Tuesday, September 19, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

6 April Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा राजकारण आणि खेळ या दोन गोष्टीसाठी महत्वाचा आहे.  सन १९५१ साली राजकारणी श्याम प्रसाद मुखर्जी यांच्याद्वारे स्थापित भारतीय जनसंघ पक्षाच्या अंतर्गत सन १९८० साली देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.

याचप्रकारे, आजचा दिवस हा खेळ प्रेमींसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी इ.स. १८९६ साली ग्रीस देशातील अथेन्स या शहरात प्रथम आधुनिक ऑलम्पिक खेळ खेळण्यास सुरुवात झाली. तसचं, आजच्या दिनी घडलेल्या सर्व घटनांची माहिती (6 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

जाणून घ्या ६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 6 April Today Historical Events in Marathi

6 April History Information in Marathi

६ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 April Historical Event

  • इ.स. १६५६ साली शिवाजी महाराजांनी झावडीच्या मोरेंचा पराभव करून रायगड किल्ला जिंकला व त्या गडाला आपल्या स्वराज्याची राजधानी घोषित केलं.
  • सन १८९६ साली ग्रीक सम्राट थेडोसियस पहिला यांनी घातलेल्या बंदीमुळे जवळपास १५०० वर्ष बंद असलेले ऑलम्पिक खेळ,  ग्रीस देशातील अथेन्स या शहरात आधुनिकरित्या खेळण्यास सुरुवात झाली.
  • इ.स. १९१७ साली पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जर्मन देशाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • सन १९३० साली महात्मा गांधी यांनी दांडी येथील समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून इंग्रज सरकारने मिठावर लावलेला कर कायदा मोडून काढला.
  • इ.स. १९६६ साली भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी पाल्कची समुद्रधुनी पोहून पार केली.
  • सन १९८० साली भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. २००० साली रशिया देशातील अंतरीक्ष प्रयोग शाळा मीरला जीवनदान देण्यासाठी सोडलेले सोयुझ हे अंतराळयान मीर या अंतरीक्ष प्रयोग शाळेला भेटले. त्यामुळे त्या प्रयोग शाळेला एकाप्रकारे नवसंजीवनीच मिळाली.

६ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८६ साली ब्रिटीश कालीन भारतातील सर्वात मोठी रियासत हैदराबाद येथील निजाम संस्थेचे शेवटचे शासक निजाम उस्मान अली खान यांचा जन्मदिन.
  • सन १८९० साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, तसचं अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची डी.लिट मानद प्राप्त करणारे दुसरे उर्दू कवी व लेखक अली सिकंदर उर्फ जिगर मुरादाबादी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली अमेरिकन डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे निर्माता, उद्योगपती आणि अभियंता डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्यारेलाल खंडेलवाल यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२८ साली अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ नोबल पुरस्कार विजेते जेम्स डेवे वॉटसन यांचा जन्मदिन. तसचं, त्यांनी फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्किन्स यांच्या सोबत मिळून डीएनए रेणूची संरचना स्पष्ट केली.
  • सन १९३१ साली भारतीय बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५६ साली माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक दिलीप वेंगसकर यांचा जन्मदिन.
  • सन १९७१ साली प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय सुरी यांचा जन्मदिन.

६ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 April Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १९१९ साली इंग्लंडचे पहिले राजा रिचर्ड यांचे निधन.
  • सन १९७३ साली भारतीय केरळ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निबंध लेखक मल्याळम साहित्य समिक्षक कारिककट्ट मराठू कुट्टीकृष्ण मारार यांचे निधन.
  • इ.स. १९८३ साली माजी भारतीय सैन्य दल प्रमुख आणि सेनापती जनरल जयंत नाथ चौधरी यांचे निधन.
  • सन १९९० साली माकप नेते व राजकारणी तसचं कामगार संघटनेचे नेते भालचंद्र त्र्यंबक रणदिवे यांचे निधन.
  • इ.स. १९९२ साली अमेरिकन विज्ञानकथा लेखक व प्राध्यापक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन.
  • सन २००१ साली भारताचे माजी ६ वे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे निधन.
Previous Post

जाणून घ्या ५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Next Post

मनातील जुन्या आठवणींना ताज करणाऱ्या पावसावर मराठी कोट्स

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Status on Rain in Marathi

मनातील जुन्या आठवणींना ताज करणाऱ्या पावसावर मराठी कोट्स

Steve Jobs Biography in Marathi

एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स चा जीवन परिचय

Bhagwan Mahavir Swami Information in Marathi

 भगवान महावीरांची महान जीवन गाथा

7 April History Information in Marathi

जाणून घ्या ७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Shikshan var Ghosh Vakya

मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्व सांगणारे काही घोषवाक्ये....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved