Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २ जुलै रोजी येणारे दिनविशेष

2 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या  ऐतिहासिक घटना तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती, शिवाय, निधन वार्ता आणि त्यांनी केलेलं कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 2 July Today Historical Events in Marathi

2 July History Information in Marathi
2 July History Information in Marathi

२ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 July Historical Event

  • सन १९४० साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज सरकारने कलकत्ता इथे त्यांच्या राहत्या घरी त्यांना स्थानबद्ध केलं.
  • सन १८६२ साली कलकत्ता येथील उच्च न्यायालयाची स्थापना उच्च न्यायालयीन कायदा १८६१ अंतर्गत करण्यात आली.
  • इ.स १८६५ साली लंडन देशांत सॉल्वेशन आर्मीची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६२ साली सॅम वॉल्टनने रॉकर्स, आर्कान्सामध्ये पहिले वॉलमार्ट स्टोअर उघडले.
  • सन १९७२ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला करारावर हस्ताक्षर केले.
  • सन १९८३ साली तामिळनाडू राज्यातील कल्पक्कम या ठिकाणी अणुउर्जा केंद्राची स्थापना करण्यात आली.
  • सन १९९४ साली प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
  • सन २००४ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलं.

२ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी नाटककार व कलाकार गणेश बोडस यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९३ साली स्वतंत्र भारतातील पंजाब राज्याचे पहिले राज्यपाल व आंध्रप्रदेश राज्याच्या स्थापने नंतरचे आंध्रप्रदेश राज्याचे पहिले राज्यपाल चंदूलाल माधवलाल त्रिवेदी यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली माजी अर्जेंटिना देशाचे राजकारणी व अर्जेंटिना देशाचे माजी ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली प्रसिद्ध भारतीय लेखक, पत्रकार व साहसी कादंबरीकार अरुपकुमार दत्त यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मुहम्मद अझीज यांचा जन्मदिन.
  • सन १९६० साली  हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रसिद्ध लखनऊ तबला घराण्याची शाखा असलेल्या जोशी जोशी घराण्याचे सदस्य भारतीय गायक पंडित संतोष जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९८३ साली  भारतीय व्यावसायिक पॅरा-बॅडमिंटनपटू व उत्तरप्रदेश राज्यातील गौतमबुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास ललीनाकेरे यथिराज यांचा जन्मदिन.

२ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८४३ साली होमिओपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक जर्मन चिकित्सक सैमुएल हैनीमेन (Samuel Hahnemann) यांचे निधन.
  • सन १९५० साली प्रख्यात भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेता तसचं, राष्ट्रीय मिलिटिया, बॉम्बे यूथ लीग आणि कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार संघटनेचे प्रमुख नेता युसुफ मेहेर अली यांचे निधन.
  • सन १९६१ साली अमेरिकन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि क्रीडापटू अर्नेस्ट हेमिंग्वे (Ernest Hemingway) यांचे निधन
  • सन १९९९ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक, पटकथा लेखक आणि पत्रकार व  इटालियन-अमेरिकन माफियांबद्दलच्या त्यांच्या गुन्हेगारीवर कादंबरीचे लिखाण करणारे महान कादंबरीकार मारियो पुजो (Mario Puzo) यांचे निधन.
  • सन २००७ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप नारायण सरदेसाई यांचे निधन.
  • सन २०११ साली माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते व माजी कम्युनिस्ट पक्षाचे नेता चतुरानन मिश्रा यांचे निधन.
  • सन २०१३ साली संगणक माउस चे जनक अमेरिकन अभियंता आणि शोधक डग्लस कार्ल एंगेल्बर्ट (Douglas Engelbart ) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved