जाणून घ्या 6 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

6 January Dinvishesh 

६ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 January Today Historical Events in Marathi

6 January History Information in Marathi
6 January History Information in Marathi

६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 January Historical Event

 • १६७३ ला मराठी योद्धा कोंडाजी फरजंद यांनी ६० जणांना सोबत घेऊन २५०० शत्रू सैनिकांना हरवून पन्हाळा किल्याला जिंकले.
 • १८३२ ला पहिले मराठी दैनिक वृत्तपत्र दर्पण चा पहिला अंक प्रकाशित.
 • १९२९ ला रोग्यांची आणि गरिबांची सेवा करण्यासाठी वयाच्या १९ व्या वर्षी संत मदर तेरेसा भारतामध्ये आल्या.
 • १९४६ ला आजच्या दिवशी विएतनाम येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या.
 • १९८९ ला केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना इंदिरा गांधींच्या हत्या करण्याच्या गुन्हात फाशीची शिक्षा देण्यात आली.
 • १९९४ ला सिडनी टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीम ने ऑस्ट्रेलिया च्या टीम ला ५ रन नी हरविले.

६ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –6 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८१२ ला दर्पण वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म.
 • १९१० ला प्रसिद्ध भारतीय गायक जी. एन. बालासुब्रमनियम यांचा जन्म.
 • १९१८ ला भारतीय प्रसिद्ध गायक भारत व्यास यांचा जन्म.
 • १९२८ ला प्रसिद्ध मराठी लेखक विजय तेंडुलकर यांचा जन्म.
 • १९४० ला प्रसिद्ध भारतीय लेखक नरेंद्र कोहली यांचा जन्म.
 • १९४९ ला परमवीर चक्राने सन्मानित सुभेदार बाना सिंग यांचा जन्म.
 • १९५५ ला प्रसिद्ध कलाकार मिस्टर बिन म्हणून ओळख असणारे रोवन अ‍ॅटकिन्सन यांचा जन्म.
 • १९५९ ला माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन कपिल देव यांचा जन्म.
 • १९६५ ला हिमाचल प्रदेश चे १४ वे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा जन्म.
 • १९६७ ला ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध गायक ए. आर. रेहमान यांचा जन्म.

६ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १८५२ ला आंधळ्यांसाठी ब्रेल लिपि ला शोधून काढणारे लुई ब्रेल यांचे निधन.
 • २००८ ला भारतीय ऑर्थोपेडिक सर्जन प्रमोद करन सेठी यांचे निधन.
 • २००९ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह यांचे निधन.
 • २०१७ ला भारतीय अभिनेता ओम पुरी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here