जाणून घ्या ९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

9 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासीक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 9 September Today Historical Events in Marathi

9 September History Information in Marathi
9 September History Information in Marathi

९ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 September Historical Event

 • इ.स. १७७६ साली अमेरीकेतोल कॉन्टिनेंटल कॉंग्रेसने “औपचारिकरित्या ‘सयुक्त वसाहती’ हे नाव बदलून “युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका” असे ठेवले.
 • इ.स. १७९१ साली अमेरिकेच्या राजधानीच नाव अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन(George Washington) यांच्या सन्मानार्थ वॉशिंग्टन डी. सी. ठेवलं.
 • सन १९२० साली अलीगढ येथील एंग्लो ओरिएंटल महाविद्यालयाचे रुपांतर मुस्लिम विश्वविद्यालयात झाले.
 • सन १९४५ साली बाग संगणकाची निर्मिती करण्यात आली.
 • सन १९८५ साली भारतीय मूक बधीर जलतरण पटू तारानाथ शेनॉय यांनी तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पार करून विक्रम स्थापित केला.
 • सन २००९ साली रात्री नऊ वाजून नऊ सेकंद आणि नऊ मिनिटांनी दुबईचे राज्यपाल मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ‘दुबई मेट्रो’ चे उद्घाटन केले.
 • सन २०१२ साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने  पीएसएलव्ही-सी 21 रॉकेटच्या साह्याने दोन परदेशी उपग्रहाचे उड्डण करून आपली १०० वी अंतराळ मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.

९ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८५० साली आधुनिक हिंदी साहित्याचे जनक व साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७४ साली प्रसिद्ध भारतीय ओडिया भाषिक लेखक आणि भाषातज्ञ गोपालचंद्र प्रहराज यांचा जन्मदिन.
 • सन १९०७ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसचं, सर्वोत्कृष्ट परराष्ट्रीय अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रणेते निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्मदिन.
 • सन १९३२ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक रचनाकार कांती कुमार जैन यांचा जन्मदिन.
 • सन १९६७ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, मार्शल आर्टिस्ट अक्षय कुमार यांचा जन्मदिन.

९ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 September Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९४७ साली भारतातील सुविख्यात कलामर्मज्ञ तथा चिंतक आनंद कुमारस्वामी यांचे निधन.
 • सन १९६० साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू कवी आणि गझल लेखक जिगर मुरादाबादी यांचे निधन.
 • सन २०१० साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन.
 • सन २०१२ साली जगातील सर्वात मोठा कृषी दुग्ध विकास कार्यक्रम, ऑपरेशन फ्लड,चे जनक वर्गीज कुरियन यांचे निधन.

मित्रांनो, आपण या लेखातून ९ सप्टेंबर या दिनाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेवू शकता. स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने या लेखाचे लिखाण करण्यात आलं आहे. तरी, आपण स्वत: या लेखाचे वाचन करावे, शिवाय आपल्या मित्रांना देखील हा लेख पाठवायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top