आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि कोट्स

Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे. ही वारी यंदा चुकली त्यामुळे वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नाही, पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन चंद्रभागे तिरी उभा असलेला विठुराया प्रत्येक सजीवाच्या हृदयात विराजमान आहे. त्याचे तिथेच मनोमन दर्शन घेऊन उद्भवलेल्या संकटाला नामशेष करण्याची प्रार्थना करूया…!!

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि कोट्स – Ashadhi Ekadashi Quotes Wishes in Marathi

Ashadhi Ekadashi Quotes in Marathi
Ashadhi Ekadashi Quotes in Marathi

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर
उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया

भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा… !

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

“जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा…”

चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी!आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग… देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Images

Ashadhi Ekadashi Images
Ashadhi Ekadashi Images

“दाटलासें कंठ
रिते वाळवंट…पाहुनिया”

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

“दिसेना रिंगण
नाही टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ
पांडुरंगा”

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।, तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।

जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

Ekadashi Status

Ekadashi Status
Ekadashi Status

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय”

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

Vithu Mauli Images

Vithu Mauli Images
Vithu Mauli Images

“सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी…”

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास, सार्‍या विठू भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

पालख्यांचा सोहळा नाही, वारकऱ्यांचा मेळा नाही, तो दरवर्षीचा आनंद सोहळा नाही, पण हा विठुराया यंदा आपण कित्येकांच्या रूपात उभा पाहिला, अविरत रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर च्या रूपात…निरंतर स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या रूपात…हो नां त्यांच्यात दिसलाच की आपल्याला पांडुरंग !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here