Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ६ जून रोजी येणारे दिनविशेष

6 June Dinvishes

 मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची तसचं, आधुनिक काळात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रानो, पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात सुरु असलेले ऑपरेशन ब्लूस्टार आजच्या दिवशी संपले होते. भारतीय लष्करी दलाने फत्ते केलेली ही एक यशस्वी कामगिरी होती. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन, निधन असणाऱ्या महान व्यक्तींबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ६ जून रोजी येणारे दिनविशेष – 6 June Today Historical Events in Marathi

6 June History Information in Marathi
6 June History Information in Marathi

६ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 June Historical Event

  • इ.स. १६७४ साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्यावर राज्याभिषेक करून त्यांनी छत्रपती ही उपाधी धारण केली.
  • सन १९३० साली गोखले इन्स्टिट्युड ऑफ पॉलिटिक्स अँन्ड इकोनॉमिक्स संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६९ साली वी. एस. पांगे यांच्या शिफारशी नुसार रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • सन १९७१ साली सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
  • सन १९९९ साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती या पहिल्या भारतीय दुहेरी टेनिस स्पर्धेक भारतीय जोडीने टेनिसचा ग्रँड स्लॅम किताब आपल्या नवे केला.
  • सन २००४ साली भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला.

६ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९१ साली भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व साहित्यिक मास्ती वेंकटेश अयंगार यांचा जन्मदिन.
  • सन १९०१ साली इंडोनेशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन अभिनव मराठी ज्ञानकोशकार व लेखक गणेश रंगो भिडे यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली प्रसिद्ध भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक राजेंद्र किशन यांचा जन्मदिन.
  • सन १९३९ साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय एथलीट खेळाडू गुरुबचन सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक व राजकारणी सुनील दत्त यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य निवडकर्ता सुनील जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९९७ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य यांचा जन्मदिन.

६ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 June Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९४१ साली स्विस-अमेरिकन रेस कार चालक व शेवरलेट मोटर कार कंपनीचे सह-संस्थापक आणि फ्रोंटेनाक मोटर कॉर्पोरेशनचे संस्थापक लुईस शेव्रोले (Louis Chevrolet) यांचे निधन.
  • सन १९६१ साली स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग (Carl Gustav Jung) यांचे निधन.
  • सन १९७६ साली अमेरिकन वंशीय ब्रिटीश पेट्रोल- उद्योगपती जे. पॉल गेटी (J. Paul Getty) यांचे निधन.
  • सन १९८२ साली भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचे निधन.
  • सन १९८४ साली शीख संघटना दमदमी टकसालचे प्रमुख लष्करी नेते आणि खलिस्तान चळवळीचे नेता जरनैल सिंह भिंडरांवाले यांचे निधन.
  • सन १९८६ साली भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व साहित्यिक मास्ती वेंकटेश अयंगार यांचे निधन.
  • सन २००२ साली ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार शांता जनार्दन शेळके यांचे निधन.
Previous Post

“वटपौर्णिमेच्या मागे आहे हि पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल”

Next Post

प्रतापगड किल्ला इतिहास

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Pratapgad Fort Information in Marathi

प्रतापगड किल्ला इतिहास

Tea Benefits in Marathi

तुम्हाला चहा खूप आवडतो का? मग हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे नक्की वाचा

7 June History Information in Marathi

जाणून घ्या ७ जून रोजी येणारे दिनविशेष

Anjali Bhagwat Information in Marathi

महाराष्ट्राची शान असलेल्या जगप्रसिद्ध भारतीय नेमबाज अंजली भागवत यांचा जीवन परिचय

Sinhagad Fort Information in Marathi

सिंहगड किल्ला माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved