• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Amarnath temple

अमरनाथ मंदिराचा इतिहास | Amarnath Temple History

September 3, 2018
Panjabrao Deshmukh Information in Marathi

पंजाबराव देशमुख एक महान व्यक्तिमत्व

December 13, 2019
Satara District Information In Marathi

सातारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

December 13, 2019
MS Dhoni Information in Marathi

महेंद्रसिंह धोनी च्या जीवनाची अनोखी कहाणी

December 12, 2019
Yavatmal District Information in Marathi

यवतमाळ जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

December 12, 2019
Atal Bihari Vajpayee Information in Marathi

अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन चरित्र

December 11, 2019
Prakash Amte Information in Marathi

आदिवासींच्या जीवनातील अंधार दुर करणारे ’’डॉ. प्रकाश बाबा आमटे’’

December 11, 2019
Ratnagiri District Information In Marathi

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

December 13, 2019
Osmanabad District Information in Marathi

उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

December 10, 2019
Ramabai Ranade Information in Marathi

पंडीता रमाबाई रानडे यांच्या विषयी संपूर्ण माहिती

December 13, 2019
Jaisalmer Fort Information in Marathi

जैसलमेर किल्ल्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

December 8, 2019
Washim District Information in Marathi

वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

December 12, 2019
Maharshi Dhondo Keshav Karve

महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संपूर्ण माहिती

December 10, 2019
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, December 13, 2019
MajhiMarathi
  • Home
  • Marathi Biography
  • Suvichar
  • Recipes
  • History
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

अमरनाथ मंदिराचा इतिहास | Amarnath Temple History

116
SHARES
Share on FacebookShare on Twitter

Amarnath Temple

अमरनाथ गुहा एक हिन्दू तीर्थस्थान व सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे. जम्मूची राजधानी श्रीनगर पासून 3.888 मिटर उंचीवर आहे येथे हिवाळयात हिन्दू धर्माचे भगवान शंकराची बर्फाची पिंड तयार होते.

Amarnath Temple
Amarnath Temple

अमरनाथ मंदिराचा इतिहास – Amarnath Temple History

या गुहेच्या चहूबाजुस उंच उंच डोंगर व टेकडया आहेत. गुफा जवळपास वर्षभर बर्फाने आच्छादीत असते जेव्हां शिवलींग आकार घ्यायला लागते, तेव्हा श्रध्दाळूंसाठी अमरनाथ मंदीराचे व्दार उघडे केले जाते. भारतातुनच नाही तर जगभरातील हिन्दू भावीक येथे दर्शनासाठी येतात, यात बाबा बर्फानी म्हणजेच शिवाचे एक पवित्र ज्योर्तिलिंग मानल्या जाते. व त्यांच्या प्रमुख 12 ज्योर्तिलिंगापैकी सर्वात पवित्र मानल्या जाते.

दरवर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन होते, त्यावेळी भावीक भक्तीभावाने तेथे येवून दर्शनाचा लाभ घेतात. इतिहासात हिन्दू आर्यराजा येथील शिवलींगाची पुजा करत होते याचे पूरावे आहेत. रजतरंगीनी या पुस्तकात अमरनाथ गूहा मंदीरास अमरेश्वर असे ही नामकरण केले गेले होते. 11व्या शतकात राणी सुर्यमणी ने यांस एक मोठा त्रिशुल बनविला आणि इतर पवित्र चिन्हं मंदीरास भेट दिली होती. येथे यात्रेची सुरूवात हिंदू शासक प्रजाभट्ट यांच्या काळापासुन सुरू आहे. याशिवाय या गुहेबाबत काही धार्मिक कहाण्या ही उपलब्ध आहेत.

पवित्र गुहेचा शोध – Baba Barfani Gufa Amarnath temple

असे म्हंटले जाते की मध्यकाळातील शतकात याचा शोध लागला होता त्यानंतर 15 व्या शतकात धर्मगुरूंनी अमरनाथ गूहेस एका मंदीराचे स्वरूप दिले. धार्मिक आख्यायिकेनुसार भृगु ऋषींनी क्रोधात काश्मीर मधील बर्फ वितळवुन त्यास जलमग्न केले होते. त्यानंतर कश्यप मूनींनी येथील नदयांमधील पाणी परत बर्फात रूपांतरीत केले आणि अमरनाथ गुहेचा शोध घेउन शिवलिंगाची पुजा केली. सामान्यांच्या मते येथे नैसर्गिक रित्या भोलेनाथ शिवशंकराच्या कृपा व ज्योर्तिलिंगाच्या प्रतापामुळे बर्फाचे शिवलिंग स्थापीत होते.

लिंग – Amarnath temple

40 मिटर उंच अमरनाथ गुहेत पाण्याच्या एका विशेष स्थानी पडल्याने त्याचे बर्फात रूपांतर होवून 8 फुटांची पवित्र पिंड तयार होते. पिंड आॅगस्ट महिन्यात बनते व सुर्य उगवल्यावर या पिंडीचा आकार वाढतो तर चंद्रदर्शनानंतर याचा आकार कमी होतो. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत येथे शिवपिंड राहाते व उन्हाळा सुरू झाल्यावर पिंड पूर्णपणे नाहिशी होते. ही पिंड कशी तयार होते याचे पुरावे नाहीत. वैज्ञानिकांच्या शोधातही काही निष्पन्न झाले नाही. शिवपिंड याच ठिकाणी असून त्याच्या आजुबाजूस एका मंदीराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अमरनाथ गुहेची यात्रा – Amarnath Yatra Details

दरवर्षी पवित्र अमरनाथ ज्योर्तिलिंगाच्या दर्शना साठी मोठया संख्येने भावीक भक्त 2 महिन्याच्या कडक सरावानंतर या यात्रेसाठी पात्र ठरतात. भावीक श्रीनगर पर्यंत ट्रेन, बस, विमान, व हेलीकाॅप्टर ने ही येतात. यात्रेसाठी श्रीनगर पासून 5 दिवस लागतात.

जम्मूतील बस महामंडळ पहलगाम पर्यंत व तेथून भावीकांना पायी यात्रा करावी लागते. यासाठी खच्चर व सामान वाहून नेण्यासाठी माणसे कमी दरात उपलब्ध असतात. भावीक 16 किलोमिटर ची पायी यात्रा, वर 3,888 मिटर चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, या रस्त्यात उंच डोंगर व लाकडी पुलांच्या मदतीने चढाई करावी लागते. रस्त्यात अमरवाथी नदी ही पहायला मिळते. ही येथील शुपक बर्फाच्या उलेशियर मधून निघते.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव व गणेश यांनी पहलगाम ( बैलगाव ) येथे नदीस सोडून वर चढाई करायला गेले होते, चंद्रवाडी येथे त्यांनी आपल्या जटा मुक्त करून तेथे चंद्रास सोडून गेले होते. शेषनाग सरोवरात आपल्या गळयातील नागास सोडले होते.

पूढे महानुनास ( महागणेश पर्वत ) येथे गणेशने भगवानांना थांबायला सांगितले होते. पंजतारनी येथे त्यांनी त्यांच्या शरीरातील पंचतत्वांचा त्यांग केला होता. त्यानंतर शिव तेथे तांडव नृत्य करीत अमरनाथ ज्योर्तिलिंगात स्थापीत झाले होते. त्यानंतर त्यांनी लिंगाची स्थापना केल्यावर सर्व सोडलेल्या गोष्टींना परत घेउन गेले होते.
नंतर माता पार्वतीस या ज्योर्तिलिंगास भेटी साठी घेवून गेले होते. व त्यांच्या दोघांचे शरीरतत्व तेथे एकत्रपणे स्थिरावले आहेत.

हिन्दूंच्या सर्वात पवित्र यात्रांमध्ये अमरनाथ ज्योर्तिलिंगाची यात्रा गणल्या जाते हे अत्यंत पवित्र आणि शांत व स्थिर ठिकाण आहे. दरवर्षी येथे 40 – 50 हजार श्रध्दाळू दर्शनासाठी या कठीण यात्रेस पूर्ण करतात.

2011 मध्ये रेकाॅर्ड 6,25000 लोक येथे दर्शनासाठी आले होते. त्यानंतर भारत सरकारच्या प्रयत्नाने 2012 नंतर दरवर्षी ही संख्या वाढत चालली आहे. हया यात्रेचे मुख्य आकर्षण श्रावणमासांत असते. या 45 दिवसांच्या कालावधीस ही यात्रा मुख्यत्वे करून ख.या अर्थाने यात्रेचे स्वरूप प्राप्त करते. त्यामुळे जूलै अखेर ते सप्टेंबर मध्ये येथे लोक दर्शनासाठी येतात. यात्रेचा सर्वात शुभ कालावधी गुरू पौर्णिमा आणि श्रावण पौर्णिमेस मानतात.

भावीक मोठया उत्साहाने या उत्सवात लीन होउन जातात. या शिवाय यात्रेकरूंच्या सर्व प्रकारच्या समस्यांची काळजी व त्यांच्या सूविधेची काळजी घेतली जाते.
पावसाळयात कधी कधी जोराचा पाउस या यात्रेस बाधीत करतो. त्यासाठी यात्रेच्या मार्गावर प्रशासन राहायची व खानपानाची उचीत सोय करते. पहलगाम यांस धर्मगुरूचे स्थान मानल्या जाते. येथेच शिवशंकराचे भक्त वास करतात.

अमरनाथ यात्रेचे आयोजक

अधिकारीक तत्वावर यात्रेचे आयोजन राज्यसरकार श्री अमरनाथ यात्रा मंडळ यांच्या सहयोगाने करते. सरकारी यंत्रणा भावीकांना यात्रेच्या प्रवासातील समस्यांचे निराकरण करते तसेच मंडळ गुहामंदीराची व्यवस्था पाहाते. यासाठी सरकार अन्न, कपडे, खेचर, टेंट आणि संपर्क साधनांची पूर्तता करते. तर मंडळ यात्रेकरूंना मंदीरात दर्शनाची सोय करते.

सुरक्षा

प्रत्येक वर्षी भारतीय सेना व केंद्रीय राखीव पोलीस दल या यात्रेच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात.

सुविधा

गुहा मंदीरापर्यंत पोहोचण्याकरता भारत सरकार व जम्मू काश्मिर सरकार यात्रेकरूंच्या सर्व प्रकारच्या सोई पुरवतात त्यामुळे यात्रा अधिक सूगम व मनोचित होते. यात्रे दरम्यान 100 पेक्षा जास्त थांबण्यासाठी पेंडाॅल स्थापीत केले जातात. पंचतारणी येथून वर 6 कि. मी. पर्यंत हेलीकाॅप्टरची सेवा पुरवण्यात येते.

अमरनाथ यात्रा जो पण भक्त करतो तो याच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी अमरनाथ मंदीर चा इतिहास बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा अमरनाथ मंदीर  – Amarnath Temple History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.

नोट: अमरनाथ मंदीर – Amarnath Temple History  या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Share46Tweet29
Editorial team

Editorial team

Related Posts

Jaisalmer Fort Information in Marathi
Forts

जैसलमेर किल्ल्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Jaisalmer Fort History भारतात अश्या अनेक ऐतिहासीक वास्तु आहेत की ज्यांना त्यांच्या अद्भुत बांधकामामुळे आणि अनोख्या वास्तुशिल्पामुळे वैश्विक वास्तुंच्या यादीत...

by Editorial team
December 8, 2019
Cricket Information in Marathi
History

क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास

Cricket Information in Marathi स्वास्थ्यपुर्ण आणि आनंदी जीवनाकरता सतत काही ना काही खेळत राहाणे फार आवश्यक आहे त्यातही बैठया खेळांपेक्षा...

by Editorial team
November 22, 2019
  • Trending
  • Comments
  • Latest
Marathi Ukhane For Bride For Marriage

नवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे

December 2, 2019
नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

December 2, 2019
Motivational quotes in Marathi for success

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 101 Motivational Quotes in Marathi

December 9, 2018
Motivational quotes in Marathi for success

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 101 Motivational Quotes in Marathi

28
नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

9
Marathi Suvichar

500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

9
Panjabrao Deshmukh Information in Marathi

पंजाबराव देशमुख एक महान व्यक्तिमत्व

December 13, 2019
Satara District Information In Marathi

सातारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

December 13, 2019
MS Dhoni Information in Marathi

महेंद्रसिंह धोनी च्या जीवनाची अनोखी कहाणी

December 12, 2019
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com