जाणून घ्या 8 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

8 December Dinvishes

डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 December Today Historical Events in Marathi

8 December History Information in Marathi
8 December History Information in Marathi

८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 December Historical Event

 • १९२३ ला अमेरिका आणि जर्मनी मध्ये मित्रासंधी होऊन हस्ताक्षर झाले होते.
 • १९५६ ला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ऑलंपिक खेळांचा समारोप झाला.
 • १९६७ ला आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
 • १९७६ ला अमेरिका ने नेवादा येथे अणुबॉम्ब चाचणी केली होती.
 • १९८० ला इंग्रजी संगीतकार जॉन लेलेन यांना त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
 • १९९८ ला कर्नल ह्यूगो शावेज यांनी व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
 • १९९८ ला ऑलंपिक च्या इतिहासात महिलांचा बर्फावर खेळल्या जाणारा हॉकी खेळाला खेळल्या गेले.
 • १९९८ ला फिनलँड ने स्वीडन ला ६-० ने बर्फावरील खेळल्या जाणाऱ्या हॉकी मध्ये हरवले होते.
 • २००० ला ब्रिटन आणि रशिया या दोन देशांत सुरक्षा करार पार पडला.
 • २००३ ला जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये निलंबना चा काळ वाढविल्यामुळे झिंबाब्वे ने स्वतःला वेगळे करून घेतले.
 • २००३ ला वसुंधरा राजे ह्या राजस्थान च्या मुख्यमंत्री बनल्या.
 • २००३ ला उमा भारती ह्या मध्य प्रदेश च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
 • २००४ ला पाकिस्तान ने ७०० किलोमीटर दूर मारा करणारी शाहीन-१ नावाच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी रित्या परीक्षण केले.
 • २००७ ला अमेरिकी संघटना NATA ने दक्षिणी अफगानिस्तान च्या मुसाकला जिल्ह्यात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांवर हल्ला केला होता.

८ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १७२१ ला मराठा साम्राज्याचा प्रसिद्ध बालाजी बाजीराव पेशवे यांचा जन्म.
 • १८७५ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
 • १८७७ ला मराठी विद्वानांपैकी एक नारायण शास्त्री मराठे यांचा जन्म.
 • १८९७ ला भारतीय पत्रकार तसेच लेखक बालकृष्ण शर्मा यांचा जन्म.
 • १९०० ला शास्त्रीय नृत्य नर्तक उदय शंकर यांचा जन्म.
 • १९०१ ला भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
 • १९२७ ला पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा जन्म.
 • १९३५ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार धर्मेंद्र यांचा जन्म.
 • १९४४ ला भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.

८ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १९४७ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.
 • १९७८ ला इस्त्राईल च्या चौथ्या प्रधानमंत्री गोल्डा मियर यांचे निधन.
 • २०१५ ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here