संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती

Dnyaneshwar Aarti

तेराव्या शतकात आपल्या महाराष्ट्राच्या भूमीस लाभलेले संत ज्ञानेश्वर महाराज हे एक महान संत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भागवत संप्रदायाची पताका संपूर्ण देशांत पसरून भागवत संप्रदायाचा विकास केला. म्हणून संत ज्ञानेश्वरांना भागवत संप्रदायाचे प्रवर्तक मानलं जाते. तसचं, या महान विद्वान संतानी आपल्या तत्त्वज्ञानाच्या बळावर सर्वांना समजेल अश्या शब्दांत भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग यासारख्या महान काव्यांची रचना केली.

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून अखंड वारकरी संप्रदाय आपल्या हरिपाठात नेहमीच पठन करीत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तसच, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती – Aarti Dnyanraja

Aarti Dnyanraja
Aarti Dnyanraja

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा |

सेविती साधुसंत ||

मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |

हित नेणती कोणी |

अवतार पांडुरंग |

नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |

उभ्या गोपिका नारी |

नारद तुंबर हो ||

साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |

विश्र्व ब्रम्हाची केलें |

रामजनार्दनी |

पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या रसाळ भाषेत भागवत गीतेवर टीका म्हणून भावार्थदीपिका या ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वर महाराजांनी या रसाळ ग्रंथाची रचना अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या नेवासे या गावी केली.

ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार भावार्थदीपिका या ग्रंथाची रचना केल्याने समाजातील सर्व थरांच्या लोकांना भागवत गीतेचा खरा अर्थ समजू लागला. पूर्वी भागवत गीता ही संस्कृत भाषेत लिहिली असल्याने त्याचे वाचन केवळ संस्कृत विद्वान आणि ब्राह्मण करीत असतं. शिवाय, संस्कृत भाषा ब्राह्मण सामाजाव्यातिरिक्त इतर लोकांना शिकण्यास मनाई देखील होती. त्यामुळे ब्राह्मण पंडित जसे सांगतील त्याप्रमाणे लोक त्याचा अर्थ लावीत असतं.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञानुसार त्यांनी भावार्थदीपिका या ग्रंथाच्या स्वरुपात भागवत गीतेवर टीका केली. भावार्थदीपिका या पावन  ग्रंथाला आपण ज्ञानेश्वरी असे म्हणत असतो. ज्ञानेश्वर महराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान पाकृत भाषेत आणलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here