Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जगातील ५ असे तथ्य ज्यांच्या विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे!

Weird Places in the World

पृथ्वीवर बरेचशे असे काही ठिकाण आहेत जे आजही जगापेक्षा खूप वेगळे आहेत, आपण लाईफ ऑफ पाय नावाचा हॉलीवूड चित्रपट बघितला असेल तर आपण त्यामध्ये एक द्विप पाहिलं असेल आणि ते द्विप समुद्रात  आहे असे सांगण्यात येते, ज्यावर रात्री वेगवेगळ्या घटना घडतात. पण तो चित्रपट होता, त्याच प्रमाणे आपल्या खरोखरच्या जगात सुध्दा असे काही ठिकाण आहेत ज्यांचा शोध लावणे खूप कठीण तर होताच आणि ते पृथ्वीवरील रहस्यमयी ठिकाणां पैकी एक येतात.

तर आजच्या लेखात आपण अश्याच काही पाच रहस्यमय ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार तर चला पाहूया..

जगातील ५ असे तथ्य ज्यांच्या विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे! – Mysterious Places in the World in Marathi

Mysterious Places in the World
Mysterious Places in the World 

 

१) सापांनी भरलेला द्विप – Island Ilha-da-queimada is House of Snakes

ब्राझील मध्ये इलाहा द क्यूइमादा नावाचा एक द्विप आहे. जिथे सर्वदूर सापच साप आहेत, आणि या द्वीपाला सापांच्या नावानेच ओळखले जातं. आजपर्यंत या ठिकाणांबद्दल कोणालाही कोणती माहिती मिळू शकलेली नाही परंतु सर्वदूर याविषयी एकच माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी सापांचे राज आहे. या बेटावर एकापेक्षा एक विषारी साप राहतात. गोल्डन लांसहेड वायपर नावाचे विषारी सापांच्या जाती सुध्दा येथेच आढळून येतात. या बेटावर ब्राझील च्या नौसेनेने तेथील नागरिकांना जाण्यास मनाई केलेली आहे. साओ पाउलो या ब्राझील च्या एका ठिकाणापासून हा द्विप फक्त २० किलोमीटर आहे. या बेटावर तीन फुटच्या अंतरावर चार ते पाच साप सहजरित्या दिसून येतात.

२) अंदमान चे सेंटिनल बेट – Sentinel Island of Andaman

भारतातील नागरिकांना देशात कुठेही जाण्यास परवानगी आहे, पण एक ठिकाण असे आहे जिथे नागरिकांना जाण्यास मनाई केली जाते आणि ते आहे अंदमान चे एक छोटंसं बेट त्याचे नाव आहे सेंटिनल बेट. या बेटावर खतरनाक आदिवासी राहतात जे आपल्या बेटावर कोणाला येऊ देत नाहीत आणि कोणाच्या दुसऱ्याच्या बेटावर जात सुध्दा नाहीत. त्यांचा जगाशी संपर्कच नाही असेही म्हटले तरी चालते. त्यांच्या अश्या वागणुकीमागे काय कारण आहे आज पर्यंत कळले नाही. आणि येथे जाणे लोकांसाठी जीवघेणे आहे. म्हणून कोणालाही या बेटावर जाण्याची परवानगी नाही आहे.

३) इथोपिया चा वाळवंट – Desert of Ethiopia

इथोपियातील दनाकिल हा वाळवंट पृथ्वीवरील नर्क म्हणून ओळखल्या जातो. कारण या वाळवंटात एवढी जास्त गर्मी आहे की आपल्याला जिवंतपणी नरकाचे दर्शन घडवते. आपल्याकडे एका वर्षात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याप्रकारे ऋतू येतात, परंतु या ठिकाणी पूर्ण वर्षभर ४८ डिग्री तापमान राहते. आणि जर झालेच तर कधी कधी हेच तापमान १४० डिग्री सेल्सिअस च्या वरती जाते.या ठिकाणांवर आगीचे साम्राज्य असल्याने या ठिकाणाला ‘क्रुअलेस्ट प्लेस ऑन अर्थ’ म्हणतात, म्हणजेच जगातील सर्वात निर्दयी ठिकाण म्हटल्या जात. येथील तलावांत नेहमी पाणी उकळत राहत. हे वाळवंट बरेच लांब पसरलेलं आहे आणि अश्या परिस्थिती मुळे या ठिकाणांवर राहणे खूप कठीण नाही तर शक्यच नाही.

४) अमेरिकेतील डेथ वैली नावाचे ठिकाण – Place Death Valley in America

अमेरिकेतील डेथ वैली या ठिकाणाचे तापमान नेहमी १३० डिग्री सेल्सिअस असते, येथे एवढे जास्त तापमान असल्याने कोणाच्याही जीवाला धोका राहतो. १९१३ मध्ये या ठिकाणचे तापमान १३४.०६ डिग्री सेल्सिअस नोंदल्या गेले होते. आपण तापमानावरून अंदाज बांधू शकता की इथे मानवी वस्ती नाही, तसेच या ठिकाणी पाण्याचे निशाण ही आपल्याला सापडत नाहीत, आणि पाणी मिळालेच तर ते खार पाणी मिळत. आणि या ठिकाणाला जगातील सर्वात उष्णता असलेल ठिकाण म्हटल्या गेलेलं आहे.

तर वरील लेखात आपण पाहिले ४ असे जगातून वेगळे ठिकाणे ज्याविषयी बऱ्याच लोकांना कमी माहिती आहे, आशा करतो आपल्याला लिहिलेला छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved