Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

“मतदानाविषयी जागरुकतेसाठी काही घोषवाक्ये”

Voting Awareness Slogans 

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर अधिकार सुद्धा आहे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे खूप आवश्यक आहे, जर आपण मतदान करण्याचा हक्क बजावला नाही तर देशात कमी टक्केवारीमध्ये मतदान होईल सोबतच तुम्हाला माहीतच आहे ज्याप्रमाणे एका मार्कची किमंत असते त्या प्रमाणे एक वोट हे खूप महत्वाचे असते,

एका मतामुळे विकास घडवणारी पार्टी जिंकता जिंकता राहू शकते. मतदान करणे हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकारच आहे, म्हणून त्या अधिकाराचा योग्य वापर करून आपण मतदान करायला हवे.

आजच्या लेखात आपण मतदानाविषयी काही विशेष घोषवाक्ये पाहणार आहोत. ज्या समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी उपयोगी येतील.

“मतदानाविषयी जागरुकतेसाठी काही घोषवाक्ये” – Voting Awareness Slogans in Marathi

Voting Awareness Slogans in Marathi

तर चला सुरुवात करूया!

  1. वोट आपले द्यायचे आहे, कर्तव्य आपले बजावायचे आहे.
  2. वोट हे अधिकारच नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे.
  3. एका मताने बनते आणि पडते सरकार, म्हणून तुमचे मत जाऊ नका देऊ बेकार.
  4. आपल्या एका मताने बदल घडेल, त्यामुळेच समाज सुधारेल.
  5. सोडा आपले सर्व काम, चला करू आपले मतदान.
  6. सुरुवात करूया, मतदार बनूया.
  7. करा आपल्या मताचे दान, हीच आहे लोकशाही ची शान.
  8. मतदान करा सर्व नर-नारी, कारण आहे ती प्रत्येकाची जिम्मेदारी.
  9. बनवा आपले मन, मतदान करा प्रत्येक जन.
  10. जे वाटतील दारू, साड्या आणि वोट, त्यांना कधीच नका करू वोट.
  11. जो देईल नोट, त्याला कधीच करू नका वोट.
  12. जाती वर ना धर्मावर, बटन दाबा कर्मावर.
  13. वृध्द असो कि जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान.
  14. घरी घरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरूक बनवू. 
  15. तुम्ही कुणाचीही खुर्ची हलवू शकता, तुमच्या बोटाचा वापर करून.
  16.  तुमच्या हातात आहे ताकत, योग्य उम्मेदवाराला द्या आपले मत.
  17. लोकशाहीचे एकच अनुष्ठान, करा आपले मतदान.
  18. १८ वर्षाची वय केली पार, घेऊन घ्या मताचा अधिकार.
  19. तोच देश होईल महान, ज्या देशात १०० टक्के मतदान.
  20. दारू पैसा आहे त्यांच हत्यार, आता नाही चालेल हा विचार.

मतदार राजा जागा हो आणि देशाच भविष्य घडवण्यात आपले मतदान करून योगदान दे. या मतदानामुळेच आपल्या देशातील स्थिती बळकट होण्यास मदत होईल. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे.

आणि समाजामध्ये जागरुकता पसराविण्यासाठी सहकार्य करा.

आशा करतो आपल्याला आजचे लिहिलेले घोषवाक्ये समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत करतील, आपल्याला लिहिलेले घोषवाक्ये आवडली असतील तर यांना आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

आणि आमच्या majhimmarathi.com ला अवश्य भेट दया.

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Road Safety Marathi Slogan
Slogans

२६+ सुरक्षा घोषवाक्य मराठी

Road Safety Slogans and Posters आवर वेगाला सावर जीवाला..आजचे युग हे यंत्र युग असल्याने वाहतुकीच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाल्याचे...

by Editorial team
September 20, 2022
Mahila Sashaktikaran Slogan
Marathi Slogans

महिला सशक्तीकरणावर स्लोगन

Mahila Sashaktikaran Slogan एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र...

by Editorial team
March 8, 2022
Save Earth Images
Slogans

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Save Earth Slogans in Marathi पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त...

by Editorial team
September 7, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved