Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

गुणकारी लसणाचे फायदे

आपणाला सर्वांना परिचित असणारी रोज जेवणात वापरली जाणारी वनस्पती म्हणजे लसूण होय. कांद्यासोबत नेहमी लसनाचा उपयोग हा रोजच्याच स्वयंपाकात होतो. तसेच याचा औषधीसाठी सुद्धा वापर केला जातो.

मुख्यतः भारतीय खाद्यपदार्थामध्ये लसूनाचा समावेश असतोच फक्त खाद्यपदार्थ म्हणूनच नाहीतर एक उत्तम घरगुती औषध म्हणूनही लसणाचा वापर होतो. भारतीय स्वयपाक घरात तयार होणाऱ्या खाद्द्यान्नात बरेचदा लसून वापरतात. या लसणाचे बरेच उपयोग आहेत. चला तर आता आपण लसूनापासून होणाऱ्या फायद्यांची माहिती आपण समोर बघणार आहोत.

गुणकारी लसणाचे फायदे – Benefits Of Garlic in Marathi

Benefits Of Garlic

शास्त्रीय नाव :(एलियम सटायव्हम्) Allium sativum
इंग्रजी नाव :(गार्लिक) Garlic
हिंदी नाव :लहसुन

लसूण ही वनस्पती कंदमूळ वर्गात मोडते. लसणाचे झुडूप ४० ते ५० सें.मी. उंच वाढते. लसणाचे गड्डे जमिनीत लागतात व पाने जमिनीतून वर येतात. याची पाने हिरवी असतात. आणि ती वाळल्यावर पिवळी दिसतात. याची पाने आकाराने चपटी, लांबट व आतून नळीसारखी पोकळ अशा प्रकारची असतात. यातून मधोमध दांडा उगवतो त्याच्या टोकाला झुपक्याने फुले येतात, आणि त्याचा रंग हा पांढरा असतो. लसूण हा जमिनीत उगवतो तरी त्याला लहान लहान पंधरा ते वीस पाकळ्या असतात. तसेच त्याला वरून पांढरट तांबूस रंगाचे टरफल असते. आणि लसूण हा आतून पिवळसर पांढऱ्या रंगाचा असतो.

लसणाची लागवड – Lasun Lagwad Mahiti Marathi

लसणाची लागवड करताना जमीन ही मध्यम प्रकारची असावी लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी याची लागवड करतात. आणि थंडीच्या सुरुवातीला लसूण तयार होऊन बाजारात विक्रीसाठी सुद्धा येतो.

लसणाचा औषधी उपयोग :

बाहेरून वापरण्यासाठी व पोटात घेण्यासाठी लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. कफनाशक, पित्तनाशक, वातनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो.

१) सर्दी आणि ताप आणि उपचार –

लसून आपल्याला सर्दी, ताप व इतर बरयाच आजारांपासून मुक्त करू शकतो. यासाठी लसुनाच्या गाठी खा किंवा लसून असलेला चहा प्या. याने आपले नाक साफ होईल. सोबतच सर्दी खोकल्यापासूनही मुक्तता मिळते. लसून असलेली चहा फक्त सर्दी खोकल्यासाठीच कामी येत नाही तर शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतो.

यासोबत असेही सांगितल्या जाते कि मासाहार केल्याने शरीराला होणारे नुकसान लसून खाल्ल्याने भरून निघते यासोबत जे कामगार हानिकारक व प्रदूषित वातावरणात काम करतात त्यांनाही लसुणाचे सेवन केल्यास भरपूर लाभ होतो. यामुळे दुषित वातावरणाशी लढण्यास मदत मिळते. “लसुण आपण ज्यूस आणि सूप मध्ये टाकून घेतल्यास सर्दी खोकल्यापासून मुक्त होऊ शकतो. याशिवाय लसुनाचे इतरही फायदे आहेत.”

२) रक्त शुद्धीकरणास सहाय्यक –

काय तुम्ही सकाळी सकाळी पुरळांना लपविण्यापासून कंटाळले आहात? मग आता रक्ताचे शुद्धीकरण करून शरीराला आतून स्वस्थ बनवून पुरळांना मुळापासून मिटविन्याची वेळ आली आहे यासाठी लसुनाच्या २-3 पाकड्या कोमट गरम पाण्यासोबत रोज घ्या सकाळी सकाळी याचे सेवन करा आणि संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या.

यासोबत तुम्ही रोज सकाळी निंबाच्या शरबतामध्ये २-3 पाकळ्या बारीक करून चांगल्या प्रकारे मिळवून प्या. लसून तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करतो आणि हानिकारक रसायन शरीरातून बाहेर फेकतो. लसून आपल्या शरीराला आतून स्वस्थ ठेवतो.

3) हृदयासंबंधी आजारांपासून वाचवतो –

दररोज लसूनचा सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतो कारण यामध्ये उपयोगी एन्टीऑक्सीडेंट तत्व असतात जे कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतात. यासोबत लसून शरीरातील रक्त प्रवाहही नियंत्रित करतो. सोबतच शरीरात शर्करचे प्रमाण हि नियंत्रित करतो.

आपल्याला हि गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल कि लसुनाला पूर्णपणे शिजवल्यास त्यातील महत्वपूर्ण तत्व म्हणचे सल्फर नष्ट होऊन जातो जो लसुणाचा एक महत्वाचा औषधिय गुण मानला जातो यासाठी लसून कच्चा किंवा थोडाफार भाजलेलाच खाण्याचा प्रयत्न करा.

४) त्वचा आणि केस यासाठी –

लसूनमध्ये सापडणारे लाभदायक तत्व आपल्या त्वचेला उष्णता, पुरळ, डाग –धब्बे आणि त्वचा सुटणे यापासून वाचवतो त्वचेवर लसुनाचा वापर केल्याने त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन सुद्धा दूर करता येते. त्यामुळे जेव्हा हि फंगल इन्फेक्शन होते लसून अमृता समान काम करतो.

केसावर कांद्याचे फायदे आपण सर्व जाणतो परंतू लसून जो कांद्याचा भाऊ मानल्या जातो त्यापासून केसांना बरेच फायदे आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.

वाटलेला लसून आपल्या डोक्यात केसांच्या मुळाशी लावले किंवा लसुनाच्या तेलाने केसांच्या मुळाशी लावून मालिश केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.

५) कॅसर पासून मुक्ती –

बऱ्याच अध्ययानातून कळले आहे कि रोज एक विशेष मात्रेत लसूनाचे सेवन केल्यास पोट आणि कोलेरेक्टल कॅन्सर पासून बचाव होतो.

६) त्वचा फाटने आणि कापणे –

जर तुम्हाला शरीरावर त्वचा फाटल्या सारखी वाटत असेल किंवा त्वचा कापल्या गेल्याने जखम झाली असेल तर यावर लासुणाचा वापर करता येतो. यासाठी बारीक कापलेला लसून त्या त्वचेवर किंवा जखमेवर केल्यास लवकरच वेदना कमी होण्यास मदत मिळते.

  • संधिवाताने किंवा हाडे झिजल्याने वयस्कर माणसांचे गुडघे दुखत असतील तर त्यावर लसणाचा लेप लावावा म्हणजे त्याने उत्कृष्ठ असा आराम मिळतो.
  • नायटा, गळू यांसारख्या त्वचारोगांवर लसणाचा रस चोळावा. तसेच कान दुखत असल्यास खोबऱ्याच्या तेलात लसणाच्या पाकळ्या गरम करून ते तेल कोमट झाल्यावर कानात घालावे म्हणजे कानदुखी सुद्धा कमी होते.
  • लसूण जेवणात सतत वापरल्याने पोटाचे होणारे अनेक रोग बरे होतात.
  • सारखा खोकला येत असेल तर लसूण भाजून त्यात गूळ मिसळून, गोळी करून खावी म्हणजे आराम मिळतो.
  • आमवात, संधिवात वगैरे वातप्रकारांवर, तसेच अजीर्ण, अपचन वगैरेंवर सुद्धा लसूण सेवनाने आराम मिळतो.
  • अनेक प्रकारच्या नेत्ररोगांवर, दमा, हृदयविकार, ताप अशा अनेक रोगांवर लसूण उपयुक्त ठरतो.
  • तसेच लसणाचे जर नियमित सेवन केले तर कफ सुटतो.
  • पोटातील वायूचा नाश होतो, श्वसननलिकेवरील आलेली सूज सुद्धा कमी होते. पचनशक्ती सुधारते.

घ्यावयाची काळजी

  1. कोणत्याही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा सर्जरीपूर्वी लसून खाऊ नये.
  2. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या दिवशीच 3-४ पेक्षा जास्त लसणाच्या पाकड्या खाऊ नये.
  3. अस्तमाच्या रोग्यांनी लसुनाचे सेवन करू नये. कारण याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
  4. असा हा बहुगुणी लसूण उष्ण व तिखट असल्याने गर्भवती स्त्रियांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात सेवन करू नये.
  5. आणि ज्याना लसूण सेवनाने त्रास होत असेल तर धन्याचे पाणी वारंवार प्यावे.

लसणाचे विविध उपयोग – Garlic Uses in Marathi

स्त्रिया स्वयंपाकात लसूण हा रोजच वापरण्यात येतो, लसणाची चटणी करताना स्वयंपाकात भाजी-आमटी करतानासुद्धा लसूण वापरतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये स्वयंपाकात लसणाचा वापर जास्त प्रमाणात करतात. रस्सा भाजी, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी यांतसुद्धा लसूण वापरल्याने भाजी, आमटी, चटण्या खूप रुचकर होतात. मसाल्यात याचा वापर केल्याने चव देखील छान येते.

लसूण विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Garlic

Q.लसूनचे शास्त्रीय नाव काय आहे ?

उत्तर – लसूनचे शास्त्रीय नाव (एलियम सटायव्हम्) Allium sativum हे आहे.

Q. लसूनची लागवड ही कशी केली जाते ?

उत्तर – पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी याची लागवड करतात. थंडीच्या सुरुवातीला लसूण तयार होऊन बाजारात विक्रीसाठी येतो.

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved