मृत्युमुखी पडले व सुमारे एक कोटी लोक बेघर झाले होते.
  • सन २००७ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने श्रीलंकन क्रिकेट संघाचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वकप जिंकला.
  • इ.स. २०११ साली ब्रिटीश राजकुमार प्रिंस विलियम आणि केट मिडलटन यांचा विवाह पार पडला.

२९ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –  29 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १५४२ साली मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रताप यांचे मित्र, सहकारी आणि विश्वासपात्र सल्लागार भामाशाह यांचा जन्मदिन.
  • सन १८४८ साली प्रसिद्ध भारतीय चित्रकार व कलाकार राजा रवि वर्मा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६७ साली भारताचे एडिसन म्हणून प्रख्यात महान भारतीय वैज्ञानिक शंकर अबाजी भिसे यांचा जन्मदिन.
  • सन १८९१ साली विसाव्या शतकातील भारतीय तामिळ भाषिक कवी आणि लेखक तसचं, तर्कवादी साहित्यिक कानगासाबाई सुब्ब्युरथनम भारतीदासन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१९ साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात विशेष कौशल्य मिळविणारे प्रख्यात भारतीय तबला वादक अल्ला रखा उर्फ अल्लारख्खा कुरेशी यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली भारतीय पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पाश्चात्य व पूर्व शास्त्रीय संगीत मार्गदर्शक व संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५८ साली पद्मभूषण व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ तसचं, द टेलीग्राफ, हिंदुस्तान टाईम्स आणि हिंदी दैनिक वृत्तपत्र अमर उजाला यांचे स्तंभलेखक रामचंद्र गुहा यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली विश्वातील नंबर एकचे अमेरिकन सेवानिवृत्त व्यावसायिक टेनिसपटू आंद्रे किर्क आगासी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९७९ साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज आशिष नेहरा यांचा जन्मदिन.

२९ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 April  Death/ Punyatithi/ Smrutidin

  • इ.स. १२३६ साली दिल्ली येथील सल्तनत साम्राज्याचे प्रभावी संस्थापक व दिल्लीच्या गादीवर राज्य करणारे पहिले मुस्लीम शासक शम्सउद्दीन इल्तुतमिश यांचे निधन.
  • सन १९५८ साली भारताच्या उडीसा राज्यातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक व गांधीवादी कार्यकर्ता गोपबंधू चौधरी यांचे निधन.
  • इ.स. १९६० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता, पत्रकार, राजकारणी आणि हिंदी साहित्याचे कवी नवीन कृष्णा शर्मा यांचे निधन.
  • सन १९७९ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार, लेखक, क्रांतिकारक व समाजसुधारक राजा महेंद्र प्रताप यांचे निधन.
  • इ.स. १९८० साली प्रख्यात भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, विचारवंत, समिक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन.
  • सन २००६ साली कॅनेडियन अर्थशास्त्रज्ञ, सार्वजनिक अधिकारी आणि मुत्सद्दी तसचं, 20 व्या शतकातील अमेरिकन उदारमतवादाचे अग्रणी समर्थक जॉन केनेथ गॅलब्रॅथ याचं निधन
  • इ.स. १९९७ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सतरावे गव्हर्नर व भारतीय प्रशासकीय सेवेचे सदस्य आर.एन.मल्होत्रा यांचे निधन.
  • सन १९९९ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि हिंदी चित्रपटांचे गीतकार केदार शर्मा यांचे निधन.
  • इ.स. २०१० साली गायत्री मंडळाच्या संस्थापिका व सदस्या तसचं, समाजसेविका कमलादेवी शुक्ला यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved