Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

25 August Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवसाचे इतिहासाच्या दृष्टीने काहीना काही महत्व हे असतेच. इतिहासात घडलेल्या घटना त्या दिवसाला महत्व प्रदान करतात त्यामुळे त्या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त होते. याच प्रकारे, आज २५ ऑगस्ट आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण आजच्या दिवशी घडलेल्या सर्व घटनाची माहिती, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन आणि निधन याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 25 August Today Historical Events in Marathi

25 August History Information in Marathi
25 August History Information in Marathi

२५ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 August Historical Event

  • इ.स. १६०९ साली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ गॅलेली गॅलीलियो(Galileo Galilei) यांनी वेनेशियन व्यापार्‍यांना आपली नवीन निर्मिती, दुर्बिणीचे प्रात्याक्षिक दाखविले.
  • सन १९१९ साली लंडन ते पॅरिस देशादरम्यान जगातील पहिली दैनिक आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई सेवा सुरू करण्यात आली.
  • सन १९५७ साली जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मान सिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रांस मध्ये आयोजित विश्वकप जिंकला.
  • सन १९६० साली इटलीतील रोम या शहरात १७ व्या ऑलम्पिक स्पर्धा सुरु करण्यात आल्या.
  • सन २००१ साली सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२५ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १९२३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यक, समीक्षक व अर्थतज्ञ तसचं, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली भारतीय लोकसभा सदस्य बाबुराव काळे यांचा जन्मदिन.
  • सन १९४१ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसचं, “मिले सूर मेरा तुम्हारा”, “पूरब से सूर्य उगा” या गीताचे रचनाकार अशोक पत्की यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली भारतीय राजकारणी आणि माजी चित्रपट अभिनेते तसचं, तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली माजी श्रीलंकन क्रिकेटपटू व कर्णधार दुलिप मेंडीस यांचा जन्मदिन.
  • सन १९६२ साली  बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा जन्मदिन.

२५ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 August Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १८१९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता जेम्स वॅट(James Watt) यांचे निधन.
  • इ.स. १८२२ साली युरेनस ग्रहाचा शोध लावणारे जर्मन/ ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल (William Herschel) यांचे निधन.
  • इ.स. १८६७ साली विद्युत चुंबकीय यंत्राचा शोध लावणारे ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मायकेल फॅराडे (Michael Faraday) यांचे निधन.
  • सन १९०८ साली नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता हेनरी बेक्वरेल(Antoine Henri Becquerel) यांचे निधन.
  • सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते हरिभाऊ उपाध्याय यांचे निधन.
  • सन २००१ साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचे निधन.
  • सन २०१२ साली चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग(Neil Armstrong) यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेख आपणास २५ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या संपूर्ण घटनांची सविस्त माहिती मिळवून देतो. तरी आपण या लेखाचे जाणीवपूर्वक वाचन करून आपल्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद……

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved