Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

5 April Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, आजच्या दिवशी सन १९३० साली राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या अनुयायांसोबत दांडी येथे पोहचले. इंग्रज सरकारने लावलेल्या मिठावरील कर रद्द करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही यात्रा काढली होती. महात्मा गांधी यांनी दांडी येथे पोहचून समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. ही स्वातंत्र्यपूर्व इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी घटना आहे.

तसचं, आजच्या दिवशी आधुनिक काळात लागलेले ऐतिहासिक शोध, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती (5 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

जाणून घ्या ५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 5 April Today Historical Events in Marathi

5 April History Information in Marathi

५ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 April Historical Event

  • सन १६६३ साली पुणे शहरात संध्याकाळी निघालेल्या लग्नाच्या वरातीचा फायदा घेत शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती शहिस्तेखान राहत असलेल्या लाल किल्याच्या दरबारात प्रवेश करून रात्रीच्या वेळी शहिस्तेखानची बोटे छाटली.
  • इ.स. १६७९ साली मुघल शासक झुल्फिखार खान यांनी राजाराम महाराज यांना पकडण्यासाठी महाराज राहत असलेल्या रायगड किल्ल्याला वेढा दिला त्यावेळी राजाराम महाराज रायगडावरून प्रताप गडावर गेले.
  • सन १९३० साली राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या अनुयायांसोबत मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी येथे पोहचले.
  • इ.स. १९५५ साली ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • सन १९५७ साली केरल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत कम्युनिस्ट पक्षाने ६० जागा जिंकल्या व ई॰ एम॰ एस॰ नंबूदिरीपाट हे केरळ राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.
  • इ.स. १९६१ साली भारत सरकारने पहिल्या ‘इंडियन ड्रग्स एंड फार्मास्यूटिकल लिमिटेड कंपनी‘ ची स्थापना केली.
  • सन १९७९ साली भारतीय नौदलाचे पहिले संग्राहलय मुंबई येथे सुरु करण्यात आले.
  • इ.स. २००० साली डी.डी-१० या मराठी वाहिनीच्या नावात रुपांतर करून त्या वाहिनीचे ‘सहयाद्री’ असे नामकरण करण्यात आले.

५ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८२७ साली ब्रिटिश शल्यचिकित्सक आणि पूतिनाशक शस्त्रक्रियेचे प्रणेते सर जोसेफ लिस्टर यांचा जन्मदिन.
  • सन १८५६ साली अमेरिकन शिक्षक, लेखक, वक्ते आणि अमेरिकेच्या एकाधिक अध्यक्षांचे सल्लागार बुकर टी. वाशिंग्टन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०१ साली भारतीय गणितज्ञ सुब्बया शिवशंकरनारायण पिल्लई यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व राजकारणी तसचं, भारतातील पहिले दलित उपपंतप्रधान बाबूजी उर्फ जगजीवनराम यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०९ साली अमेरिकन ‘जेम्स बाँड’ चित्रपटाचे निर्माते आल्बर्ट रोमोलो ब्रोकोली यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली भारतीय हॉकीपटू बलबीर सिंग कुलर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५२ साली भारतीय-ब्रिटीश-अमेरिकन स्ट्रक्चरल जीवशास्त्रज्ञ व रसायनशास्त्राचे नोबल पारितोषिक विजेते व्यंकटरमन रामकृष्णन यांचा जन्मदिन.
  • सन १९७४ साली माउंट एवरेस्ट पर्वत सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक डिकी डोल्मा यांचा जन्मदिन.

५ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 April Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९२२ साली भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्तीच्या प्रणेता व समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचे निधन.
  • इ.स. १९४० साली इंग्लिश मिशनरीचे पंडित, शिक्षक व भारतीय समाजसुधारक तसचं, रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांचे मित्र चार्ल्स फ्रीअरी अँड्र्यूज यांचे निधन.
  • सन १९९३ साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे अपघाती निधन.
  • इ.स. १९७६ साली भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू रुस्तमजी जमशेदजी दोराबजी जमशेदजी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved