ऑस्कर पुरस्कारावर असणारी मूर्ती कोणाची असते? जाणून घ्या या लेखातून.

Oscar History in Marathi 

आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत बरेच पुरस्कार आपण पाहिले असतील मग ते दादासाहेब फाळके पुरस्कार असो की आयफा अवॉर्ड असो त्याचप्रमाणे हॉलीवूड चा सर्वोच्च सन्मान हा ऑस्कर आहे. आणि जवळ जवळ सर्वच चित्रपट हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मेहनत घेत असतात, या पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हे सुद्धा खूप कठीण असतं. चित्रपटाचा दर्जा त्यामध्ये असणारे पात्र आणि त्या पात्रांची भूमिका या सर्व गोष्टींना पहिल्या जाते त्या चित्रपटामुळे लोकांना काय शिकायला मिळाले किंवा त्या चित्रपटाचे समाजासाठी काय योगदान होते या सर्व गोष्टींची पुष्टी करत हा पुरस्कार प्रदान केल्या जातो.

आपल्याला सुध्दा या पुरस्काराविषयी माहिती असेलच पण बऱ्याच लोकांच्या मनात हा विचार आलेला असेल की या पुरस्कारावर असणारी मूर्ती ही कोणाची असते? तर आपण आजच्या तेच लेखात पाहणार आहोत तर चला पाहूया..

ऑस्कर पुरस्कारावर कोणाची मूर्ती आहे? – Who was The Model for the Oscar Statue

Who was The Model for the Oscar Statue
Who was The Model for the Oscar Statue

ऑस्कर च्या पुरस्कारावर कोणाची मूर्ती असते? – Who is model for the Oscar Award

ऑस्कर च्या पुरस्कारावर असणारी मूर्ती ही कोण्या व्यक्तीची नसून ती एक प्रतिमा तयार करण्यात आलेली होती. १९२७ साली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स (Academy of Motion Picture Arts and Sciences) च्या बैठकीमध्ये जेव्हा या पुरस्काराच्या मूर्तीला घेऊन चर्चा झाली होती तेव्हा प्रत्येक कलाकाराला आपापल्या आवडीच्या मूर्तीच्या डिझाईन समोर ठेवण्याचे सांगितले होते, तेव्हा मूर्तिकार जॉर्ज स्टॅनली (George Stanley) यांनी निवडलेल्या प्रतिमेला पुरस्कारावर ठेवण्यात येणाऱ्या मूर्ती साठी मान्यता मिळाली.

ऑस्कर विषयी थोडक्यात – History of Oscar

या मूर्ती मध्ये एक व्यक्ती कॅमेराच्या रोल वर उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या हाती एक तलवार असल्याचे आपल्याला दिसते. ही मूर्ती जॉर्ज स्टॅनली यांच्या पसंतीची होती. या ऑस्कर पुरस्काराच्या ट्रॉफी १९२९ पासून तर आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त वितरित करण्यात आलेल्या आहेत. या ट्रॉफीला बनविण्याचे कार्य शिकागो च्या आर.एस.ऑइन्स अँड कंपनीला देण्यात आले आहे. त्यांना पन्नास ट्रॉफी बनविण्याकरिता ३ ते ४ आठवड्यांचा वेळ लागतो.

सुरुवातीला या ट्रॉफी तांब्याच्या बनविल्या जायच्या कारण विश्व युद्धाच्या दरम्यान धातूंची कमतरता होती. आणि विशेष करून तेव्हा या ट्रॉफीला तांब्याच्या धातूचा वापर करून निर्माण केल्या जात असे.

पण आता या ट्रॉफी ला ब्रिटेनियम धातू चा वापर करून बनविल्या जाते आणि त्यावर सोन्याचे पाणी चढविल्या जाते. ऑस्कर च्या ट्रॉफी ला जर लांबी ने मापले तर तेरा इंच एवढी लांब ही ट्रॉफी असते. त्यांनंतर या ट्रॉफीचे वजन आठ पाउंड एवढे असते. या ट्रॉफी ला मिळविण्यासाठी अनेक कलाकार आपल्यापरीने प्रयत्न करतात.

वरील लेखामध्ये आपण ऑस्कर च्या ट्रॉफी विषयी तसेच ऑस्करच्या ट्रॉफी वर असणाऱ्या मूर्ती विषयी असलेली माहिती पाहिली, आशा करतो वरील लिहिलेली माहिती आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, आणि आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here