Mangal Pandey chi mahiti
मंगल पांडे एक असे विर योध्दा होते ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटवली आणि ब्रिटिशांना आपल्या निर्भय व्यक्तिमत्वाच्या जोरावर भारतियांच्या ताकदीची जाणीव करून दिली.
त्यांनी जन्माला घातलेल्या विद्रोहामुळेच प्रत्येक भारतियाच्या मनात स्वातंत्र्य प्राप्ती ची ईच्छा प्रबळ झाली आणि पुढे कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्तता मिळाली…
मंगल पांडे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते देशाच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती देणाÚया असंख्य स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आजही मंगल पांडेचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतले जाते…
या लेखातुन स्वातंत्र्य समरातील पहिले क्रांतीकारी मंगल पांडे यांच्या जीवनाविषयी काही महत्वपुर्ण गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
महान क्रांतिकारी मंगल पांडे – Mangal Pandey Information in Marathi
मंगल पांडे यांचा जिवन परिचय – Mangal Pandey Biography
पुर्ण नाव (Name) | मंगल पांडे |
जन्म (Birthday) | 19 जुलै 1827, नगवा, बलिया, उत्तर प्रदेश, भारत |
वडिल (Father Name) | दिवाकर पांडेय |
आई (Mother Name) | अभय रानी पांडेय |
कार्य (Work) | 1857 साली स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतवणारे पहिले भारतिय |
मंगल पांडे यांच्यावर आधारीत चित्रपट (Movie) | मंगल पांडे: दि राइजिंग |
मृत्यु (Death) | 8 एप्रील 1857 ( वयाच्या 29 व्या वर्षी) बैरकपुर, पश्चिम बंगाल, भारत |
मंगल पांडेंचा जन्म आणि परिवार – Mangal Pandey History
स्वातंत्र्य समरात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या मंगल पांडेंचा जन्म 19 जुलै 1827 ला उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हयातील नगवा गावी एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता.
त्यांच्या वडिलांचे नाव दिवाकर पांडे आणि आईचे नाव अभय राणी पांडे असे होते. कुटुंबांची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने परिवाराच्या गरजा आणि स्वतःच्या उपजिवीकेसाठी मंगल पांडे जवळपास वयाच्या 22 व्या वर्षी 1849 साली ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाले.
पुढे त्यांच्यातील प्रतिभेने प्रभावित होत त्यांना ब्रिटिश आर्मीतील 34 व्या बंगाल नैटिव इन्फेंन्ट्री मध्ये पदोन्नती देण्यात आली…
ब्रिटिश आर्मीत मंगल पांडे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांत मतभेद – Mangal Pandey Story
1949 साली ज्यासुमारास स्वातंत्र्य समराचे अग्रणी मंगल पांडे यांनी ब्रिटिश आर्मीत प्रवेश केला त्याकाळात भारतियांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या असंख्य अत्याचारांना सहन करावे लागत होते.
इंग्रजांची गुलामी करणारी भारतिय जनता ब्रिटीशांच्या अत्याचारांना त्रासलेली होती. यादरम्यान समस्त भारतियांना ब्रिटीशांच्या अत्याचारापासुन कायमची मुक्तता मिळविण्याची प्रबळ ईच्छा मनात जागृत झाली होती.
या सुमारास मंगल पांडे ज्या सैन्यात होते त्या सेनेत एक नवी राइफल “एनफिल्ड P.53” लाॅन्च झाली होती. या रायफल मध्ये काडतुस भरण्याकरता रायफल ला तोंडाने उघडावे लागत होते याच वेळी भारतिय सैन्यात अशी अफवा पसरली होती की या रायफल ला गायीची आणि डुकराची चरबी लावण्यात आली आहे.
हे लोण भारतिय सैन्यामध्ये वाऱ्यासारखे पसरले ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांना वाटु लागले की इंग्रजांनी जाणीवपुर्वक हिंदु आणि मुस्लिमांमध्ये वैर वाढवण्याकरीता असे केले आहे.
हिंदुंना गाय पुजनिय आहे त्यामुळे इंग्रजांनी आपला धर्म जाणुनबुजुन भ्रश्ट केला आहे अशी भावना हिंदु सैंनिकांची झाली या घटनेनंतर ते ब्रिटीश सैन्याविरूध्द बंड पुकारत उभे ठाकले. सर्वांच्या मनात उद्रेक धगधगत होता.
भारतिय सैन्यामध्ये ब्रिटीशांकरवी होत असलेल्या भेदभावामुळे पुर्वीच असंतोश होता, आणि या काडतुस प्रकरणामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
9 फेब्रुवारी 1857 ला ज्यावेळी या रायफल चे सैन्यामध्ये वितरण करण्यात आले तेव्हां मंगल पांडे यांना देखील त्याचा वापर करण्याचे फर्मान ब्रिटीश अधिकाऱ्याने सुनावले.
परंतु राष्ट्रभक्त मंगल पांडे ने या रायफल चा वापर करण्यास साफ नकार दिला ज्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्याने मंगल पांडेची वर्दी उतरविण्याचे आणि रायफल काढुन घेण्याचे आदेश दिलेत परंतु आपल्या निर्णयावर ठाम असणाऱ्या मंगल पांडे ने हे आदेश देखील धुडकावुन लावले.
या नंतर 29 मार्च 1857 ला ब्रिटिश अधिकारी मेजर हयूसन मंगल पांडेंची रायफल काढुन घेण्याकरीता पुढे गेले त्यावेळी मंगल पांडे ने त्यावर हल्ला चढविला.या दरम्यान मंगलपांडे ने आपल्या अन्य साथीदारांना देखील मदतीकरता हाक मारली परंतु इंग्रजांच्या भितीमुळे कोणीही पुढे आले नाही.
त्यावेळी निर्भय मंगल पांडे ने ब्रिटिश आर्मी आॅफिसर मेजर हयूसन ची गोळी घालुन हत्या केली आणि त्याच वेळी इंग्रज आधिकारी लेफ्टनंट बाॅब ला देखील संपविले. पण या नंतर मात्र ब्रिटिश अधिकाÚयांनी त्याला जेरबंद केले.
महान स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे ला फाशी – Mangal Pandey Capital Punishment
मंगल पांडे ने केलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येनंतर इंग्रजांच्या मनात त्याच्याविशयी भितीचे वातारण आणि दहशत पसरवली.
या घटनेनंतर काही काळ मंगल पांडे ला कैदेत ठेवण्यात आले आणि त्यानंतर कोर्ट मार्शल नुसार 6 एप्रील 1857 ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
निर्णयानुसार खऱ्या देशभक्त मंगल पांडे ला 18 एप्रील 1857 ला फाशी देण्यात येणार होती परंतू एखादया मोठया क्रांतीच्या भितीने त्यांना 10 दिवसांपुर्वीच 8 एप्रील 1857 ला फाशी दिल्या गेली.
मंगल पांडेंच्या हौतात्म्याने स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत पेटवली:
मंगल पांडे च्या विरमरणाने 1857 ला देशातील पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पेटली.
मंगल पांडेंच्या मृत्युनंतर साधारण 1 महिन्याने 10 मे 1857 ला मेरठ येथील छावणीत देखील असंतोशाचा उद्रेक झाला आणि या उद्रेकाची तिव्रता हळूहळू संपुर्ण देशभर पसरली. या विद्रोहाचे स्वरूप पुढे फार मोठे होत गेले.
क्रुर इंग्रजांनी या विद्रोहाला दाबुन टाकले परंतु त्यानंतर सुध्दा भारतियांच्या मनातील असंतोश शांत झाला नाही पुढे फार मोठी लढाई स्वातंत्र्याकरीता लढण्यात आली महान अश्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान, समर्पणा नंतर 15 आॅगस्ट 1947 ला आपला देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होवु शकला
मंगल पांडेंवर चित्रपट – Mangal Pandey Movie
भारतातील पहिले क्रांतिकारी मंगल पांडे यांच्यावर 2005 साली ‘‘मंगल पांडे दी राइजिंग स्टार’’ हा चित्रपट बनविण्यात आला. या चित्रपटात मंगल पांडे या क्रातिकारकाची मुख्य भुमिका प्रसिध्द बाॅलिवुड अभिनेता आमिर खान याने केली होती.
हा चित्रपट प्रदर्शनापुर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर देखील फार वादात अडकला होता. चित्रपटाच्या शिर्शकात आलेल्या राइजिंग स्टार व चित्रपटात मंगल पांडे चा एका वेश्येसोबत लग्नाचा प्रसंग यामुळे हा चित्रपट वादात अडकला होता.
तरी देखील इतक्या वाद विवादानंतर सुध्दा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले होते, यात आमिर खान व्यतिरीक्त बाॅलिवुड अभिनेत्री अमिशा पटेल, राणी मुखर्जी यांनी देखील प्रमुख भुमिका साकारल्या होत्या.
मंगल पांडेशी निगडीत काही विशेष गोष्टी – Mangal Pandey Facts
- स्वातंत्र्य समरातील पहिले क्रातिकारी मंगल पांडेंनी 1857 च्या उठावा वेळी ‘‘मारो फिरंगी को’’ सारखा प्रसिध्द नारा दिला होता.
- मंगल पांडें च्या बलिदाना नंतरच ब्रिटिश सरकारने सैनिकांना काडतुसावर ग्रीस म्हणुन तुप वापरण्याचा आदेश संमत केला होता.
- मंगल पांडेंनी ज्या ठिकाणी क्रुर ब्रिटीश अधिकाऱ्यावर हल्ला केला होता त्या ठिकाणी आता सुंदर अशी बाग तयार करण्यात आली असुन त्याचे नाव शहीद मंगल पांडे महाउद्यान असे ठेवण्यात आले आहे.
- प्राप्ती नंतर 5 आॅक्टोबर 1984 साली भारत सरकार ने मंगल पांडे ला स्वातंत्र्य समरातील पहिला क्रांतिकारक मानत त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले.
इंग्रजांविरूध्द विद्रोहाची ज्वाला भडकविणारे मंगल पांडे हे भारतातील पहिले कांतिकारी होते ज्यांनी केवळ 1857 च्या उठावाची सुरूवात केली असे नाही तर प्रत्येक भारतियाच्या मनात इंग्रजांच्या गुलामगिरीतुन सुटका व्हावी या हेतुने पेटुन उठण्याची ज्योत देखील जागविली.
त्यांनी सुरूवात केलेली स्वातंत्र्याची ही लढाई पुढे कित्येक वर्श चालली आणि बराच संघर्श व बलिदाना नंतर आपला भारत देश 15 आॅगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन मुक्त होऊ शकला.
मंगल पांडें सारख्या महान क्रांतिकारक आणि खऱ्या देशभक्तासाठी प्रत्येक भारतियाच्या हृदयात अपार श्रध्दा आणि सन्मान आहे.
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ मंगल पांडे बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की “मंगल पांडे – Mangal Pandey Biography हा लेख आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.
नोट: मंगल पांडे – Mangal Pandey यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.