जाणून घ्या ३१ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

31 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची तसचं, जन्मदिन व निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३१ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 31 August Today Historical Events in Marathi

31 August History Information in Marathi
31 August History Information in Marathi

३१ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 August Historical Event

 • सन १९४७ साली भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली. ही प्रमाण वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा साडे पाच तासाने पुढे आहे.
 • सन १९६८ साली भारतात टू-स्टेज राउंडिंग रॉकेट रोहिणी-एमएसवी १ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
 • सन १९७१ साली अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट(David Scott) हे चंद्रावर मोटारगाडी चालविणारे  पहिले मानव बनले. तर,  चंद्रावर पाऊल ठेवणारे ते सातवा मानव ठरले.
 • सन १९९६ साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

३१ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 31 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८७१ साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सय्यद हसन इमाम यांचा जन्मदिन.
 • सन १९०२ साली प्रख्यात भारतीय सर्कस रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्मदिन.
 • सन १९१९ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक लेखिका, कादंबरीकार, निबंधकार आणि कवयत्री अमृता प्रीतम यांचा जन्मदिन.
 • सन १९४० साली प्रतिष्ठित मुर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित प्रथम महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन.
 • सन १९६९ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज जवगल श्रीनाथ यांचा जन्मदिन.

३१ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 31 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९५० साली भारतीय गणितज्ञ सुब्बया शिवशंकरनारायण पिल्लई यांचे निधन.
 • सन १९९५ साली भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंह यांचे निधन.
 • सन २०१६ साली भारतीय उर्दू कवी, कादंबरीकार, नाटककार आणि साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकिर यांचे निधन.

मित्रांनो, हा लेख आपणास ३१ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या घटनांची माहिती दर्शवितो. सामन्य ज्ञानाच्या दृष्टीने हा लेख आपल्या साठी खूप महत्वाचा आहे. तरी आपण या लेखाचे वाचन करून इतरानाही हा लेख पाठवा धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top