जाणून घ्या ५ मे रोजी येणारे दिनविशेष

5 May Dinvishes

मित्रानो, आजचा दिवस हा जगभरातील वेगवेगळ्या देशाचा महत्वपूर्ण दिन आहे जसे की, इ.स. १८३८ पासून गुयाना हे राष्ट्र ५ मे हा दिवस भारतीय आगमन दिनाच्या रूपाने साजरा करतो. तर, डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया या देशाचा मुक्ती दिवस आहे. जपान व कोरिया देशांत बाल दिन म्हणून साजरा करतात. तर अल्बानिया देश आजचा दिवस हा शहीद दिन मानतो. अश्या प्रकारे आजचा दिवस हा मानला जातो. याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन तसचं त्यांचे कार्य आदि घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ५ मे रोजी येणारे दिनविशेष – 5  May Today Historical Events in Marathi

5 May History Information in Marathi

 

५ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 May  Historical Event

 • इ.स. १२६० साली कुबलाई खान हे मंगोलियन सम्राट बनले.
 • सन १८८३ साली राष्ट्रीय चळवळीचे संस्थापक तसचं, एक पत्रकार म्हणून कर्तव्य बजावत असतांना  तुरुंगात जाणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले भारतीय पत्रकार ठरले.
 • इ.स. १८९३ साली अमेरिकेत उद्भवलेली पॅनिक ही एक गंभीर प्रकारची आर्थिक उदासीनता होती. इ.स. १८९० साली गव्हाचे उत्पादन अपयशी ठरले शिवाय ब्वेनोस एयर्समध्ये झालेली घटना नुकतीच संपली त्यामुळे तेथील जनतेत महागाई बाबत गोंधळ उडाला परिणामी न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळून देशभर मंदी पसरली.
 • सन १९०१ साली विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
 • इ.स. १९२० साली पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर पॅरिसमध्ये रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीज (आयएफआरसी) या आंतरराष्ट्रीय महासंघाची स्थापना करण्यात आली.
 • सन २००५ साली ब्रिटन देशांतील लेबर पार्टीचे नेता टोनी ब्लेयर यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
 • इ.स. २०१० साली इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी(विद्यापीठ) ने (इग्नू) सर्व कोर्समधील लैंगिक कामगार आणि त्यांच्या आश्रीतांचे शुल्क माफ करण्याची घोषणा केली.
 • सन २०१७ साली सार्क उपग्रह म्हणून ओळखला जाणारा दक्षिण एशिया उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

५ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १४७९ साली शीख धर्मीय बांधवांचे तिसरे गुरु गुरु अमरदास जी यांचा जन्मदिन. गुरु अमरदास यांनी शीख धर्माचे गुरु होण्याआधी ते हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेचे पालन करीत असत.
 • सन १८१८ साली जर्मन तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय सिद्धांत, पत्रकार आणि समाजवादी क्रांतिकारक कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९११ साली ब्रिटीश कालीन भारतीय उपखंडातील बंगाली क्रांतिकारक व शिक्षिका प्रीतीलता वडेदार यांचा जन्मदिन.
 • सन १९१६ साली भारताचे माजी (७ वे) राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२९ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध क्रांतिकारक अब्दुल हम्मिद कैसर यांचा जन्मदिन.
 • सन १९३५ साली राष्ट्रीय पुरस्कार तसचं, हिंदी साहित्य संस्था व गुजरात गौरव पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रकार, लेखक, व्यंगचित्रकार, पत्रकार, पर्यावरणवादी, नाटककार आणि पटकथा लेखक आबिद सुरती यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३७ साली परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्य अधिकरी कर्नल होशियार सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९५४ साली भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेता व हरियाणा राज्याचे विद्यमान (१० वे) मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९७० साली प्रसिद्ध भारतीय नेमबाज समरेश जंग यांचा जन्मदिन.

५ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5  May Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८२१ साली फ्रांस देशाचे पहिले सम्राट, राजकारणी आणि लष्करी नेता नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
 • सन १९१८ साली भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक कवी विशेषतः बालकवी म्हणून प्रख्यात असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे निधन.
 • इ.स. १९८९ साली ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष इत्यादी विविध महत्वपूर्ण पदे सांभाळणारे भारतीय उद्योगपती नोएल नवल टाटा यांचे निधन.
 • सन १९४५ साली भारतीय शास्त्रीय गायन घराण्यातील ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक व मराठी संगीत नाटकांचे गीतकार रामकृष्णबुवा वझे यांचे निधन.
 • इ.स. २००६ साली भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक व भारतीय संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचे निधन.
 • सन २००७ साली लेसर किरणांचा शोध लावणारे प्रख्यात अमेरिकन अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ हैरोल्ड मैमन यांचे निधन.
 • इ.स. २०१२ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू रमण सुरेंद्रनाथ यांचे निधन.
 • सन २०१७ साली भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला लीला सेठ यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here