Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

एखादी व्यक्ती लेफ्टी का असते? जाणून घ्या या लेखातून

Why are Some People Left-Handed

आपण लेफ्टी आहात काय?

जर नसणार तर आपल्या मित्र किंवा परिवारामध्ये एखादी व्यक्ती डावखुरी असणारच, जी डाव्या हाताचा वापर करून सर्व गोष्टी करत असणार, डाव्याच हाताने लिहिणे, डाव्या हाताने जेवण करणे, या सर्व गोष्टी जी डाव्या हाताने करते, त्या व्यक्तीला आपण डावखुरी म्हणत असतो.

पण दहा लोकांपैकी एक व्यक्ती हि डाव्या हाताने काम करते, असे का होत असेल किंवा एखादी व्यक्ती लेफ्टी का असते? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

तर चला जाणून घेऊया कि एखादी व्यक्ती लेफ्टी असण्यामागे काय कारण असते,

एखादी व्यक्ती लेफ्टी का असते? – Why are Some People Left-Handed

लेफ्टी असण्यामागील कारण – Causes of Being Left Handed

जगातील ८७ टक्के लोक उजव्या हाताच्या उपयोग करतात, आणि १० टक्के लोक डाव्या हाताचा उपयोग करतात. बरेचदा आपले आईवडील आपल्याला हे सांगताना दिसतात कि डाव्या हाताचा उपयोग शुभ कामासाठी करायचा नसतो.

डाव्या हाताचा वापर शुभ कार्याच्या वेळी करणे अशुभ मानल्या जातं.

पण काय खरचं डाव्या हाताचा वापर करणे आपल्यासाठी अशुभ असतं का? तर विज्ञान याला नकार देत आणि एखादी व्यक्ती डाव्या हाताचा वापर जास्त करत असली तर ती असे कसे करते?

सोबतच जगात १० टक्के लेफ्टी लोक असण्यामागचे कारण काय असेल तर याचे उत्तर आपल्याला विज्ञान देते, वर्षानुवर्ष या गोष्टीवर अभ्यास सुरु आहे,

विज्ञानाच्या मते लेफ्टी असण्यामागचे कारण समोर येण्यासाठी काही सिद्धांतावर काम केल्या गेले, त्यामधील एक सिद्धांत म्हणजे (Genetic Influence) असल्याचे समोर आले, (Genetic Influence) म्हणजेच अनुवांशिक प्रभाव, अनुवांशिक प्रभावामुळे बरेच लोक लेफ्टी असल्याचे समजते.

मानवी मेंदू कसा कार्य करतो?

<yoastmark class=

तुम्हाला माहिती आहे का? आपला मेंदू कशाप्रकारे कार्य करतो. नसेल माहिती तर चला मी आपल्याला सांगतो, आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत, एक म्हणजे उजवा मेंदू (Right Brain) आणि डावा मेंदू (Left Brain)

मेंदूचे हे दोन भाग कशाप्रकारे कार्य करत असतील, ह्या दोन भागांचे कार्य खूपच वेगळे आहे, ते कसे तर मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागाला नियंत्रित करतो, आणि मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाला नियंत्रित करतो.

तर आपण यावरून सुद्धा समजू शकता कि जर आपल्या मेंदूचा डावा भाग जर जास्त प्रमाणात काम करत असेल तर आपल्या शरीराचा उजवा भाग मजबूत म्हणजेच आपण राईटी असण्याची संभावना जास्त असते.

बाळाच्या जन्माच्या वेळेस आईच्या शरीराची इस्ट्रोजेन लेवल सोबतच बाळाचा जन्म कश्या प्रकारे झाला, यावरून सुद्धा ठरवले जाऊ शकते पण जर आईवडिलांपैकी एक कोणीही लेफ्टी असणार तर मुलगा सुद्धा लेफ्टी व्हायला हवा होता, म्हणून आजपर्यंत विज्ञानामध्ये ह्या गोष्टीला कोणती बायोलॉजीकल क्रिया कारणीभूत आहे, हे समोर आलेले नाही.

लेफ्टी लोकांविषयी थोडक्यात – Facts about Left Handed People

  • लेफ्टी लोक राईटी लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात.
  • लेफ्टी लोकांमध्ये नकारात्मक भावना ह्या थोड्या जास्त प्रमाणात असतात, सोबतच त्यांना राईटी लोकांपेक्षा राग खूप लवकर येतो.
  • लेफ्टी लोकांना एलर्जी मायग्रेन आणि झोप न येणे या समस्यांना सामारे जावे लागू शकते.
  • लेफ्टी लोकांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या हि अधिक आहे.
  • भरपूर तणावात असलेली गर्भवती महिला जास्त करून लेफ्टी बाळाला जन्म देते.
  • लेफ्टी लोक मल्टीटास्किंग करण्यात राईटी लोकांपेक्षा अधिक चांगले असतात.

आपणही लेफ्टी असणार किंवा आपल्या मित्रांमध्ये एखादी व्यक्ती लेफ्टी असणार तर त्यांच्यात ह्या गोष्टी आहेत का आपण पडताळून पहा.

आपण जर सोशल मिडीयावर असणार तर आपल्याला लिहिलेला हा लेख कसा वाटला सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका,

सोबतच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved