Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

8 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज ८ सप्टेंबर आजचा दिवस हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन सन ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी हा दिन साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आणि सन ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात ‘जागतिक साक्षरता दिन’ साजरा केला जाऊ लागला.

जाणून घ्या ८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 8 September Today Historical Events in Marathi

8 September History Information in Marathi
8 September History Information in Marathi

८ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 September Historical Event

  • इ.स. १३२० साली गाझी मलिक यांना गियाथ अल-दीन तुघलक या पदवीने दिल्लीचे सुलतान राजा म्हणून गौरविण्यात आलं. तसचं, त्यांचा मुलगा फखर मलिक यांना मुहम्मद शाह तुघलक अशी पदवी देण्यात आली.
  • सन १९५४ साली साउथ एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना करण्यात आली.
  • सन २००० साली भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सयुक्त राष्ट्र शांती शिखर संमेलनात हिंदीत भाषण करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
  • सन २००६ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मुस्लिमबहुल मालेगाव या जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाले होते. त्यात सुमारे ३७ लोक ठार तर १३० जन जखमी झाले होते.

८ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८७ साली भारतीय सनातन धर्मांचे आध्यात्मिक योग गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न तसचे पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, गायक, कवी आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका यांचा जन्मदिन
  • सन १९३३ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायिका आणि उद्योजक आशा भोसले यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतातील सर्वात मोठ्या बॅनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड या वर्तमानपत्र समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ग्वालेर घराण्यातील गायक पंडित लक्ष्मी गणेश तिवारी यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. कश्यप यांचा जन्मदिन.

८ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९३६ साली एकोणिसाव्या शतकातील रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि रामकृष्ण वेदांत मठाचे संस्थापक स्वामी अभेदानंद यांचे निधन.
  • सन १९६० साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार तसचं, नॅशनल हेराल्ड आणि नवजीवन या वर्तमानपत्राचे प्रकाशक फिरोज गांधी यांचे निधन.
  • सन १९८१ साली नवनाथ संप्रदाय आणि लिंगायत शैव धर्मातील शिक्षकांचे वंशज इंचागिरी संप्रदायाशी संबंधित असलेले हिंदूवादी धर्मगुरू निसर्गदत्त महाराज यांचे निधन.
  • सन १९८२ साली शेर-ए-काश्मीर या नावाने प्रसिद्ध असणारे भारतीय राज्य कश्मीर येथील राजकारणी शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved