Sunday, October 1, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

लाला लजपतराय यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती

Lala Lajpat Rai

लाला लजपतराय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल – बाल – पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. या त्रिकोणातील प्रसिध्द लाला लजपतराय केवळ एक निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हें तर एक उत्तम लेखक, वकील, समाज – सुधारक आणि आर्य समाजी देखील होते.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक लाला लजपतराय यांचे व्यक्तिमत्व प्रामुख्याने एक राष्ट्रवादी नेत्याच्या रूपात आपल्याला दिसते. ब्रिटीश सरकार विरूध्द शक्तिशाली भाषण देत त्यांना हादरवुन सोडणारे लाला लजपतराय यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पाहाता त्यांना ’पंजाब केसरी’ आणि ‘पंजाब चा सिंह’ देखील म्हंटल्या जाते.

गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरीता लाला लजपतराय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि शहीद झाले.

Lala Lajpat Rai

लाला लजपतराय यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती – Lala Lajpat Rai Biography in Marathi

पुर्ण नावश्री लाला लाजपत राधाकृष्ण राय
जन्म28 जानेवारी 1865
जन्मस्थानधुडीके गांव, पंजाब, बर्तानवी भारत
वडिलश्री राधाकृष्ण जी
आईश्रीमती गुलाब देवी जी
शिक्षण1880 साली कलकत्ता आणि पंजाब विद्यापिठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
1886 साली कायद्याची पदवी मिळवली
संघटनभारतिय राष्ट्रीय काॅंग्रेस, आर्य समाज, हिंदु महासभा
आंदोलनभारतिय स्वतंत्रता आंदोलन
विद्यालयाची स्थापना1883 साली आपल्या भावांसमवेत आणि मित्रांच्या (हंसराज व गुरूदत्त) सोबतीने, सोबतच डी.ए.वी. (दयानंद अॅंग्लो विद्यालय) स्थापना, पंजाब नॅशनल काॅलेज लाहौर ची स्थापना
मृत्यु17 नोव्हेंबर 1928
मृत्यु स्थानलाहौर (पाकिस्तान)
या नावाने देखील ओळखले जायचेशेर ए पंजाब, पंजाब केसरी
रचनापंजाब केसरी, यंग इंडिया, भारताचे इंग्लंडवर कर्ज भारताकरीता आत्मनिर्णय, तरूण भारत
 

<या नावाने देखील ओळखले जायचे: शेर ए पंजाब, पंजाब केसरी
रचना: पंजाब केसरी, यंग इंडिया, भारताचे इंग्लंडवर कर्ज भारताकरीता आत्मनिर्णय, तरूण भारत

लाला लजपतराय यांचे प्रारंभिक जिवन – Lala Lajpat rai information

शेर.ए.पंजाब या उपाधीने सन्मानित आणि भारतातील महान लेखक लाला लजपत राय यांचा जन्म धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. वडिलांचे नाव राधाकृष्ण असे होते. ते अग्रवाल (वैश्य) म्हणजे वाणी समुदायातील होते शिवाय एक चांगले शिक्षक म्हणुन देखील परिचीत होते. उर्दु व फारसी भाषेचे ते चांगले जाणकार होते.

त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी होते आणि त्या शिख परिवारातील होत्या. त्या एक सामान्य आणि धार्मिक व्यक्तिमत्वाच्या होत्या, आपल्या मुलात देखील त्यांनी धर्म कर्माच्या भावनेची बीजं रूजवली होती. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती.

लाला लजपतराय यांचे शिक्षण – Lala lajpat Rai Education

त्यांचे वडिल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते त्यामुळे लालाजींचे सुरूवातीचे शिक्षण त्याच शाळेत पुर्ण झाले. बालपणापासुन ते अभ्यासात हुशार होते. शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर 1880 साली कायद्याचे शिक्षण घेण्याकरीता लाहौर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवी मिळवली.

कायद्याचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते एक चांगले वकील देखील झाले. काही काळ त्यांनी वकीली देखील केली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. या दरम्यान ब्रिटिशांच्या न्याय व्यवस्थेविरूध्द त्यांच्या मनात रोष उत्पन्न झाला. त्या व्यवस्थेला सोडुन त्यांनी बॅंकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला.

पीएनबी आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना – PNB ( Punjab National Bank)

लाला लजपत रायांनी राष्ट्रीय काॅंग्रेस च्या 1888 आणि 1889 या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला, पुढे 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली.

त्यांच्या निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना हिसार नगरपालीकेचे सदस्य नियुक्त करण्यात आले यानंतर ते सचिव देखील झाले. बाळ गंगाधर टिळकांनंतर लाला लजपत राय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पुर्ण स्वराज्याची मागणी केली होती. पंजाब च्या सर्वात लोकप्रीय नेत्यांमधे लाला लजपतराय यांची गणना होऊ लागली.

स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामधे सहभागी झाले. या सम्मेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

लाला लजपतराय ज्यावेळी हिसार येथे वकीली करीत होते त्या काळात काॅंग्रेस च्या बैठकांना ते उपस्थित राहात असत. 1885 साली जेव्हां काॅंग्रेस चे पहिले अधिवेशन मुंबई ला झाले त्या वेळी लाला लजपत राय यांनी मोठया उत्साहाने यात सहभाग घेतला होता.

त्यांच्या कार्याला पाहाता 1920 साली त्यांना नॅशनल काॅंग्रेस चे प्रेसिडेंट म्हणुन नियुक्त करण्यात आले.

लाला लजपत राय अश्या व्यक्तिमत्वाचे धनी होते की त्यांना कुणालाही प्रभावीत करण्याची क्षमता त्यांच्यात होती व देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. ते एक प्रामाणिक देशभक्त होते. यामुळेच ते हिसार वरून लाहौर येथे स्थायीक झाले. या ठिकाणी पंजाब उच्च न्यायालय होते. येथे राहुन समाजाकरता त्यांनी अनेक विधायक कामं केलीत.

याशिवाय त्यांनी संपुर्ण देशात स्वदेशी वस्तु स्विकारण्याकरता एक अभियान चालवले. 1905 मधे ज्यावेळी बंगाल चे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडुन विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.

सायमन कमिशनचा विरोध शांततेने करण्याची लालाजिंची ईच्छा होती. त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पैनल मधे भारतिय राहु शकत नाहीत तर या कमिशन ने भारतातुन परत जावे. परंतु ब्रिटीश सरकार त्यांची ही मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठीचार्ज सुरू केला या अमानुष लाठीचार्ज मधे लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांची प्रकृती खालावत गेली.

लाला लजपत राय यांचे निधन – Lala Lajpat Rai Death

या घटनेमुळे त्यांचे मनोबल खचले होते व त्यांची प्रकृती देखील खालावत गेली आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी स्वराज्याचा हा उपासक आपल्यातुन कायमचा निघुन गेला. भारताच्या स्वातंत्र्याचा हा महानायक लाला लजपत राय. यांचे जिवन म्हणजे संघर्षाची महागाथा आहे.

आपल्या जीवनात देशाकरीता अनेक लढाया त्यांनी लढल्या. देशाची निरंतर सेवा केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरीता अथक परिश्रम केले. त्यांच्या त्यागाला हा देश निरंतर स्मरणात ठेवेल.

Read More:

Baba Amte Biography

लक्ष्य दया: तुमच्या जवळ लाला लजपत राय बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “लाला लजपत राय – Lala Lajpat Rai Biography ला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट:  लाला लजपत राय – Lala Lajpat Rai यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Previous Post

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती

Next Post

RSS ला नवा विचार देणारे भारत रत्न नानाजी देशमुख

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
June 17, 2023
Next Post
Nanaji Deshmukh

RSS ला नवा विचार देणारे भारत रत्न नानाजी देशमुख

Ramesh Bhatkar

मराठी रंगभुमिवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे रमेश भाटकर

Sachin Tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची जीवनी

Makarand Anaspure

मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे

Ganesh Utsav Information in Marathi

गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved