• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

हॉकी . . . सांप्रदायिक सद्भाव वाढीस लावणारा खेळ

Hockey Khelachi Mahiti

मैदानी खेळांमध्ये हॉकी हा एक रोमांचक खेळ असून दोन संघांमध्ये खेळला जाणारा, शरीराची स्फूर्ती वाढविणारा, रहस्य रोमांच आणि उत्साह वाढविणारा खेळ म्हणून फार प्रसिद्ध खेळ आहे.

हॉकी या खेळात दोन संघांची आवश्यकता असते ज्यात ११-११ खेळाडू असतात.

Hockey Information in Marathi

हॉकी . . . सांप्रदायिक सद्भाव वाढीस लावणारा खेळ – Hockey Information in Marathi

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, भारत हा हॉकी खेळात कित्येक वर्षांपर्यंत विश्वविजेता राहिला असल्याने या खेळाला आपला राष्ट्रीय खेळ संबोधण्यात येतं. परंतु नियमानुसार आधिकारिक स्तरावर या खेळाला अद्याप भारताचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आलेले नाही. तरीही हॉकी ला अजून सुद्धा भारताचा राष्ट्रीय खेळ समजल्या जातं.

हॉकी हा खेळ मुलं आणि मुली दोघेही खेळू शकतात. या खेळात फायबरपासून बनलेल्या काठीचा उपयोग केला जातो. तिला स्टिक असं म्हणतात. या स्टिक ने खेळाडू रबरी किंवा प्लास्टिक बॉल ला नेट वा गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत करतो.

हॉकी चा इतिहास – Hockey History

हॉकी ची सुरुवात जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी मिस्र येथे झाल्याचे बोलले जाते. भारतात मात्र साधारण १५० वर्षांपूर्वी हा खेळ खेळायला सुरुवात झाली.

बर्फात खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी मुळे या खेळला मैदानी खेळ म्हंटल्या गेले.

हॉकी चे प्रकार – Types Of Hockey

हॉकी चे अनेक प्रकार आहेत

  • फील्ड हॉकी Field Hockey
  • बर्फ हॉकी Ice Hockey
  • रोलर हॉकी Rollar Hockey
  • स्लेज हॉकी Sledge Hockey
  • गली हॉकी Street Hockey

हॉकी ने उंचावली होती भारताची मान – Hockey in India

एके काळी हॉकी ने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले होते. भारताचे प्रसिद्ध खेळाडू ध्यानचंद यांना ”हॉकी चे जादुगार” म्हंटल्या जातं.

आपल्या भारताने १९२८ ते १९५६ पर्यंत ऑलंपिक स्पर्धांमध्ये तब्बल ८ सुवर्ण पदकांची कमाई केलीये.

१९६० साली रोम ऑलंपिक मध्ये भारताने रजत पदक मिळविले व १९६८ आणि १९७२ ला भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

त्यानंतर मात्र दुर्दैवाने हॉकी खेळात भारताची वारंवार पीछेहाट सुरु झाली. तरी देखील धनराज पिल्ले सारख्या झुंजार खेळाडूंनी हॉकी ला भारतात जिवंत ठेवण्याकरता जीवाचे रान केले म्हणून असेल कदाचित कि हॉकी आज आपला राष्ट्रीय खेळ आहे.

हॉकी मध्ये आपल्या देशाने इतके नाव कमावले कि आज महिला देखील मोठ्या प्रमाणात हॉकी खेळायला लागल्या आहेत आणि यश देखील प्राप्त करतायेत.

आपल्या भारतात सर्वप्रथम हॉकी क्लब (१८८५-८६) कलकत्ता येथे स्थापित करण्यात आला. भारतीय खेळाडूंनी ऑलंपिक ची यशस्वी सुरुवात येथूनच केली होती.

हॉकी खेळण्याचे नियम – Hockey Rules in Marathi

हॉकी खेळात ३५-३५ मिनिटांचे २ भाग असतात, प्रत्येक संघात ११ खेळाडू खेळण्याकरता आणि ५ अतिरिक्त खेळाडू असतात.

ऑलंपिक स्पर्धांमध्ये एकूण १२ संघ सहभागी होतात, त्यामुळे ६-६ चे दोन ग्रुप बनविण्यात येतात.

प्रत्येक संघ ग्रूपमधील इतर संघांसोबत सामना खेळतात, ६-६ च्या टीम मधून २ संघ सेमीफायनल करता निवडण्यात येतात. मागे राहिलेले संघ आपापसात खेळतात जेणेकरून ५ व्या ते ७ वा क्रमांक प्राप्त करता यावा. अश्या रीतीने संघ उपांत्यफेरीतून अंतिम फेरीत दाखल होतो आणि त्यातून एक संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरतो.

हॉकी खेळतांना लागणारे आवश्यक साहित्य – Hockey Materials

हॉकी सुरळीत आणि सुरक्षित खेळण्याकरता काही महत्वाच्या साहित्याची आवश्यकता असते.

  • हेल्मेट
  • नेक गार्ड
  • शोल्डर गार्ड
  • नी गार्ड (Knee Guard )
  • एल्बो गार्ड (Elbo Guard )
  • कप Pocket आणि जेएक्सट्रेप
  • सरंक्षक कप
  • हॉकी स्टिक
  • हॉकी खेळण्याकरता बॉल

हे सगळं साहित्य खेळतांना खेळाडूच्या सुरक्षेकरता आणि सरंक्षणाकरता अत्यावश्यक असल्याने हे वापरून खेळाडू हॉकी चा उत्तम रीतीने आनंद घेऊ शकतो.

हॉकी चे प्रकार – Hockey Types

हॉकीची अनेक रूपं आणि प्रकार पाहायला मिळतात

  • एअर हॉकी
  • बीच हॉकी (समुद्र)
  • बॉल हॉकी
  • बॉक्स हॉकी
  • डेक हॉकी (बंदरगाह)
  • फ्लोर हॉकी (जर्मनी)
  • फुट हॉकी
  • जीम हॉकी
  • मिनी हॉकी
  • रॉक हॉकी
  • पोंड हॉकी
  • टेबल हॉकी
  • अंडरWater हॉकी

हॉकी खेळल्याने होणारे स्वास्थ्यलाभ – Health Benefits of Hockey

खेळ आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत लाभदायक आहे हे आपण जाणतोच. हॉकी खेळल्याने मनोरंजन तर होतं शिवाय हा खेळ आपल्याला अनुशासन देखील शिकवतो. कारण हॉकी असो किंवा आणखीन कुठला खेळ, त्या खेळाचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते.

हॉकी खेळल्याने खेळाडूला स्फूर्ती, आत्मविश्वास, जीवनात संघर्ष आवश्यक असल्याची जाणीव जागृत होणे, या महत्वाच्या गोष्टींचा लाभ होतो.

खेळल्याने सांप्रदायिक सद्भाव देखील वाढतो, आणि हे देखील तितकेच खरे आहे कि स्वस्थ शरीरात स्वस्थ आत्म्याचा निवास असतो.

हॉकी खेळावर चित्रपट – Best Hockey Movies Hindi

चक दे इंडिया :-  चक दे इंडिया नावाच्या शाहरुख खान अभिनित चित्रपटात हॉकी हा खेळ दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामुळे हॉकी ला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. भारतीय महिला हॉकी संघाला हॉकीत सर्वोत्कृष्ट टीम बनविण्याकरता शाहरुख खान खूप परिश्रम घेताना या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट त्यावर्षीचा फार यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपट ठरला होता.

Read More:

  • कबड्डी या खेळाची संपूर्ण माहिती
  • क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास
  • खो-खो या खेळाबद्दल संपूर्ण माहिती

आशा आहे की आपणास “हॉकी या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Hockey Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याला या लेखात हॉकी या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास योग्य दिसत नसेल किवां आपल्याकडे हॉकी या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved