बँकेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहात तर जाणून घ्या या महत्वपूर्ण टिप्स

IBPS Exam Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खास स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी हा विशेष लेख घेऊन आलो आहोत. आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे आहे आणि आपल्या पैकी बहुतेक जण या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहोत. आज कुठल्याही क्षेत्रांत जायचं म्हटलं तर स्पर्धा ही आहेच. आज आपल्या देशांतील बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा स्पर्धा परीक्षेकडे असल्याचा आपल्या निर्दशनास येते. परंतु, या स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपणास त्याबाबतीत संपूर्ण माहिती असणे खूप आवश्यक बाब आहे.

आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, त्या क्षेत्रासंबंधी संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या देशांत दरवर्षी बँकिंग क्षेत्रांत शिपाई, क्लर्क, मॅनेजर इत्यादी पोस्टसाठी अनेक जागा निघत असतात. प्रत्येक पोस्ट करिता वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक पात्रता हवी असते. त्यामुळे जर आपण बँकिंग परीक्षेची तयारी करीत असाल तर आपणास कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत त्या या आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया.

बँकेच्या परीक्षेची तयारी कशी करावी – Bank Exam Information in Marathi

Bank Exam Information in Marathi
Bank Exam Information in Marathi

बँकिग क्षेत्राबद्दल सांगायचं झालं म्हटल तर हे विशेष करून एक कॉमर्स विषयाशी संबंधित असलेलं क्षेत्र आहे. परंतु, पदवीचे शिक्षण पूर्ण असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रांतील विद्यार्थ्याला बँकेची परीक्षा देता येते. तसचं, प्रत्येक पोस्ट करिता वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची गरज असते. जसे की आपणास शिपाई पदाची जागेकरिता अर्ज करायचा असेल तर आपणास किमान एच. एस. सी म्हणजे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लार्क किंवा मॅनेजर पदाकरिता पदवीचे शिक्षण पूर्ण केलेलं असणे आवश्यक आहे.

तर, बँक क्षेत्र हे अश्या स्वरूपाच क्षेत्र आहे जिथे आपण आपल्या जीवनाला एक सुंदर प्रकारे दिशा देवू शकतो. चला तर जाणून घेवूया बँकेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना आपणास कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

How to Prepare For Bank Exams 2020

मित्रांनो, बँकेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना आवश्यक असणाऱ्या विषयांसंबंधीत माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेवूया. बँक या क्षेत्रांत प्रामुख्याने आपणास गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, संगणकीय ज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बँकेची परीक्षा ही ऑन लाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येते. शिवाय परीक्षेचा कालावधी हा ६० मिनिटाचा म्हणजेच 1 तासाचा असतो. संपूर्ण पेपर हा १०० गुणांचा असून त्यास केवळ ६० मिनिट इतकाच कालावधी असतो. प्रत्येक विषयाला वेगवेगळे गुण दिलेले असतात शिवाय, प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे देखील आवश्यक असते.

इंग्रजी विषय, बुद्धिमत्ता किंवा न्युमरिकल गणित यापैकी कोणत्याही पेपर मध्ये अनुतीर्ण झाल्यास आपण निवड चाचणी करिता पात्र ठरू शकणार नाहीत.

बँकिंग क्षेत्रांत सरावाला खूप महत्व आहे आपण जर खूप जास्त मेहनत करून या विषयांचा सतत सराव करीत राहिलात तर आपणास नक्कीच यश प्राप्त होईल. मित्रांनो, जर आपण बँकेच्या परीक्षे विषयी प्रयत्नशील असाल तर एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच येईल. धन्यवाद.

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here