कब्बड्डी या खेळाची संपूर्ण माहिती

Kabaddi Information in Marathi

आपल्या भारत देशात कित्येक खेळांचा उगम झाला आहे… या खेळांच्या जन्म घेण्यामागे आणखीन बरीच कारणं असतील नसतील पण एक महत्वाचं कारण असेल आणि ते म्हणजे शारिरीक व्यायाम, शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे आणि ते या मैदानी खेळांच्या माध्यमातुन होत असल्यामुळे या खेळांना फार महत्वं असायचं.

धावतं युग आलं आणि मैदानं ओस पडतांना दिसु लागली. युवा पिढी हातात मोबाईल घेऊन तास्ंतास घरात एकाच ठिकाणी बसु लागली याचे दुष्परीणाम सुध्दा लगेच दिसायला लागले मंेदु दगड झाला आणि शरीर अस्ताव्यस्त वाढत गेलं.

व्यायामाच्या अभावामुळे दुष्परीणाम सुध्दा दिसायला लागले. या दुष्परीणामांपासुन युवा पिढीला दुर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळांचं महत्वं कळायलाच हवं.

आपल्या भारतातील असाच एक पुर्वीपासुन चालत आलेला खेळ म्हणजे कबड्डी! चला तर जानुया कब्बड्डी या खेळाची संपूर्ण माहिती –

कब्बड्डी या खेळाची संपूर्ण माहिती – Kabaddi Information in Marathi

Kabaddi Information in Marathi

कब्बड्डीची माहिती – Kabaddi chi Mahiti

या खेळाची सुरूवात नेमकी कधी आणि कशी झाली याबद्दल खात्रीने काही सांगता येत नसलं तरी काही तज्ञांच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्युने या खेळाची सुरूवात केली होती.

काही जाणकारांच्या मते कबड्डी हा खेळ भारतात सुमारे 4000 वर्षांपासुन खेळला जात आहे.

आपल्या भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळया नावांनी आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळल्या जात आहे.

महाराष्ट्रात हुतूतू… बंगालमध्ये हुडूडू… चेन्नईत चेडूयुडू… केरळमध्ये वंडीवडी… उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा… पंजाब राज्यात झाबर गंगा, सौची पक्की अश्या वेगवेगळया नावांनी आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच पण या खेळाला सर्वदुर एकच नाव असाव या करता जर कोणी प्रयत्नं केले असतील तर ते महाराष्ट्र राज्याने केले आहेत…

अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाऊन भारतात हा खेळ ’कबड्डी’ या नावाने ओळखला जातो आहे त्याचं श्रेय आपल्या महाराष्ट्र राज्याला द्यायला हवं. मराठी माणसांनी प्रयत्नपुर्वक कबड्डी खेळातल्या विविधतेतुन आपल्या राज्यात एकता निर्माण केली.

हुतूतू (कबड्डी) हा खेळ पुर्वी फार नियमांनी आखीव रेखीव खेळला जात असे असे नाही, मैदानाचे दोन भाग एका रेषेने केले की संपलेत नियम! अश्या ठराविक नियमांमुळे आणि नियमांच्या अभावी गोंधळाची परिस्थीती निर्माण होत असे.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे चैथे अधिवेशन 1931 साली महाराष्ट्रातील अकोला येथे पार पडले. भारतातील देशी खेळांचे नियम ठरविण्यासाठी या अधिवेशनात एक समिती नेमण्यात आली. भारतातील देशी खेळांचे नियम या समितीने तयार केले पुढे 1937 ला नाशिक येथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये या नियमांना मान्यता देण्यात आली.

पुढे नियमात काही दुरूस्त्या करण्यात आल्यात त्याच वर्षी कबड्डी या खेळाचा आॅलम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश केला. महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरीता निश्चित केले होते त्या नियमांनुसार संपुर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळल्या जाऊ लागला.

पुढे कबड्डीच्या प्रचारा आणि प्रसाराकरीता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेली या खेळाने देशाच्या कक्षा ओलांडल्या. कबड्डी ला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अनेकांनी मेहनत घेतली.

1990 ला बिजींग येथे पार पडलेल्या एशिआई स्पर्धांपासुन एशियात कबड्डीला समाविष्ट करण्यात आले. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात महाराष्ट्राचा फार मोठा हात आहे.

आणखीन एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव असा खेळ आहे की या खेळात पुरूष आणि महिला अश्या दोनही भारतिय संघांनी विश्वकप जिंकला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रो कबड्डी सामन्यांमुळे या खेळाला नवसंजिवनी मिळाली आहे, मोठमोठे कलाकार आपापल्या टिम विकत घेत आहेत या जरी या खेळाकरता सकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी या झगमगाटात पारंपारिक पध्दतीने खेळली जाणारी कबड्डी जगली आणि तगली पाहीजे असं मनोमन वाटुन जातं.

प्रो कबड्डी सामन्यांपुढे पारंपारिक पध्दतीने खेळले जात असलेले अखिल भारतीय कबड्डी सामने धोक्यात आले आहेत.

खेळाकरता लागणारं मैदान – Kabaddi Ground

कबड्डी हा खेळ आता पुरूष आणि स्त्रिया दोघेही खेळु लागले आहेत. पुरूषां करता 12.50 ग 10 मी. आणि महिलांकरता 11मी ग 8मी. असं आयताकृती मैदान लागतं या मैदानात शेणखत आणि बारीक चाळलेली माती याचा उपयोग करून सपाट मैदान तयार करण्यात येतं.

काळानुरूप पुर्वी केवळ खुल्या मैदानात खेळला जाणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत मॅट वर देखील खेळला जातो आहे. तरी देखील मातीत ला कबड्डीचा खेळ पाहाण्यात जास्त गमंत येते.

कबड्डी या खेळामुळे होणारे फायदे – Benefits Of Kabaddi

  • शरीर निरोगी आणि स्वस्थ राहाते.
  • सामुहिक खेळ असल्याने सांघीक भावना वृध्दिंगत होते.
  • परिस्थीतीला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद वाढते.
  • निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
  • अंगात चतुराई आणि सामथ्र्य वाढीस लागते.

Read More:

आशा आहे की आपणास “कबड्डी या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Kabaddi Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याला या लेखात कबड्डी या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास योग्य दिसत नसेल किवां आपल्याकडे कबड्डी या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here