अस्वल प्राण्याची माहिती

Aswal in Marathi

अस्वल जंगलात राहते. इतर जंगली प्राण्यांपेक्षा हा प्राणी वेगळा दिसतो. अस्वल गुदगुल्या करून प्राणी व माणसांना हैराण करतो.

अस्वल प्राण्याची माहिती – Bear Information in Marathi

Bear Information in Marathi
Bear Information in Marathi
हिंदी नाव : भालू
BEAR MONKEY

हा प्राणी केसाळ आहे. त्याचा रंग काळा असतो. अस्वलाला चार पाय, दोन डोळे व दोन छोटे कान असतात. अस्वलांचे नाक व तोंड हे कुत्र्यासारखे असते.

अस्वलाचे पाय व पंजे पण केसाळ असतात.

अस्वलाचे खाद्य – Bear Food

अस्वल हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारीसुद्धा आहे. अस्वलाला ताजी फळे-बोरं, मधमाश्यांच्या पोळ्यातला मध या गोष्टी आवडतात.

हरिण, घोडा यांसारख्या प्राण्यांचे मांसही खायला आवडते.

अस्वल शिकार करताना समोर आलेल्या सावजाला आधी खप गुदगुल्या करून हैराण करते आणि मग आपल्या नखांनी फाडून खाते.

अस्वल प्राण्यांची हाडेसुद्धा आपल्या दाढांनी कडाकडा फोडून खाते, अस्वलाची सगळी शक्ती त्याच्या जबड्यात असते.

हा प्राणी हे मध, फळे खाण्यासाठी झाडावर भराभर चढते; परंत त्याचा देह स्थूल असल्याने तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारू शकत नाही.

इतर माहिती : अस्वल हा प्राणी कळपाने कधीही राहात नाही अस्वलाचे वजन फार असते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे घ्राणेंद्रिये फार तीक्ष्ण असतात.

त्याला माणसाचा वास चटकन येतो अस्वलाची मादी एका वेळी २-३ पिलांना जन्म देते. ही पिले जन्मल्यानंतर ३-४ आठवड्यांनंतर डोळे उघडतात. पिलांचे संगोपन अस्वल मादीच करते.

हा प्राणी थंडीच्या दिवसांत सहा महिने स्वस्थपणे शीतनिद्रा घेतो.

जेव्हा जागा होतो तेव्हा शिकार करतो. हा प्राणी उत्तम नकलाकार आहे. बाईंच्या रडण्याचा अगदी हुबेहूब आवाज हा प्राणी काढतो.

अस्वले हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा शीतनिद्रा घेतात तेव्हाच मादी अस्वल पिल्लांना जन्म देते. अस्वलाचे निरनिराळे खेळ दाखविणाऱ्या दरवेशांचा उदरनिर्वाह या प्राण्याच्या जीवावर चालतो.

या प्राण्याच्या केसांचा उपयोग दोरखंड तयार करण्यासाठी, लोकर काढण्यासाठी करतात. त्याच्या कातड्याचा उपयोग कपडे बनवण्यासाठी होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here