Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १९ जून रोजी येणारे दिनविशेष

19 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १९ जून रोजी येणारे दिनविशेष – 19 June Today Historical Events in Marathi

19 June History Information in Marathi
19 June History Information in Marathi

१९ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 June Historical Event

  • इ.स. १६७६ साली शिवाजी महाराज यांचे सेनापती नेताजी पालकर मुघल शाहीतून पुन्हा मराठा साम्राज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले.
  • सन १८८९ साली ई.एस. व्यंकटारामैया यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • सन १९१० साली अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात पहिला फादर डे साजरा करण्यात आला.
  • सन १९१२ साली अमेरिकेतील कामगारांसाठी आठ तासाचा अवधी निश्चित करण्यात आला.
  • सन १९६१ साली कुवेत राष्ट्राला इंग्लंड देशाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सन १९६६ साली महाराष्ट्रीयन भारतीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई मध्ये शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली.
  • सन १९९९ साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मैत्री एक्सप्रेस या कोलकाता ते बांगलादेशाची राजधानी ढाका पर्यंतच्या बस सेवेचे उद्घाटन केले.

१९ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७१ साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे महान विचारवंत माधवराव सप्रे यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली माजी इंग्लिश क्रिकेटपटू वॉल्टर हॅमंड यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली नोबल पारितोषिक विजेता डॅनिश अणु भौतिकशास्त्रज्ञ आजे नील्स बोर यांचा जन्मदिन.
  • सन १९३१ साली उत्तराखंड व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली शांततेचा नोबल पुरस्कार विजेता म्यानमार देशाच्या राजकारणी, मुत्सद्दी लेखक, व  नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाच्या अध्यक्षा ऑंग सॅन सू ची बर्मी यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली बुकर पुरस्कार सन्मानित ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि निबंधकार सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्मदिन.
  • सन १९४८ साली भारतीय संगणक  भारतीय संगणक वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते व नेता डॉ. अमिया कुमार पुजारी यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली ग्वाल्हेरचे मराठा महाराजा आणि ग्वाल्हेरचे स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी नेत्या यशोधरा राजे सिंधिया यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्मदिन.

१९ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 June Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७४७ साली पर्शियन सम्राट नादिर शाह यांचे निधन.
  • सन १९३२ साली भारतीय हिंदी चित्रपट निर्माता भगवती प्रसाद मिश्रा यांचे निधन.
  • सन १९८१ साली भारतीय बंगाली शरीरशास्त्रज्ञ डॉ सुभाष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • सन १९९७ महाराष्ट्रीय मराठी लेखक रमेश मंत्री यांचे निधन.
  • सन १९९३ साली नोबल पारितोषिक विजेते ब्रिटिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी सर विलियम गेराल्ड गोल्डिंग यांचे निधन.
  • सन २००१ साली भारतीय वकील आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी सी. आर. पट्टाभीरामन यांचे निधन.
  • सन २००८ साली बर्टमन वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक व बंगाली पत्रकार आणि लोकप्रिय राजकीय समीक्षक  बरुण सेनगुप्ता यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved