जाणून घ्या 31 मार्च रोजी येणारे दिनविशेष

 31 March Dinvishesh

आजच्या दिनाचे महत्व सांगायचे म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप (31 March Today Historical Events in Marathi)  महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी आपल्या देशातील पहिल्या चिकित्सक महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन. ब्रिटीश कालीन भारतात परदेशातून डॉक्टर ची पदवी ग्रहण करून भारतात येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.

याव्यतिरिक्त, संविधानाची निर्मिती करणारे महान तत्वज्ञानी डॉ. भीमराव आंबेडकर यांना आजच्या दिवशी सन १९९० साली त्यांच्या मरणोपरांत देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आला.

जाणून घ्या ३१ मार्च रोजी येणारे दिनविशेष –  31 March Today Historical Events in Marathi

31 March History Information in Marathi

३१ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 March Historical Event

 • इ.स. १६६५ साली मुघल बादशाहा औरंगजेब यांचे सेनापती मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरवात केली.
 • सन १८६७ साली डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी लोकांमध्ये आस्तिकतेचा भाव जागृत करण्यासाठी पुण्यात प्रार्थना समाजाची स्थापना केली.
 • इ.स. १८८९ साली डिझायनर गुस्ताव एफिल यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या फ्रांस देशातील स्थित आयफेल टॉवरचे उद्घाटन तत्कालीन फ्रान्स राष्ट्राचे पंतप्रधान पियरे तिरार्ड यांनी केले.
 • सन १९०१ साली पहिली मर्सिडीज गाडी तयार करण्यात आली. तसचं, ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्याकरिता ही गाडी तयार करण्यात आली होती त्यांच्या मुलींचे नाव या गाडीला देण्यात आले.
 • इ.स. १९२७ साली ब्रिटीश भारतातील महाराष्ट्रीयन समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत तसचं, महाराष्ट्रीयन ज्ञानकोशाचे जनक डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीयन ज्ञान कोषाचे २३ खंड प्रकशित केले.
 • सन १९६६ साली रशियाने आपले लुना १० हे अंतराळयान पुर्थ्वीच्या व्यासपीठावरून चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
 • इ.स. १९७० साली सयुक्त राज्य अमेरिकेचे अंतराळयान एक्सप्लोरर १ हे अंतराळात भ्रमण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले.
 • सन १९९० साली डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
 • इ.स. १९९७ साली भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केल्याप्रकरणी युनेस्कोतर्फे देण्यात येणाऱ्या कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • सन २००१ साली महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी आपल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील १०,००० धावा पूर्ण करून विश्वविक्रम रचला.
 • इ.स. २००७ साली अमेरिकन जागतिक जलतरणपटू माइकल फेल्फ्स यांनी सहा सुवर्ण पदक जिंकले.
 • सन २०११ साली भारत देशांत झालेल्या जणगणनेनुसार देशांतील लोकसंख्येत वाढ होऊन भारताची लोकसंख्या १२१ करोड पर्यंत गेली. दहा वर्षापूर्वी केल्या गेलेल्या जणगणनेच्या तुलनेने हे प्रमाण १७.६४ टक्के होते.

३१ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –  31 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १५०४ साली पंजाब राज्याच्या मुक्तसर जिल्ह्यातील सराय नागा या गावी शिखांचे दुसरे गुरु ‘गुरु अंगद सिंह’  यांचा जन्म झाला.
 • सन १७७४ साली ब्रिटीश कालीन भारतात प्रथम पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले.
 • इ.स. १८४३ साली महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला.
 • सन १८६५ साली भारतातील पहिल्या महिला चिकित्सक आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्मदिन
 • इ.स. १८७१ साली ब्रिटीश कालीन भारतातील बेळगाव येथील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, तसेच, कर्नाटकी सिह व कर्नाटकचे खादी भगीरथ म्हणून ओळखले जाणारे भारतीय क्रांतिकारक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली केरळ राज्यातील प्रसिद्ध मल्याळम भाषिक लेखिका कमला सुरय्या यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३८ साली दिल्ली या केंद्र्शाशित प्रदेशातीचे सर्वात जास्त काळापर्यंत मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या राजकारणी शीला दीक्षित यांचा जन्मदिन.
 • सन १९४५ साली भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सदस्या मीरा कुमार यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९५० साली भारतातील उडीसा राज्याच्या बारगडमधील ‘लोक कबीरत्न’ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. हलधर नाग यांचा जन्मदिन.
 • सन १९७२ साली ट्विटरचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान क्लार्क विल्यम्स यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९८७ साली भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर हम्पी कोनेरू यांचा जन्मदिन.

३१ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 March Death/ Punyatithi/ Smrutidin

 • इ.स. १७२७ साली इंग्लिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि लेखक व तत्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचे निधन.
 • सन १९२६ साली ब्रिटीश कालीन भारतातील महाराष्ट्रीयन भारतीय इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसणीस यांचे निधन.
 • इ.स. १९३१ साली भारतीय पंजाबी कवी, वैज्ञानिक आणि गुढवादी प्रोफेसर पूरन सिंह यांचे निधन.
 • सन १९७२ साली प्रख्यात भारतीय चित्रपट अभिनेत्री महजबीन बानो उर्फ मीनाकुमारी यांचे निधन.
 • इ.स. २००८ साली भारतीय केरळ राज्यातील कवी एम. आर. रामकृष्ण पणिक्कर यांचे निधन.
 • सन २००८ साली अमेरिकन शैक्षणिक, प्रिन्सटन विद्यापीठाचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट फ्रान्सिस गोहेन यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top