Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

एअर होस्टेस (हवाई सुंदरी) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

Air Hostess Information in Marathi

आज आपल्याला फक्त पुस्तकी नव्हे तर अशा शिक्षणाची गरज आहे, जे आपल्याला एक शाश्वत भविष्य प्रदान करेल. त्यासाठी शिक्षणाबरोबर जर आपल्याला एखादे प्रशिक्षण मिळाले तर किती बरं होईल, नाही का? आज असे अनेक कोर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला विशिष्ट शिक्षणानंतर प्रवेश मिळतो आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेचे साधन सुद्धा उपलब्ध होते. डिप्लोमा इन फार्मसी  किंवा एम.एस.डब्ल्यू. आणि यांसारखे अनेक कोर्स आहेत कि जे आपल्याला भविष्यात चांगल्या नोकरीची संधी प्रदान करतात.

मग हे कोर्स आपल्याला का माहित नाहीत ? कारण आपण शिक्षणाच्या विशिष्ट चौकटीच्या बाहेरचा विचार कधी केलेलाच नसतो. परंतु आ ता परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे असा विचार आता करावा लागेल. महिलांसाठी असे अनेक कोर्स उपलब्ध आहेत, जे त्यांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतात. यातीलच एक कोर्स आहे एअर होस्टेस चा (हवाई सुंदरी) कोर्स. चला तर मग या कोर्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Contents show
1 एअर होस्टेस (हवाई सुंदरी) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती – Air Hostess Information in Marathi
1.1 एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारी अहर्ता – Air Hostess Course Eligibility
1.2 एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारे गुणवैशिष्ट्ये – Skills for Air Hostess Course
1.2.1 वयोमर्यादा : Age Limit for Air Hostess Course
1.3 एअर होस्टेस कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया – Air Hostess Course Admission Process
1.3.1 एअर होस्टेस कोर्सचा कालावधी – Air Hostess Course Duration
1.3.2 एअर होस्टेस कोर्सचा अभ्यासक्रम : Air Hostess Course Syllabus
1.4 एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारा खर्च – Air Hostess Course Fee
1.5 एअर होस्टेस कोर्सचे प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील काही नामांकित संस्था – Air Hostess Institute
1.6 एअर होस्टेस : नोकरीच्या संधी : Career in Air Hostess
1.6.1 एअर होस्टेस कोर्स बद्दल नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न – Air Hostess Quiz

एअर होस्टेस (हवाई सुंदरी) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती – Air Hostess Information in Marathi

Air Hostess Information in Marathi
Air Hostess Information in Marathi

एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारी अहर्ता – Air Hostess Course Eligibility

शैक्षणिक अहर्ता : Educational Qualification

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही शाखेतुन कमीतमी १२ उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उड्डाण क्षेत्राशी निगडित कोर्स केलेल्या व्यक्ती देखील हा कोर्स करू शकतात.

एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारे गुणवैशिष्ट्ये – Skills for Air Hostess Course

  • स्वभाव प्रेमळ आणि भाषा मृदू असावी.
  • कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टीकोन असावा.
  • व्यक्तिमत्व आनंदायी असावे.
  • निर्णय क्षमता योग्य आणि जलद असावी.
  • जबाबदारीची जाणीव असावी.

वयोमर्यादा : Age Limit for Air Hostess Course

कोर्सला प्रवेशासाठी इच्छुक व्यक्तीचे वय १७ ते २६ वर्षापर्यंत असावे.

शारीरिक पात्रता : Physical Appearance

  • उंची कमीतकमी ५ फूट २ इंच असावी
  • दिसायला सुंदर
  • दृष्टी ६/६
  • वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्ती या कोर्ससाठी पात्र ठरते.

एअर होस्टेस कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया – Air Hostess Course Admission Process

१२ वी नंतर डिप्लोमा आणि सर्टिफिकेट असे दोन कोर्स करता येतात. हे कोर्स करण्यासाठी उमेदवाराला थेट या कोर्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत जाऊन अर्ज करावा लागतो. नंतर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियेतून उत्तीर्ण होऊन या कोर्सला प्रवेश घेता येतो.

काही संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

एअर होस्टेस कोर्सचा कालावधी – Air Hostess Course Duration

  • सर्टिफिकेट कोर्स : ६ ते ८ महिने
  • डिप्लोमा कोर्स : ६ महिने ते १ वर्ष
  • पदवी कोर्स : १ ते २ वर्ष

एअर होस्टेस कोर्सचा अभ्यासक्रम : Air Hostess Course Syllabus

या कोर्समध्ये खालील विषयांचा अभ्यास करावा लागतो.

  • विमान परिचय (Aircraft Familiarization)
  • प्रथमोपचार (First Aid)
  • प्रवासी हाताळणी (Passenger Handling)
  • तांत्रिक प्रशिक्षण (Technical Training)
  • आणीबाणी परिस्थिती हाताळणी (Emergency Situation Handling) इ.

एअर होस्टेस कोर्ससाठी लागणारा खर्च – Air Hostess Course Fee

हा कोर्स करण्यासाठी साधारणतः दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च लागू शकतो. विविध संस्थांमध्ये खर्च बदलू शकतो.

एअर होस्टेस कोर्सचे प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील काही नामांकित संस्था – Air Hostess Institute

  • फ्रॅन्कफिन इन्स्टिटयूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग, दिल्ली
  • दि बॉम्बे फ्लयिंग क्लब कॉलेज, मुंबई
  • जेट एरवेज ट्रैनिंग अकॅडेमि, मुंबई
  • विंग्स एअर होस्टेस अँड हॉस्पिटॅलिटी ट्रैनिंग, गुजरात
  • युनिवर्सल एव्हिएशन अकॅडेमि, चेन्नई इ.

एअर होस्टेस : नोकरीच्या संधी : Career in Air Hostess

हा कोर्स केल्यानंतर कुठल्याही विमान कंपनीमध्ये एअर होस्टेस म्हणून आपली निवड होऊ शकते. एक यशस्वी एअर होस्टेस बनण्याकरिता आपले व्यक्तिमत्व आनंदायी असावे, भाषा सुवाच्य आणि प्रेमळ असावी तसेच शिक्षण पूर्ण असावे लागते. एअर होस्टेस म्हणून निवड झाल्यानंतर घरगुती विमानसेवेत दरमहा ३० ते ५० हजारांपर्यंत पगार मिळतो. परंतु जर आपण विदेशी विमानसेवेत निवड झाली तर दरमहा दीड ते दोन लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

एअर होस्टेस कोर्स बद्दल नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न – Air Hostess Quiz

१. एअर होस्टेस चा कोर्स पुरुष करू शकतात का?

उत्तर: होय, असाच समकक्ष कोर्स पुरुषांसाठी देखील आहे त्याला फ्लयिंग स्टुवर्ड चा कोर्स म्हणतात.

२. एअर होस्टेस बनल्यानंतर किती पगार मिळतो?

उत्तर: देशांतर्गत उड्डाणासाठी ३० ते ५० हजार दरमहा तर देशाबाहेरील उड्डाणासाठी दीड ते दोन लक्ष रुपये दरमहा पगार मिळू शकतो.

३. एअर होस्टेस कोर्सला प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?   

उत्तर: कुठल्याही शाखेतून कमीत कमी १२ वी पास.

४. एअर होस्टेस कोर्ससाठी वयोमर्यादा काय आहे? 

उत्तर: १७ ते २६ वर्ष.

५. एअर होस्टेस कोर्ससाठी किती खर्च लागतो?         

उत्तर: या कोर्ससाठी सुमारे दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च लागू शकतो.

६. एअर होस्टेसचे कार्य काय असते?                                      

उत्तर: प्रवाशांची मदत करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे, प्रथोमोपचार देणे, माहिती देणे इ.

Editorial team

Editorial team

Related Posts

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती
Career

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

by Editorial team
January 26, 2024
महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन
Career

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

by Editorial team
January 26, 2024
MS Excel म्हणजे काय?
Career

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

by Editorial team
November 9, 2023
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved