Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २७ जून रोजी येणारे दिनविशेष

27 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व कार्य आदी घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

सन १९६४ साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, याचं तीन मूर्ति भवनात जवाहरलाल नेहरू याचं वास्तव्य होत. त्याच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून या भावनाचे रुपांतर संग्रहालया मध्ये करण्याचे ठरविण्यात आलं.

जाणून घ्या २७ जून रोजी येणारे दिनविशेष – 27 June Today Historical Events in Marathi

27 June History Information in Marathi
27 June History Information in Marathi

२७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 June Historical Event

  • इ.स. १६९३ साली लंडनमध्ये पहिले महिला मासिक द लेडीज मर्क्युरी प्रकाशित केले गेले.
  • सन १९५४ साली अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिल्या ५००० किलोवॅट क्षमता असणाऱ्या विद्युतकेंद्राची स्थापना रशियाची राजधानी मॉस्को जवळील ओबनिन्स्क येथे करण्यात आली.
  • सन १९६४ साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • सन २००२ साली परमाणु शस्त्र नष्ट करण्याच्या रशियाच्या योजनेस जी-८ देशांनी आपली सहमती दर्शविली.
  • सन २००८ साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • सन २०१५ साली संयुक्त राष्ट्र संघाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात विशेष स्थान असणार्‍या सत्यजित रे यांचे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

२७ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८३८ साली महान भारतीय कादंबरीकार, कवी व पत्रकार तसचं, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, वक्ता, पत्रकार व ध्येयनिष्ठ राजनीतिज्ञ शिवराम महादेव परांजपे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७५ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी, व लेखक दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८० साली प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या व व्याख्यता तसचं, अंध व बहिऱ्या असतांना सुद्धा कला शाखेची पदवी ग्रहण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती, हेलेन केलर(Helen Keller) यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली उत्कृष्ट माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय तामिळ भाषिक लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, प्रवासी लेखक, नाटककार आणि पटकथा लेखक अकिलन यांचा जन्मदिन.
  • सन १९३९ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, गायक व संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्मदिन.
  • सन १९६४ साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू पी. टी. उषा यांचा जन्मदिन.

२७ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 June Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७०८ साली मराठा साम्राज्याचे सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.
  • इ.स. १८३९ साली भारतीय इतिहासाच्या कालखंडातील प्रसिद्ध शिख साम्राज्याचे संस्थापक शिख धर्मीय महाराजा रणजीत सिंह यांचे निधन.
  • सन १९९६ साली प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट निर्माता अल्बर्ट रोमोलो ब्रोकोली (Albert Romolo Broccoli) यांचे निधन.
  • सन २००० साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.
  • सन २००८ साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved