• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 16, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

हे आहेत ७ क्रिकेटचे खेळाडू जे कधीही शून्यावर बाद झालेले नाहीत

7  Batsman Never Out on Zero

क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. मग तो आपल्या भारतात असो की संपूर्ण विश्वात क्रिकेट म्हटलं की आपल्याला आठवते ते भरलेलं मैदान आणि मैदानात प्रेक्षाकांचा खेळाडूंसाठी मोठ्या उत्साहाने असलेला प्रतिसाद. क्रिकेट मध्ये बरेच विक्रम आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत. कोणाचा शतकांचा विक्रम तर काही जणांचा सर्वात जास्त धावा असण्याचा विक्रम. पण असेही काही विक्रम आहेत ज्याची फारशी चर्चा होत नाही. अश्याच काहीश्या विक्रमांपैकी एक विक्रम आणि तो विक्रम करणाऱ्या खेळाडूंविषयी आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, आज आपण पाहणार आहोत असे क्रिकेट मधील खेळाडू जे त्यांच्या क्रिकेटच्या करियर मध्ये शून्यावर कधीही बाद झालेले नाहीत. तर चला पाहूया..

शून्यावर कधीही बाद न झालेले ७ क्रिकेट खेळाडू – 7 Batsman Who Never Out on Zero in Cricket Career

Batsman Who Never Out on Zero
Batsman Who Never Out on Zero

१) राहुल द्रविड – Rahul Dravid

भारताचे पूर्व क्रिकेटर आणि १९ वर्षा खालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे नाव आपण या यादीत सर्वात आधी पाहत आहोत कारण त्यांच्या क्रिकेटच्या कारकीर्दीत १७३ सामने खेळल्या नंतर एकवेळ सुध्दा शून्यावर बाद झालेले नाही.

२) सचिन तेंडुलकर – Sachin Tendulkar

मैदानात फलंदाजी साठी उतरल्या नंतर जो आवाज व्हायचा सचिन ! सचिन ! क्रिकेटचा देव ज्या व्यक्तीला मानल्या जाते त्या व्यक्तीच या यादीत नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत १३६ सामने खेळल्या नंतर सुध्दा कधीही शून्यावर बाद झाले नाही.

३) एलेक स्टीव्हर्स – Alec Stewart

इंग्लंड देशाचे पूर्व क्रिकेटर एलेक स्टीव्हर्स यांचे नाव या यादीत आपण तिसऱ्या क्रमांकावर पाहतो आहे, यांनी यांच्या क्रिकेटच्या कारागिर्दीत १३५ सामने खेळले आहेत आणि एकही वेळा शून्यावर बाद झाले नाहीत.

४) कार्ल हुपर – Carl Hooper

कार्ल हुपर हे वेस्ट इंडिस चे पूर्व खेळाडू आहेत. एके काळी त्यांचे नाव महान खेळाडूंमध्ये समाविष्ट होते. त्यांनी त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत १२२ सामने खेळले आणि त्यापैकी एकवेळ सुध्दा ते शून्यावर बाद झालेले नाहीत.

५) जेरेमी कोनी – Jeremy Coney

जेरेमी कोनी हे न्यूझीलंड पूर्व क्रिकेटर राहिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत ११७ सामने खेळले आहेत, आणि ते एकवेळ सुध्दा शून्यावर बाद झालेले नाहीत.

६) केप्लर वेसल्स – Kepler Wessels

केप्लर वेसल्स हे दक्षिण आफ्रिकेचे पूर्व क्रिकेटर राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत १०९ सामने खेळले असून एकवेळ सुध्दा शून्यावर कधी बाद झालेले नाहीत.

७) यशपाल शर्मा – Yashpal Sharma

यशपाल शर्मा भारताचे पूर्व क्रिकेटर राहिलेले आहेत. यांनी त्यांच्या क्रिकेटच्या कारगिर्दीत ४२ क्रिकेटचे सामने खेळले आहेत आणि ८३३ धावा काढल्या आहेत पण यशपाल शर्मा त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत कधी शून्यावर बाद झालेले नाहीत.

तर ही यादी होती अश्या काही खेळाडूंची जे त्यांच्या क्रिकेटच्या कारगिर्दीत कधीही शून्यावर बाद झालेले नाहीत, आणि त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने बरेचदा आपल्या देशांना जिंकून दिलेले आहेत. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल.

आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना आणि क्रिकेटप्रेमींना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved