जगातील सगळ्यात महाग लाकूड, किंमत जाणून व्हाल थक्क! नक्की वाचा

Most Expensive Wood Information 

आपण जगभरात बऱ्याच वस्तूंच्या किमती पाहिल्या असतील, ज्यांची किंमत हजारो किंवा लाखो रुपयांमध्ये असते, पण लाकडाची किंमत सर्वात जास्त किती असेल किंवा जगातील सर्वात महाग लाकूड कोणते असेल? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधी मिळाले नसेल. किंवा आपण शोधलं सुध्दा नसेल, तर आजच्या लेखात आपण जगातील सर्वात महाग लाकडाविषयी माहिती पाहणार आहोत, की त्या लाकडाचे नाव काय आहे? त्याची किंमत किती आहे? वगैरे वगैरे. तर चला पाहूया जगातील सर्वात महाग लाकूड आणि त्याविषयी थोडक्यात माहिती.

आपण सर्वांनी आजपर्यंत ऐकलेलं होत की चंदनाचे लाकूड सर्वात जास्त महाग असतात, आणि चंदनाच्या लाकडांना खूप जास्त पैसे देऊन विकत घ्यावे लागते. पण आपल्या माहिती साठी चंदनाचे लाकूड ५-७ हजार रुपये प्रति किलो ने आपल्याला बाजारात मिळून जाणार, पण जगातील सर्वात महाग लाकूड एवढं स्वस्त मिळत नाही, त्यासाठी जवळजवळ लाखो रुपये मोजावे लागतात. हो खरंच जगातील सर्वात महाग लाकूड विकत घेण्यासाठी आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतील. ह्या लाकडाला विकत घेण्यासाठी श्रीमंत लोक सुध्दा दहा वेळा विचार करतील.

हे आहे जगातील सर्वात महाग लाकूड – “African Blackwood” Most Expensive Wood in the World

Most Expensive Wood In the World
“African Blackwood” Most Expensive Wood In the World

या लेखाला वाचल्या नंतर प्रत्येकाच्या मनात एक विचार आला असेल की एका लाकडाची किंमत एवढी जास्त का असेल? तर मी नेहमी आपल्याला या मागचं एकच कारण सांगणार की ज्या वस्तूंची कमतरता भासते, किंवा ती वस्तू बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध असते, त्याच वस्तूंची किंमत सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत असते. हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. २०१९ च्या शेवटी ज्याप्रमाणे देशात कांद्याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात झाले होते तेव्हा कांद्याचे भाव आभाळाला भिडले होते. त्याचप्रमाणे हे लाकूड पर्यावरणात कमी प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणूनच या लाकडाचे भाव सुध्दा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

जगातील अश्या सर्वात महाग लाकडाचे नाव आहे आफ्रिकन ब्लॅकवुड. ह्या लाकडाचे झाड आफ्रिका देशात आढळते. आणि या झाडाला पूर्ण पणे वाढायला ६० वर्षांचा कालावधी लागतो. परंतु या झाडांच्या होणाऱ्या तस्करी मुळे या झाडाच्या लाकडांना लवकर कापून बाजारात विकल्या जाते. हे लाकूड जगातील सर्वात महाग वस्तूंमध्ये विकल्या जाते. या लाकडाला फक्त एक किलो विकत घेण्यासाठी आठ हजार पाउंड पैसे खर्च करावे लागतात. म्हणजेच भारतीय चलनात सात ते आठ लाख रुपये मोजावे लागतात, तेही फक्त एक किलो लाकडासाठी. आपण या बदल्यात एखादी लक्झरी चार चाकी गाडी विकत घेऊ शकतो. आपण कधी विचार सुध्दा केला नसेल की एखादे लाकूड एवढ्या जास्त प्रमाणात महाग असेल.

आफ्रिकी ब्लॅकवूड झाड पृथ्वीवरील सर्वात दुर्लभ झाडांपैकी एक आहे, हे झाड मध्य आफ्रिका तसेच दक्षिण आफ्रिकेच्या २६ विविध प्रदेशात पाहायला मिळतात, ह्या झाडांना बहुतेक करून कोरड्या ठिकाणी पाहायला मिळते. या झाडांची किमंत एवढी महाग असण्यामागे सुध्दा एक कारण आहे की या झाडांची पृथ्वीवर संख्या खूप कमी प्रमाणात आहे. या झाडांची उंची जवळजवळ ३० – ४० फूट असल्याची आपल्याला पाहायला मिळते. केनिया आणि टांझानिया सारख्या देशांमध्ये या झाडांची तस्करी होते, आणि यावर रोख लावण्यासाठी या झाडांना आधीच कापून घेतले जाते. ज्यामुळे ह्या झाडांची संख्या कमी होत आहे आणि ते दुर्लभ होत आहेत.

ह्या झाडांच्या लाकडांचा वापर काही खास वस्तूचे निर्माण करण्यासाठी केल्या जाते. जसे शहनाई, बासरी, आणि गिटार या संगीताच्या वाद्यांची निर्मिती करण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. एवढेच नाही तर घरातील फर्निचर सुध्दा या लाकडाचा वापर करून बनविल्या जातात. परंतु ते फर्निचर विकत घेणे सामान्य माणसाला परवडत नाही. असेच आहे जगातील सर्वात महाग लाकूड.

तर आजच्या लेखात आपण पाहिले की जगातील महाग लाकूड कोणते आहे आणि त्या लाकडाची किंमत किती आहे? तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here