Tuesday, August 26, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

अथेलेटिक्स बद्दल संपूर्ण माहिती

Athletics Information in Marathi

अथेलेटिक्स म्हणजे खेळांचा समूह. या समूहात धावणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक इ. खेळांचा समावेश होते. मानवाच्या अंगी असलेल्या मूळ गुणांची ओळख करून देणारे हे खेळ. या खेळांचे वैशिष्टय म्हणजे यांकरिता कुठलेही महागडे साधन-सामुग्रीची गरज नसते. यांपैकी बहुतांश खेळ आपण आपल्या शालेय जीवनात देखील नक्कीच खेळले असू. चला तर मग अथेलेटिक्स खेळांबद्दल काही महत्वाची माहिती बघुयात.

अथेलेटिक्स बद्दल संपूर्ण माहिती – Athletics Information in Marathi

Athletics Information in Marathi
Athletics Information in Marathi

अथेलेटिक्स खेळाचा इतिहास – Athletics History in Marathi

या खेळांच्या स्पर्धांची सुरुवात नेमकी कुठे झाली हे जरी नेमके माहित नसले तरी, इजिप्त आणि आशिया खंडातील महान संस्कृतींमध्ये हे खेळ खेळले जायचे अशी माहिती सापडते.

अथेलेटिक्स खेळांचा ऑलिम्पिक मधील समावेश – Athletics In Olympics

अथेलेटिक्स खेळांमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश खेळांचा समावेश ऑलिम्पिक मध्ये होतो. तसेच यामध्ये प्रत्येक देशातील खेळाडू सहभागी झालेले पाहायला मिळतात. अथेलेटिक्स खेळांचा समावेश प्राचीन ऑलिम्पिक मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर १८९६ सालापासून या खेळांचा समावेश आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा झाला.

अथेलेटिक्स खेळाचा उद्देश्य – Athletics Sports Intention

मानवाला आपल्या मधील शारीरिक शक्तीची ओळख पटविण्यासाठी हे खेळ खेळले जातात. परंतु खेळ म्हटले कि, जिंकणे आणि हरने आलेच. मग या खेळांमध्ये जिंकण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. ते खालील प्रमाणे :

  • धावणे (Running) : यामध्ये दिलेल्या वेळेत दिलेले अंतर जो स्पर्धक सर्वात आधी पूर्ण करेल तो विजयी ठरतो किंवा शर्यतीत भाग घेणाऱ्या एकूण स्पर्धकांपैकी जो अगोदर दिलेले अंतर पूर्ण करेल तो विजय ठरतो.
  • गोळा किंवा भाला फेक (Throwing) : या खेळामध्ये जो खेळाडू सर्वात दूर गोळा किंवा भाला फेकेल तो विजयी ठरतो.
  • उडी (Jumping) : यामध्ये जो खेळाडू सर्वात लांब किंवा सर्वात उंच उडी मारतो तो विजयी ठरतो.

अशा प्रकारचे साधे आणि सोपे खेळ अथेलेटिक्स अंतर्गत खेळले जातात. आणि विशेष म्हणजे या खेळांसाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होतात. खेळांचे नियम सुटसुटीत आणि कुणालाही कळतील एवढे सोपे आहेत.

अथेलेटिक्स खेळाबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Athletics Quiz Questions and Answers

१. अथेलेटिक्स खेळ म्हणजे काय?

उत्तर: अथेलेटिक्स हा खेळ नसून खेळांचा समूह आहे.

२. अथेलेटिक्स मध्ये समाविष्ट खेळ कुठले आहेत?

उत्तर: यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक आणि अशा इतर खेळांचा समावेश आहे.

३. अथेलेटिक्स ऑलिम्पिक खेळामध्ये समाविष्ट आहे का?

उत्तर: होय.

४. अथेलेटिक्स खेळांचा उद्देश्य काय आहे?

उत्तर: माझ्या मते या खेळांचा उद्देश्य, मानवाला आपल्या मूळ गुणांची आणि शक्तीची जाणीव करून देणे हा आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved