• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information Game Information

पारंपारीक लोकप्रीय खेळ खो-खो या बद्दल संपूर्ण माहिती

Kho Kho Information in Marathi

भारतातील सर्वात लोकप्रीय आणि पारंपारिक खेळांमधील एक ‘‘खो खो’’ हा खेळ आज देखील पुर्वीप्रमाणेच आवडीने आणि उत्सुकतेने खेळला जातो. या खेळाची सुरूवात नेमकी कधी झाली हे आज सांगायचे झाल्यास नेमका काळ जरी माहित नसला तरी देखील इतिहासकारांच्या मता प्रमाणे या खेळाची सुरूवात महाराश्ट्रातुन झाली आहे. मराठी भाशिकांमध्ये हा अत्यंत लोकप्रीय खेळ समजला जायचा.

पारंपारीक लोकप्रीय खेळ खो-खो या बद्दल संपूर्ण माहिती – Kho Kho Information in Marathi

Kho kho information in Marathi

खो खो या शब्दाची निर्मीती:

खो खो हा शब्द संस्कृत शब्द ‘स्यु’ या शब्दावरून घेण्यात आला आहे ज्याचा अर्थ ‘उठा आणि पळा’ असा होतो. प्राचीन काळी खो खो हा खेळ रथावर खेळला जायचा म्हणुन त्याला ‘रथेडा’ असं देखील संबोधण्यात यायचं.

सोपा सहज आणि आनंद देणारा खेळ खो खो:

इतर सर्व भारतिय खेळांप्रमाणे खो खो हा खेळ देखील सुलभ, बिन खर्चाचा आणि भरपुर आनंद देणारा खेळ आहे. परंतु हा खेळ खेळणाऱ्याच्या अंगी शारिरीक तंदुरूस्ती, ताकद, चपळता आणि सहनशक्ती हे गुण असणं अत्यंत आवश्यक असतं.

नियंत्रीत गतीने समोरच्याला चकमा देणे, त्रासुन सोडणे, आणि पळणे त्यामुळे हा खेळ फार रोमांच आणि उत्साह उत्पन्न करतो.

खो-खो मुळे टिम सदस्यांमध्ये आज्ञापालन, अनुशासन, खेळातील कौशल्य, आणि निश्ठा यासारखे गुण निर्माण होतात.

खो खो खेळाकरीता तयार करण्यात आली नियमावली:

पुर्वी कित्येक वर्शांपर्यंत हा खेळ अत्यंत अनौपचारीक पध्दतीने खेळला जात असे, पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब इथं या खेळाला प्रसिध्दी मिळावी याकरता औपचारीक रूप देण्याचे प्रयत्न झाले होते.

1935 दरम्यान नव्याने स्थापीत झालेल्या अखिल महाराश्ट्र शारीरिक शिक्षण मंडळा व्दारे खो खो आणि हुतुतू करीता नियमावली तयार करण्यात आली आणि या खेळामध्ये काही नवीन संशोधनं देखील करण्यात आली.

आधी सांगीतल्याप्रमाणे पुर्वी खो-खो खेळाकरता कोणतेही नियम नव्हते सर्वात पहिला नियम डेक्कन जिमखाना चे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बनविला. त्या नियमाप्रमाणे मैदानात खेळल्या जाणाऱ्या या खेळाला खेळण्याकरीता सिमा निश्चित करण्यात आली.

साधारणतः 1919 साली खो खो खेळण्याकरता 44 फुट लांबीची मध्य रेखा व 17 फुट रूंद क्षेत्र या खेळाकरीता निश्चित करण्यात आले पुढे 1923-24 येता येता इंटरस्कुल स्पोट्र्स आॅर्गनायजेशन ची पायाभरणी झाली आणि खो खो या खेळाचे सादरीकरण करण्यात आले.

खेळातील नियमांमध्ये झाले बदल:

पुढे बदलत्या काळानुसार खो-खो खेळात अनेक बदल होत गेले. 1914 साली सुरूवातीच्या नियमावलीनुसार प्रत्येक प्रतिस्पध्र्याला बाहेर पडण्याकरता 10 गुण मिळत असत व वेळेची मर्यादा असायची त्यानंतर 1919 हे साल येता येता या 10 गुणांना 5 गुणांमध्ये बदलण्यात आले आणि खेळाला 8 मिनीटांची मर्यादित वेळ देण्यात आली. जर संपुर्ण टिम वेळेआधीच धावा काढेल तर मागे पळणाऱ्याला पुढच्या प्रत्येक मिनीटाकरता 5 अंक बोनस दिल्या जातील.

खेळातील इतर बदल मैदानात करण्यात आले. खेळाच्या मैदानाला आयताकार करण्यात आले. दोन खांबा मधले अंतर 27 फुटापर्यंत कमी करण्यात आले व प्रत्येक खांबा बाहेर 27फुटग5 फुट अंतरावर ‘डी’ झोन बनविण्यात आला.

प्रथम आॅल इंडिया खो-खो चँपियनशिप:

1957 मध्ये ‘‘आॅल इंडिया खो-खो फेडरेशन’’ गठित करण्यात आले होते 1959-60 ला विजयवाडा येथे पहिली आॅल इंडिया खो-खो चँपियनशिप आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा केवळ पुरूश स्पर्धकांकरीता आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत केवळ 5 संघानी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा त्यावेळेच्या मुंबई प्रांताने राजाभाऊ जेस्ट यांच्या नेर्तृत्वात जिंकली होती.

1960-61 ला पहिल्यांदा महिला चँपियनशिप पार पडली.

‘‘एकलव्य’’आणि ‘‘झाँसी लक्ष्मीबाई पुरस्कार’’:

1963-64 साली राश्ट्रीय स्तरावर उत्कृश्ट प्रदर्शन करणा-या पुरूश खेळाडंुकरता आणि महिला खेळाडुंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांना ‘‘एकलव्य’’ आणि ‘‘झाँसी लक्ष्मीबाई पुरस्कार’’ ही नावं देण्यात आली होती.

सर्वप्रथम हा पुरस्कार वितरण सोहळा इंदौर येथे पार पडला.

पहिला ज्युनियर चँपियनशिप पुरस्कार पटकावला महाराश्ट्राने:

1970-71 साली पहिली ज्युनियर चँपियनशिप स्पर्धा हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराश्ट्र राज्य विजेता तर कर्नाटक उपविजेता ठरले होते. ही स्पर्धा मुलांकरता आयोजित करण्यात आली होती व त्याच वर्शी उत्कृश्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडुला ‘‘वीर अभिमन्यु’’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

1974-75 ला इंदौर येथे मुलां प्रमाणेच मुलींची देखील पहिली ज्युनियर चँपियनशिप आयोजित करण्यात आली होती. 1982 ला खो-खो ला आॅलंपिक संघातील भाग म्हणुन सहभागी करण्यात आले.

खो-खो खेळाकरीता नियमावली:

तसं पाहाता खो-खो या खेळाकरीता अनेक नियम आज तयार करण्यात आले आहेत परंतु या ठिकाणी अश्या नियमांचा उल्लेख करीत आहोत जे या खेळाकरता अत्यंत आवश्यक आहेत.

मागे पळणाऱ्या टिम करता नियमः-

  • एका संघात 9 खेळाडु असतात ज्यातील 8 खेळाडु एकमेकांच्या विरूध्द चेहेरा करून बसतात आणि 1 खेळाडु विरूध्द टिमच्या पळणाऱ्या खेळाडु ला बाद करण्याकरता त्याच्या मागे धावतो आणि त्याच सुमारास पाठीमागुन दुसऱ्या खेळाडुला खो देऊ शकतो.
  • प्रत्येक संघात 9 खेळाडु असतात आणि 8 अतिरीक्त खेळाडु असतात.
  • धावणे किंवा चेंजर होण्याचा निर्णय टाॅसने ठरविण्यात येतो.
  • धावक सोडुन त्या संघातील इतर खेळाडु अश्या स्थितीत बसतील की कोणत्याही दोन खेळाडुंचे तोंड एका बाजुला येणार नाही आणि नववा खेळाडु अर्थात धावक हा दोन्ही पैंकी एका खांबाजवळ उभा असेल.
  • दोन खांबांमधे 2 केंद्र रेशा आखलेल्या असतात ज्याला पार करायचे नसते अन्यथा नियमभंग होऊन दंड होतो.
  • इतर खेळाडुला खो देतांना खो चा स्पर्श आणि आवाज एकाच वेळेस व्हायला हवेत.
  • खो मिळाल्याशिवाय स्पर्श केल्यास आपण धावणाऱ्याला बाहेर नाही करू शकत.
  • मागुन पळणारा खेळाडु दोन्ही खांबांच्या मधुन बाजु पार करू शकत नाही त्याला दरवेळी खांबा ला पार करूनच दुसऱ्या बाजुला जावे लागते.
  • धावणाऱ्याला स्पर्श केल्यानंतर जर तुम्ही खो देण्याअगोदर आपली दिशा बदलाल तर धावणारा बाहेर पडणार नाही.
  • प्रत्येक दंडा करता तुम्हाला पाठीमागुन खो (धावणाऱ्याच्या विरूध्द दिशेत) दयावा लागेल.

धावणाऱ्याकरता नियमः-

  • धावक तिन च्या समुहात येतात.
  • धावणारा खेळाडु मैदानात कुठेही जाऊ शकतो आणि कोणत्याही रेशेला पार करू शकतो.
  • चुकुन जरी धावक मैदाना बाहेर गेला तर धावक बाहेर होऊन जाईल.
  • आणि जर धावणाऱ्याच्या शरीराचा थोडा जरी भाग मैदाना आत आहे तर तो बाहेर होणार नाही.

खो खो खेळाविशयी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती:-

  • खो-खो खेळ खेळाडुंमध्ये सांघिक भावना निर्माण करतो. मुख्यतः आत्मरक्षण,आक्रमण आणि प्रतिस्पध्र्यावर आक्रमण ही कौशल्य या खेळामुळे प्राप्त होतात.
  • या खेळाचे जन्मस्थान महाराश्ट्र असुन काहींच्या मते ते बडौदा आहे. गुजरात,महाराश्ट्र आणि मध्यप्रदेशात खो-खो मोठया प्रमाणात खेळला जातो.
  • खो-खो खेळात कुठल्याही साहित्याची गरज पडत नाही केवळ खेळाच्या दोन बाजुला दोन खांब उभे करायचे बाकी कुठल्याही साहित्याची गरज हा खेळ खेळतांना पडत नाही.
  • या खेळाकरता 111 फुट लांब आणि 51 फुट रूंद मैदानाची आवश्यकता असते.
  • दोन्ही संघाना एक-एक खेळाकरता प्रत्येकी सात मिनीटं देण्यात येतात आणि दिलेल्या वेळेत त्या संघाला आपला डाव पुर्ण करावा लागतो.
  • हा खेळ सरळ साधा आणि सोप्या पध्दतीने खेळला जातो यात कोणत्याही प्रकारचा धोका नसुन स्त्री-पुरूश दोघेही अगदी समान पातळीवर हा खेळ खेळु शकतात.

खो-खो सामन्याकरता नियुक्त अधिकारी:

  • अम्पायर (दोन)
  • रेफरी (एक)
  • टाइम किपर (एक)
  • स्कोरर (एक)

अम्पायर

अम्पायर हा लाॅबी च्या बाहेर उभा असतो आणि नियमानुसार आपल्या स्थानावरून खेळाकडे लक्ष देतो. प्राप्त अधिकारात तो निर्णय देतो त्याशिवाय निर्णय देण्यात तो दुसऱ्या अम्पायर ची मदत देखील करू शकतो.

रेफरी

रेफरी ची कर्तव्य याप्रमाणे आहेत.

तो अम्पायरचे त्याच्या कर्तव्य पालनात सहाय्य करतो आणि त्यांच्यात निर्णयावरून मतभेद झाल्यास आपला निर्णय देतो.

खेळात बाधा पोहोचवणाऱ्या, असभ्य वर्तन करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळांडुना दंड देण्याचा अधिकार रेफरी ला आहे.

नियमांच्या व्याख्येसंबंधी प्रश्नांवर तो आपला निर्णय देतो.

टाईम किपर

वेळेचे रेकाॅर्ड ठेवणे हे टाईम किपरचे महत्वाचे कार्य आहे. शिटी वाजवुन डाव आरंभ आणि संपल्याचा तो संकेत देतो.

स्कोरर

खेळाडु नियोजीत क्रमाने मैदानात उतरले आहेत की नाही हे पाहाणे, बाद झालेल्या रनर चे रेकाॅर्ड ठेवणे, प्रत्येक डावाच्या अखेरीस स्कोर शिट वर गुण लिहीणे आणि धावकांचे स्कोर तयार करणे ही कामं स्कोरर ची जवाबदारी असते. सामन्याच्या अखेरीस सामन्याचा परिणाम तयार करून रेफरी ला घोशीत करण्याकरता देखील स्कोरर देत असतो.

खो-खो या खेळाकरता काहीही साहित्य लागत नाही आणि फायदे म्हणाल तर भरपुर! असा हा सांघिक खेळ स्वस्तात मस्त, भरपुर शारिरीक फायदे प्रदान करणारा आणि बिनखर्चाचा आहे. यातुन सांघिक भावना देखील वाढीस लागते त्यामुळे आपण तर खेळुयाच परंतु आपल्या पुढच्या पिढीला आवर्जृन हस्तांतरीत करूया असा हा खेळ.

या भारतिय खेळाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणं हे आपलं कर्तव्य नाही का?

Read More:

  • कबड्डी या खेळाची संपूर्ण माहिती
  • क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास

आशा आहे की आपणास “खो-खो या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Kho Kho Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याला या लेखात खो-खो या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास योग्य दिसत नसेल किवां आपल्याकडे खो-खो या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved