Sunday, June 22, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मुमताज महल ‘ताजमहल’ची राणी

Mumtaz Mahal

मोगल शासक शहाजहाँची सर्वात आवडती राणी म्हणजे ‘मुमताज महल’! यांच्या आठवणीत उत्तरप्रदेशातील आगरा इथं बांधण्यात आलेल्या जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘ताजमहल’ या भव्यदिव्य अश्या वास्तुरचनेमुळे आजही त्या कुण्याच्याही विस्मरणात गेलेल्या नाही.

तिच्या अलौकिक सौंदर्याने शहाजहाँ मोहित झाले नसते तर नवलच! तिला त्यांनी आपली सगळयात आवडती बेगम म्हणुन दर्जा दिला होता.

इतकेच नव्हें तर शहाजहाँने अनेक कविंना देखील मुमताज च्या सौंदर्यावर अनेक काव्य लिहीण्याकरता प्रेरित केले होते.

मुमताज महल अत्यंत करूणा आणि नम्र हृदयाची धनी म्हणुन ओळखली जायची. गरजवंतांच्या आणि अनाथ लोकांच्या मदतीकरता ती सतत तत्पर असायची.

सौंदर्यसम्राज्ञी तर ती होतीच त्याशिवाय बुध्दीमान देखील होती. शहाजहाँ च्या राज्यकारभाराशी संबंधीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये ती मोलाची मदत करायची.

या लेखात मुमताज महलच्या आयुश्याविशयी महत्वपुर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुमताज महल ‘ताजमहल’ची राणी – Mumtaz Mahal

Mumtaz Mahal

मुमताज महल चा इतिहास – Mumtaz Mahal History in Marathi

मुळ नाव (Real Name)अर्जुमंद बानो
जन्म (Birthday)इ.स. 1593, आगरा
पति (Husband)शहाजहाँ
निधन  (Death)17 जुन 1631 बुरहानपुर

मुमताज महलचा जन्म आणि परिवार – Mumtaz Mahal Biography

इ.स. 1593 ला एप्रील महिन्यात मुमताज महलचा जन्म उत्तरप्रदेशातील आगरा इथं झाला. तिचे मुळ नाव अर्जुमंद बानो बेगम. तिच्या वडिलांचे नाव अब्दुल हसन आसफ खां, ते मोगल साम्राज्यातील चैथे शासक आणि शहाजहाँचे वडिल जहांगिर यांचे वजिर म्हणुन कार्यरत होते.

तसच मुमताज महलची आत्या ‘नुरजहाँ’ ही मोगल सम्राट जहांगिर यांची सर्वात प्रिय बेगम होती.

मुमताज महल व शहाजहाँ यांची भेट आणि निकाह – Mumtaz Mahal Shah Jahan

मुमताज महल ऊर्फ अर्जुमंद बानो अतिशय सुंदर आणि गुणवान स्त्री होती. ती हरम जवळ असलेल्या मीना बाजारात काचेचे आणि रेशमाचे मोती विकण्याचे काम करायची.

इ.स. 1607 ला तीची भेट याच बाजारात मोगल वंशाचा शहजादा शहाजहाँशी (खुर्रम) झाली. त्या सुमारास ती केवळ 14 वर्षाची होती.

अगदी तेव्हांपासुन शहाजहाँ आणि मुमताज महल यांच्या ऐतिहासिक प्रेमकथेला सुरूवात झाली. हळुहळु त्यांच्या प्रेमाचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं आणि 5 वर्शांनंतर मुमताज महल आणि मोगल वंशाचा शहजादा शहाजहाँ यांनी इ.स. 1612 ला निकाह केला.

निकाहपश्चात ती शहाजहाँ ची सर्वात प्रिय आणि आवडती बेगम झाली. तिच्याशिवाय शहाजहाँ एक क्षण देखील राहु शकत नव्हता.

शहाजहाँ ने आपल्या राज्यात मुमताज महल ला दिले होते सर्वाधिक अधिकार:

अर्जुमंद बानोच्या अलौकिक सौंदर्याने शहाजहाँ एवढा प्रभावित होता की त्याने निकाहानंतर तिचे नाव बदलुन ‘मुमताज महल’ असे केले.

याशिवाय त्याने मुमताज महलला ‘मलिका-ए-जमानी’ ही उपाधी देखील प्रदान केली होती.

शहाजहाँ च्या मुमताज महल व्यतिरीक्त अनेक बेगम होत्या परंतु त्याच्या राज्यात जो सन्मान आणि मान मुमताज महल ला मिळाला तसा अन्य कुणालाही देखील प्राप्त झाला नाही.

इतिहासकारांच्या मते मोगल सम्राट शहाजहाँ ने मुमताज महलला आपल्या राज्यकारभाराशी संबंधीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल केला होता.

इतकेच नव्हें तर मुमताज महलच्या समंतीशिवाय मोगल सम्राट शहांजहाँ कोणतेही फरमान जारी करत नसे.

शहाजहाँ आणि मुमताज महलचे उत्कट प्रेम पाहाता असे देखील म्हंटले गेले आहे की शहांजहाँला आपल्या बेगम प्रती इतकी ओढ आणि प्रेम होते की तो तिच्याशिवाय एक क्षण देखील राहु शकत नव्हतां आणि म्हणुन आपल्या राज्यकारभाराशी संबंधीत दौरयांमध्ये सुध्दा तो तिला आपल्या सोबत नेत असे.

तसेच आपली सर्वात विश्वासपात्र जोडीदार म्हणुन शहांजहाँने मुमताज महलचा गौरव करीत तिच्या सन्मानार्थ आगरा येथे विशेश महल, मुहर उजाह, शाही मुहर सारख्या भव्यदिव्य महलांची निर्मीती केली होती.

मुमताज महलचा मृत्यु आणि ताजमहलची निर्मीती – Mumtaz Mahal Death And Taj Mahal

मुमताज महल ने एकुण 14 अपत्यांना जन्म दिला. ज्यात 8 मुलं आणि 6 मुली होत्या.

परंतु त्यांची 7 अपत्येच जिवीत राहु शकली. त्यांच्या इतर मुलांचा मृत्यु किशोरावस्थेतच झाला. त्यांच्या अपत्यांमध्ये जहाँआरा बेगम, दाराशिकोह यांचा समावेश आहे.

दाराशिकोह त्यांचा सर्वात सभ्य, समंजस, आणि बुध्दीमान पुत्र होता. यालाच आपल्या मृत्युपश्चात आपला उत्तराधिकारी बनविण्याची शहांजहाँची इच्छा होती. पण पुढे त्याला आपल्या लोभी भाऊ औरंगजेबासमोर पराजय पत्करावा लागला.

मुमताज महल ला आपल्या 14 व्या अपत्याला ‘गौहर बेगम’ जन्म देतांना प्रचंड प्रसव पिडेला सामोरे जावे लागले आणि त्यातच 17 जुन 1631 ला तिचा मृत्यु झाला.

आपल्या अत्यंत प्रीय बेगमच्या मृत्यु पश्चात शहांजहाँ शोकसागरात बुडाला होता.

असे देखील म्हंटले जाते की मुमताज बेगमच्या मृत्युनंतर तब्बल 2 वर्श शहांजहाँ शोकमग्न होता.

या दरम्यान आपल्या रंगीन आवडी निवडींकरता प्रसिध्द असलेल्या शहांजहाँने आपल्या आवडी निवडी बाजुला सारल्या होत्या या काळात त्याने कोणतेही शाही लिबास परिधान केले नाहीत आणि कोणत्याही शाही कार्यक्रमात उपस्थित देखील राहिला नाही.

मुमताज महलच्या मृत्यु नंतर शहांजहाँने आपल्या प्रेमाचे अमर प्रतिक म्हणुन तिच्या स्मरणार्थ आगरा येथे ‘ताजमहल’ ची निर्मीती केली.

ताजमहल आपल्या भव्यदिव्यतेमुळे आणि आकर्षक कलाकृतीमुळे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणला जातो.

याच्या निर्मीतीकरता तब्बल 23 वर्शांचा अवधी लागला. भारतिय आणि विदेशी पर्यटकांचे हे मुख्य आकर्शणाचे केंद्र आहे.

‘ताजमहल’ हा मुमताज महल ची अत्यंत भव्य आणि आकर्शक कब्र आहे.

त्यामुळे या इमारतीला ‘‘मुमताज का मकबरा’’ देखील म्हंटल्या जातं. या शिवाय ‘ताजमहल’ शहांजहाँ आणि मुमताज महल यांच्या अव्दितीय प्रेमाचे प्रतिक म्हणुन देखील प्रसिध्द आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved