Amazing Facts about Animals
जगात अनेक असे प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल आपणास पुरेपूर माहिती नाही आहे. त्यांच्या अंगी असेलेले विशेष गुण पाहून आपण सुद्धा थक्क होवून जाल. चला तर जाणून घेवूया अश्या प्राण्यांबाबत ज्यांच्या अंगी असलेल्या विशेष गुणधार्मामुळे ते ओळखले जातात.
प्राण्यांबाबत आपणास माहिती नसलेल्या काही मनोरंजक गोष्टी – Amazing Facts about Animals
- मांजर ही तर आपण सर्वांना परिचित आहे. मांजरीला आपण पाळीव प्राणी म्हणून ओळखतो. बरेच लोक आपल्या घरी मांजरीला पाळतात. परंतु, आपणास मांजरी बाबत एक गोष्ट माहिती आहे का? जर आपण मांजरीला चॉकलेट खाऊ घातले तर ती मरू शकते.
- कुत्रा हा पाळीव प्राणी असून त्याला सर्वात इमानदार प्राणी मानलं जाते. परंतु, कुत्र्याच्या अंगी असलेले हे वैशिष्ट्ये एकूण आपण सुद्धा चकित व्हाल. जर एखाद्या कुत्र्याची IQ टेस्ट केल्यास कुत्र्याची बुद्धिमता ही, ३ वर्षाच्या मुला इतकी बुद्धिमान असल्याचे निष्पन्न होते.
- सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जाते. तसचं, देशांत मोठ्या आस्थेने सर्वत्र सापांची पूजा केली जाते. परंतु, आपणास माहिती आहे का? की, सापाला दुध पाजल्यास त्याच्या फुफ्फुसात संक्रमण होवून त्याचा मृत्यू होवू शकतो. त्याचबरोबर, साप हा असा सजीव आहे जो, एका वेळेस ३-४ वर्ष झोपू शकतो.
- सिंह हा जंगली हिंसक प्राणी असून त्याच्या डरकाळीचा आवाज सुमारे ९-१० किमी अंतरावर ऐकला जावू शकतो.
- कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना सुद्धा मानवाप्रमाणे डावा आणि उजवा हात असतो.
- एक तरुण सिंह सुमारे १०० किमी प्रती तासाच्या गतीने धावू शकतो.
- वाळवंटातील जहाज म्हणून ख्याती असलेला उंट हा प्राणी वाळवंटात राहण्याऱ्या लोकांचा पाळीव प्राणी आहे. उंटांच्या आधारे तेथील लोक आपला उदरनिर्वाह करीत असतात. परंतु, आपणास उंटा बाबत एक गोष्ठ माहिती आहे का? उंट हा प्राणी एकाच वेळी सुमारे १२५ ली. पाणी पिवू शकतो.
- मुंगी हा एकमेव सजीव असा आहे ज्याच्या शरीरात श्वास घेण्यासाठी फुफ्फुस नाही आहे.
- हत्ती हा भक्कम स्वरूपी शरीर प्रकृती असलेला एक जंगली प्राणी असून तो शाकाहारी आहे. सुरुवातीच्या काळात या प्राण्याचा वापर जड वस्तू उचलण्यासाठी केला जात असे.
- मांजरीला वाघाची मावशी म्हटल जाते. त्यामुळे की काय! वाघ आणि मांजरीचा DNA ९० टक्के एकसारखा असतो.
- वाघाला जंगलाचा राजा म्हटल जाते. तसचं, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. परंतु वाघाबाबत आपणास एक गोष्ठ माहिती आहे का? वाघाचे वजन हे सुमारे २०० ते ३०० किलो असते. काही वाघांचे तर यापेक्षा जास्त असू शकते.
- “हत्तीचे कान सुपा एवढे” ही मराठी म्हण तर आपण सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या म्हणीला साजेशे हत्तीचे कान देखील मोठेचं असतात. परंतु, हत्तीचे कान जरी मोठे असले तरी त्यांची ध्वनी श्रवण करण्याची क्षमता खूप कमी असते.
- उंदीर हा असा प्राणी आहे जो वर्षातून सुमारे १५०० पेक्षा जास्त पिल्लांना जन्म देतो.
- सापाला शेतकऱ्यांच मित्र मानलं जाते. कारण, तो शेतकऱ्यांना उंदरापासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानापासून त्यांची मदत करत असतो. तसचं,साप हा खूप गरीब प्राणी सुद्धा आहे. परंतु, चुकीने सापाच्या अंगावर पाय पडल्यास किंवा त्यांना मुद्दाम त्रास दिल्यास ते दंश करतात.
- वाघ हा जंगलातील सर्वात हिंसक प्राणी असून त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच त्याला जंगलाचा राजा म्हटल जाते. तसचं, इतर जंगली हिंसक प्राण्यांच्या दृष्टीने वाघ हा खूप चपळ आणि ताकदवान प्राणी आहे.
- मानवी हातांच्या ठस्यांनुसार वाघाच्या अंगावरील रेषा वेगळ वेगळी होते.
- प्रतिवर्षी सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू हा सापाने दंश केल्यामुळे होतो.
- लांडगा आणि कुत्र्याचा DNA सुद्धा ९० टक्के एकसमान असतो.
- मानवाप्रमाणे कुत्र्यांनासुद्धा लाठ्पणाचा त्रास होत असतो.
- खारुताई किमान ७० किमी प्रती तास वेगाने धावू शकते.
- मांजरी संबंधित अंधविश्वास जास्त करून आपल्या देशातच पाहायला मिळतो.
- कुत्र्यांच्या काही प्रजाती अश्या सुद्धा आहेत जे आपल्या दोन्ही पायावर उभे राहून लघुशंका करतात.