केळी या फळाची माहिती मराठी

Banana chi Mahiti

आपल्या सर्वांना परिचित असणारे बारमाही फळ म्हणजे केळे होय, केळे हे फळ सर्वांना आवडते.

केळी या फळाची माहिती मराठी – Banana Information in Marathi

हिंदी नाव : केला
इंग्रजी नाव : Banana

केळीच्या झाडाचे खोड जाड असते. याला फांद्या नसतात. खोडातूनच हिरवीगार पाने उगवतात. पानांना मधोमध जाड शिरा असतात. पाने दोन्ही बाजूंनी पसरट व रुंद असतात. केळीच्या खोडाला खुंट म्हणतात, ते हिरव्या रंगाचे असतात. खोडाच्या वर फळे येतात.

झाडाच्या मुळाशी अनेक कोंब येतात. हे कोंब दुसरीकडे लावूनच केळीची रोपे तयार करतात. केळीच्या फुलांना केळफूल म्हणतात. हे फूल शंक्वाकृती असते. या फुलाच्या एकेक पाकळ्या गळून पडल्या की एकेक फळ लागून फणी दिसू लागते आणि घड तयार होतो. एका घडावर दोनशे ते तीनशे फळे असतात.

जाती : सोनकेळी, राजेळी, वेलची अशा केळीच्या पुष्कळ जाती आहेत.

औषधी उपयोग : केळ हे फळ थंड आहे. शरीरात उष्णता वार असता केळ खाण्यास देतात. गोवर आला असता केळ हे फळ पर पडते. केळात क्षार आहेत. त्याचा आपल्या शरीराला अनेक प्रकार उपयोग होतो. पंडुरोग झाल्यास केळ खाण्यास देतात.

इतर उपयोग : कच्च्या केळ्यांची भाजी करतात. तसेच केळफुलांचा उपयोग भाजी, भजी करण्यासाठी होतो, केळीच्या पानांचा उपयोग जेवणासाठी करतात. उडदाचे पापड करताना पीठ भिजवण्यासाठी केळीच्या खुंटाचा रस वापरतात. पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून केळ वापरतात.

केळ हे फळ खाण्यासाठी, तसेच जेवणात केळी, दुध व साखर घालून तयार केलेले शिकरण पक्वान्न म्हणून वापरतात. पूजेच्या वेळी चौरंगाला केळीचे खुंट बांधून सुशोभित करतात. तसेच लग्न-समारंभ व इतर शुभकार्यांत केळीचे खुंट वापरतात.

कोकण, कर्नाटक, वसई, धुळे, जळगांव या भागांत केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. केळ्याच्या सोपट्यांची राख रंगात वापरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here