जाणून घ्या ८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

8 April Dinvishesh

मित्रानो, स्वातंत्र्यपूर्व भारतातील ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात इंग्रज सरकारचे शासन असतांना, भारतीय इंग्रज सैनिक व क्रांतिकारक मंगल पांडे यांनी इंग्रज सैनिकांवर गोळीबार केला. यामुळे त्यांना पकडून सन १८५७ साली फाशी देण्यात आली.

तसचं, दुसरी ब्रिटीश भारतातील ऐतिहासिक घटना म्हणजे वीर क्रांतिकारक भगतसिंग व त्यांचे साधीदार बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या असेम्ब्लीच्या मध्य भागी बॉम्ब फेकले. ब्रिटीश सरकारचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करणे हाच त्यामागील मुख्य उद्देश होता. अश्याच प्रकारच्या आनखी काही घटना आपण या लेखाच्या माध्यमातून (8 April Today Historical Events in Marathi)) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 8 April Today Historical Events in Marathi

8 April History Information in Marathi

८ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8  April Historical Event

 • सन १९११ साली डच येथील भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
 • इ.स. १९२९ साली भारतीय क्रांतिकारक भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या क्रांतिकारकांनी दिल्ली येथील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले.
 • सन १९५० साली भारत आणि पाकिस्तान या दोन दक्षिण-आशियाई राज्यांमध्ये लियाकत-नेहरू या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. या करारानुसार निर्वासित नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यास परवानगी मिळाली.
 • इ.स. १९५० साली भारतीय समाज सुधारक राजाराम मनोहर राय इंग्लंड देशांत पोहचले.
 • सन १९६४ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले जेमिनी-१ हा उपग्रह प्रक्षेपित केला.
 • इ.स. २००८ साली आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात राहत असलेल्या शीख समुदायाला राज्य सरकारने अल्पसंख्याक वर्गाचा दर्जा दिला.

८ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. पूर्व ५६३ साली तत्वज्ञानी, सुधारवादी, ध्यानधारक, अध्यात्मिक शिक्षक आणि प्राचीन भारतात वास्तव्य करणारे धार्मिक नेते गौतम बुद्ध यांचा जन्मदिन.
 • सन १८९२ साली बांगलादेश येथील राजा, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ता हेमचंद्र राय चौधरी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२४ साली भारतीय शास्त्रीय गायक कुमार गंधर्व उर्फ शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ यांचा जन्मदिन.
 • सन १९२८ साली भारतीय लोकप्रिय महाराष्ट्रीयन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी भाषिक लेखक रणजीत देसाई यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३८ साली घाना देशातील मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सरचिटणीस कोफी अट्टा अन्नान यांचा जन्मदिन. सातव्या क्रमांकाचे सरचिटणीस होते.
 • सन १९७९ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त भारतीय सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शिक व गायक अमित त्रिवेदी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९८३ साली प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन यांचा जन्मदिन.

एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८५७ साली इंग्रज सरकारच्या शासनातील भारतीय सैनिक व महान क्रांतीकार मंगल पांडे यांचे निधन.
 • सन १८८१ साली स्पॅनिश चित्रकार, शिल्पकार, प्रिंटमेकर, कुंभारकामविषयक, रंगमंच डिझायनर, कवी आणि नाटककार पाब्लो पिकासो यांचे निधन.
 • इ.स. १८९४ साली भारतीय राष्ट्रगीत वंदेमातरम् चे निर्माता, निबंधकार, कादंबरीकार, कवी, तत्वज्ञ, सुधारक आणि पत्रकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन.
 • सन १९२२ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक, संगीतकार आणि शिक्षक भास्कर रघुनाथ बखले यांचे निधन.
 • इ.स. १९५३ साली भारतातील पहिल्या आधुनिक शिपयार्ड, विमान कारखाना व कार कारखान्याची निर्मिती करणारे भारतीय उद्योगपती आणि वालचंद समूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद धोशी यांचे निधन.
 • सन १९७४ साली महाराष्ट्रीयन नटश्रेष्ठ मराठी नाट्य अभिनेते गोपाळ गोविंद फाटक उर्फ नानासाहेब फाटक यांचे निधन.
 • इ.स. २०१३ साली ब्रिटीश देशाच्या माजी पंतप्रधान तसचं, आयर्न लेडी म्हणून प्रख्यात ब्रिटीश राज्यकर्त्या मार्गारेट हिल्डा थॅचर यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top