Sunday, May 4, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

30 October Dinvishes

मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन आहे. तसचं, मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात तसचं, आधुनिक काळात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्याक्ती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३० ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 30 October Today Historical Events in Marathi

30 October History Information in Marathi
30 October History Information in Marathi

३० ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 October Historical Event

  • सन १९२० साली सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९२८ साली सायमन कमिशनला विरोध करत असतांना लाल लजपतराय यांच्यावर इंग्रज सरकारने लाठी हल्ला केल्या त्या हल्ल्यात ते गंभीर जख्मी झाले. त्यानंतर सन १७ नोव्हेंबर १९२८ साली त्यांचे निधन झाले.
  • सन १९४५ साली भारत देश सयुक्त राष्ट्राचा सदस्य देश बनला.
  • सन १९६० साली ब्रिटन मध्ये पहिल्यांदा किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
  • सन २०१३ साली सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळले. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिन तेंडूलकर यांनी विजयी फटका मारला.

३० ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७३५ साली अमेरिकन मुत्सद्दी, राजकारणी व लेखक तसचं, अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स(John Adams) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८५३ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी तसचं, भारतीय क्रांतिकारक संस्था अनुशीलन समितीचे प्रारंभिक सदस्य प्रमथनाथ मित्र(Pramathanath Mitra) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८७ साली ब्रिटीश कालीन भारतातील पश्चिम बंगाल मधील कवी, कथालेखक, नाटककार आणि संपादक तसचं, भारतीय चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे वडिल सुकुमार रे(Sukumar Ray) यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली  भारतीय अणु भौतिकशास्त्रज्ञ, संस्थापक संचालक आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च प्राध्यापक होमी जहागीर भाभा(Homi J. Bhabha) यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजकारणी भाई महावीर यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन राजनेता व भारतीय जनता पक्ष सदस्य प्रमोद महाजन यांचा जन्मदिन.
  • सन १९९० साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय पिस्तूल नेमबाज खेळाडू राही सरनोबत यांचा जन्मदिन.

३० ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८३ साली भारतीय तत्त्ववेत्ता, सामाजिक नेते आणि आर्या समाजाचे संस्थापक आणि वैदिक धार्मिक सुधारणावादी चळवळीचे नेते दयानंद सरस्वती यांचे निधन.
  • सन १९७४ साली पद्मश्री, पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ठुमरी शैलीच्या गायिका अख्तरबाई फैजाबादी उर्फ बेगम अख्तर यांचे निधन.
  • सन १९८४ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार ख्वाजा खुर्शीद अन्वर यांचे निधन.
  • सन १९९० साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते विनोद मेहरा यांचे निधन.
  • सन १९९० साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित भारतीय मराठी चित्रपट निर्माता,निर्देशक व अभिनेते वी. शांताराम यांचे निधन.
  • सन १९९६ साली महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार, लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन.
  • सन १९९८ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन.
  • सन २०१४ साली सुप्रसिद्ध भारतीय साहित्यकार रॉबिन शॉ(Robin Shaw) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved