“ताजमहाल” भारताची शान आणि प्रेमाचे प्रतिक

Taj Mahal Information in Marathi

भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या ताजमहालने नेहमीच आपल्या सुंदरतेची सर्वांना भुरळ पाडली आहे. ताजमहालमुळे भारताला केवळ सांस्कृतिक व कलाकौशल्याच्या दृष्टीने महत्व न येता आर्थिक दृष्ट्या सुध्दा विदेशी पर्यटनाला चालना मिळाली आहे.

ताजमहालभारताची शान आणि प्रेमाचे प्रतिक – Taj Mahal Information in Marathi

Taj Mahal Information in Marathi
Taj Mahal Information in Marathi

ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालचा इतिहास – Taj Mahal History in Marathi

ताजमहाल हा भारतातील मुघल शासन काळातील वास्तू व शिल्पकलेचा अतिउत्कृष्ट असा नमुना आहे. मध्ययुगीन इतिहासाच्या नोंदी प्रमाणे ईसवी सन १६२८ ते १६५८ या कालखंडात शाहजहान या मुघल शासकाचे भारतात राज्य होते.

शाहजहानला कलेची व सौंदर्याची खूप आवड होती. त्यामुळेच काय तर शाहजहान चा काळ भारतातील वास्तू व शिल्पकलेचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. साधारणपणे ईसवी सन १६३२ ला ताजमहालच्या बांधकामाला सुरुवात झाली होती व ईसवी सन १६५३ ला ताजमहालचे बांधकाम पूर्णत्वास गेले होते.

पूर्णपणे संगमरवर दगडावर हिंदू,मुस्लीम या व्यतिरिक्त पार्शियन व अन्य भारतीय वास्तुकलेची छाप पडलेली आपणास प्रत्यक्षात पाहण्यास मिळते.

जवळपास २० हजार मजुरांनी अविरत कार्य करून अहमद लाहौरी ह्याच्या नेतृत्वात ह्या सुंदर वास्तूचे निर्माण कार्य पूर्ण केले होते.

ताजमहाल प्रेमाचे प्रतिक – Symbol Of Love Taj Mahal

ताजमहाल जरी त्याच्या सौंदर्याने जगात प्रसिध्द असले तरी सोबतच ही वास्तू खरी ओळखल्या जाते ती प्रेमाच्या प्रतीक रुपात. ह्या मागील इतिहास सुध्दा खूप मनोरंजक आहे.

शाहजहानने अर्जुमंद बानो बेगम उर्फ मुमताज महल हिच्या रूप सौंदर्यावर घायळ होऊन तिच्यासोबत विवाह केला होता, शाहजहान तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा त्याचे तिच्याप्रती इतके प्रेम होते की राजकीय व अन्य महत्वाचे निर्णय सुध्दा तो तिच्यात मर्जीत राहून घ्यायचा.

अश्या ह्या राणीचा तिच्या १४ व्या संततीच्या जन्मावेळी असह्य प्रसूती वेदनेमुळे मृत्यू झाला होता. ह्या घटनेमुळे शाहजहान पूर्णपणे खचून गेला व मुमताज वर असलेल्या आपल्या प्रेमाला त्याने एका सुंदर व भव्य अश्या वास्तुकलेद्वारा प्रत्यक्षात साकारण्याचे ठरविले व ह्यातूनच ताजमहाल साकारल्या गेला, मुमताज महल ह्या नावावरूनच ह्या भव्य सुंदर वास्तूला “ताजमहाल” असे नाव देण्यात आले.

ताजमहाल च्या अंतरभागात शाहजहान ने आपल्या प्रिय पत्नी मुमताज चा मकबरा बनविला आहे.

ताजमहाल –  एक वैश्विक वारसा स्थान – World Heritage Site In India

ताजमहालचा समावेश जगातील सात प्रमुख आश्चर्या मध्ये करण्यात आलेला आहे. जगात ताजमहालची पवित्र प्रेम व त्या प्रित्यर्थ निर्मित एक प्रतिक म्हणून ओळख असल्या मुळे चिरकाल ह्या वास्तू नक्कीच महत्व राखतात व येणाऱ्या भावी पिढीला ह्या गोष्टी स्मरणीय राहाव्या व सोबतच त्यांना इतिहासाचा अद्भुत कला आविष्कार समजण्यास मदत मिळावी ह्या दृष्टीने युनेस्को ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेने ताजमहालला वैश्विक वारसा स्थान ह्या सूची मध्ये स्थान दिले आहे. त्यामुळेच दरवर्षी देशाविदेशांतून लाखो पर्यटक ताजमहाल ला भेट देतात व हर्षोल्हासीत होऊन ह्या सुंदर वास्तू कलेचा देखावा डोळ्यात साठवून आश्चर्य चकित होतात.

ताजमहाल च्या विषयी काही रोचक गोष्टी  – Interesting Facts About Taj Mahal

  • ताजमहालच्या प्रवेशद्वारा पुढे सुंदर लाल दगडांनी बनविलेला असा उंच व भव्य दरवाजा आहे जो “बुलंद दरवाजा” ह्या नावाने ओळखला जातो.
  • ताजमहाल चा सर्वात उंच व शीर्ष भागावर स्थापित गोल घुमट २७५ फुट इतक्या उंचीचा असा भव्य आहे.
  • ताजमहालला अद्भुत सुंदरता लाभली आहे ती रेखीव व कोरीव नक्षीकामामुळे यामध्ये भारतीय व पार्शियन तसेच इस्लामिक कला कुसरेचा मनाला थक्क करणारा कला आविष्कार आपल्याला पहावयास मिळतो.
  • ताजमहालच्या परिसरात अनेक छोट्या मोठ्या सुंदर वृक्षांची बागकाम केलेली आहे ज्यामुळे ताजमहालच्या सुंदरतेत आणखीनच भर पडलेली आपणास दिसून येते
  • ह्या भव्य वास्तूच्यावर चारही कोपऱ्यावर गोलघुमटकार छोटे मिनार सुंदर नक्षीकामाने सुशोभित असे बनविण्यात आलेले आहे एकंदरीत पाहता ताजमहाल च्या बांधकामात वेगवेगळ्या प्रकारच्या अश्या लाल, पांढऱ्या संगमरवराचा वापर करण्यात आलेला आहे यातील काही संगमरवर अतिशय चमकदार आहेत, ज्यांना चंद्र प्रकाशात आणखीनच चमकदारपणा येतो व यामुळे रात्रीच्या वेळीसुध्दा ताजमहाल खूप सुंदर दिसतो.
  • ताजमहालच्या आत भिंतीवर शिलालेख सुध्दा कोरण्यात आलेले आहेत ज्यांची भाषा फारशी असून अनुवाद केल्यास यावर संगीतातील सूर तसेच कुराण मधील पवित्र कलमे कोरण्यात आल्याचे स्पष्ट होते.
  • ताजमहालच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्यास बनविण्यात आलेल्या रस्त्यावर सुंदर असे कारंजे पहावयास मिळतात ज्यांना तांब्याच्या मोठ्या पात्रात बनविण्यात आलेले आहे जे पाण्याच्या दबावामुळे जागेवरच उंच जावून परत पात्रात पडतात, यामुळे ताजमहालच्या आत प्रव्रेश करताच पर्यटकाला सुंदर असा अनुभव येतो .
  • मुमताज व शाहजहान या दोघांचेही मकबरे ताजमहालच्या आत स्थापित आहे ज्यावर अतिशय बहुमुल्य रत्नांचे जाळीदार नक्षीकाम केलेले आहे.
  • चमकदार पांढऱ्या संगमरवरात बनविलेले प्रेमाचे प्रतिक ताजमहाल सर्वांगीण दृष्ट्या सुंदर,रमणीय व अद्भुत कला आविष्काराची वास्तू असल्याने अशीच एक वास्तू काळ्या रंगात बनविण्याची शाहजहानची इच्छा होती परंतु पुत्र औरंगजेबाने शाहजहानला बंधक बनवून कारागृहात टाकल्याने ते शक्य होवू शकले नाही. ताजमहालची प्रतिकृती आपणास औरंगाबादला पहावयास मिळते जी “बीबी का मकबरा” या नावाने प्रसिध्द आहे.

अश्या सुंदर,भव्य व आकर्षक वास्तूला आपण अवश्य एकदा भेट द्यावी व स्थापत्य कलेचा एक अद्भुत नयनरम्य सोहळा बघावा, नक्कीच आपल्याच डोळ्याचे पारणे फिटतील यात काहीच दुमत नाही. आशा आहे आपल्याला हा लेख नक्कीच आवडला असेल जो ताजमहाल भेटीकरिता नक्कीच आपल्याला माहिती देणारा ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here