Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १९ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 19 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता आणि कार्य आदी घटनेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजचा दिवस हा बँक उद्योगाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण, आजच्या दिवशी सन १९६९ साली भारताच्या तत्कालीन सरकारने देशांतील जवळपास चौदा मोठ्या बँकेचे राष्ट्रीयीकरण केलं होत. बँकिंग क्षेत्रात प्रगतीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. याव्यतिरिक्त मित्रांनो, आज आपल्या देशाचे महान स्वतंत्र सेनानी मंगल पांडे यांचा जन्मदिन. सन १८५७ च्या स्वतंत्र उठावाला सुरुवात करणारे क्रांतिकारक त्यांनी आपल्या तुकडीतील एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळीबार करून या उठवला सुरुवात केली.

अश्या या महान नेत्याचा आज जन्मदिन. या उठावाचे मूळ कारण हे भारतीय सैनिकांना देण्यात आलेल्या बंदुकांना गाईची चरबी लावलेली होती. शिवाय हिंदुना गाय ही पवित्र असल्याने त्यांनी या बंदुका वापरण्यास मनाई केली. त्याबद्दल भारतीय सैनिकांनी इंग्रज सरकारला जाब विचारला. परंतु त्यांचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणून मेरठ येथील तुकडीच्या सैनिकांनी उठाव केला. या उठावाचे प्रमुख हे मंगल पांडेच होत. अश्या या महान क्रांतीकारकाला माझी मराठीच्या टीमकडून शत शत प्रणाम..

जाणून घ्या १९ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 19 July Today Historical Events in Marathi

19 July History Information in Marathi
19 July History Information in Marathi

१९ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 July Historical Event

  • इ.स. १८३२ साली सर चार्ल्स हेस्टिंग्ज (Charles Hastings) यांनी ब्रिटीश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन ची स्थापना केली.
  • सन १९०० साली पॅरिस देशामध्ये प्रथम मेट्रोची सेवा सुरु करण्यात आली.
  • सन १९६९ साली अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग(Neil Armstrong), एडविन ओल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स यांच्या सह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहचले.
  • सन १९६९ साली भारत सरकारने देशांतील चौदा मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण केले.
  • सन १९८० साली रशियाची राजधानी मॉस्को येथे २२ व्या ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली.
  • सन २००५ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमेरिकेच्या कॉंग्रेसला संबोधित केलं.
  • सन २००८ साली प्रशांत महासागरात आपल लक्ष्य निर्धारित करून अमेरिकेने लांब पल्ल्या मारण्यास सक्षम असलेल्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली.

१९ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८१४ साली रिव्हॉल्व्हर्सचे संशोधक अमेरिकन व्यावसायिक व शोधक सैमुएल कोल्ट(Samuel Colt) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८३४ साली फ्रेंच चित्रकार एदगर देगास(Edgar Degas) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९६ साली प्रसिद्ध स्कॉटिश चिकित्सक आणि कादंबरीकार ए.जे.क्रोनिन(A. J. Cronin) यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली प्रसिद्ध माजी रोमानियन टेनिसपटू इली नस्तासे(Ilie Năstase) यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व सन १९८३ सालच्या विश्वकप विजेता संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांचा जन्मदिन.

१९ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १३०९ साली संत नामदेव महाराज यांचे गुरु संत विसोबा खेचर समाधिस्त झाले.
  • इ.स. १८८२ साली प्राण्याच्या वर्गीकरणा विषयी मुलभूत संशोधन करणारे ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर(Francis Maitland Balfour) यांचे निधन.
  • सन १९६५ साली दक्षिण कोरियाचे राजकारणी, दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्रपती सिंगमन रही यांचे निधन.
  • सन १९६८ साली बडोदा प्रांताचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांचे निधन.
  • सन १९८० साली तुर्कस्तानचे पंतप्रधान निहत एरिम यांचे निधन.
  • सन २००४ साली जपानचे माजी पंतप्रधान झेन्को सुझुकी (Zenkō Suzuki) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved